घरात नव्या बाळाचा जन्म झाला की हल्ली आपण वेगळी नावं आहेत का याचा शोध घ्यायला सुरूवात करतो. काही नावं आधीपासून आपण शोधून ठेवलली असतात. पण मराठी मुलींची नावे आपल्याला अधिक आवडतात. मराठी मुलींची नावे नवीन आहेत का, त्याचा काही वेगळा अर्थ लागतो का अथवा लहान मुलींची नावे आपल्याला आवडतील अशी आणि वेगळ्या अर्थाची मुलींची नावे जी कॉमन नाहीत असाही आपण शोध घेत असतो. त्यातही मुलींची नावे जर रॉयल असतील तर आपल्याला अधिक आवडतात. मग अगदी आई आणि वडीलच नाही तर मित्रमैत्रिणीही वेगवेगळी नावे शोधायला सुरूवात करतात. बहुतांशी घरात गणपती बाप्पाशी निगडीत नावं ठेवली जातात. अशी काही नवजात मुलींसाठी मराठी मुलींची नावे जी रॉयल असतील (Royal marathi names for girl) अशी आम्ही तुमच्यासाठी खास शोधून काढली आहेत. तीदेखील अगदी अर्थासकट. तुम्हाला तुमच्या लहानशा या गोंडस बाहुलीचं नाव ठेवायचं असेल तर नक्कीच या नावांची मदत मिळू शकेल.
आपण हल्ली कॉमन नावांपेक्षा मुलींची वेगळी आणि युनिक नावं शोधत असतो. पण नाव ठेवताना आपल्याला त्याचे अर्थही तितकेच चांगले हवे असतात. मग अशावेळी गुगल सर्चवर आपल्याला अनेक नावं मिळतात. पण आपल्याला सहसा मराठी नावं मिळत नाहीत. त्यासाठीच काही खास मराठी मुलींची नावे जी तुम्ही तुमच्या नवजात मुलीसाठी नक्की ठरवू शकता. त्याचे अर्थही आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. काही जणांकडे विशिष्ट अक्षरांवरूनही नावं ठेवली जातात.
मुलींची नावे (Latest) | अर्थ |
आभा | नेहमी चमकत राहणारी, झळाळी |
आर्द्रा | सौंदर्य, दमटपणा, कोणीही जिला हात लावू शकणार नाही अशी, नक्षत्र |
आद्या | सुरूवात, प्रारंभ, प्राधान्य |
शार्वी | दिव्य, दिव्यता |
धरा | धरती, जमीन |
दिवा | प्रकाश देत राहणारी |
एशा | पवित्र, इच्छा |
एकानी | एकटी असणारी, एकमेव अशी |
एलिना | बुद्धीमान, बौद्धिक क्षमता अधिक असणारी |
फलक | स्वर्ग, जागा, आकाश |
फेलिशा | नशीबवान, एखाद्याचं नशीब झळकवणारी |
गर्वी | अभिमान, एखाद्याचा अभिमान असणारी |
गाथा | कथा, एखादी गोष्ट |
लेषा | जीवनात आनंद घेऊन जगणारी |
झिल | धबधबा, मुलगी |
जिया | हृदयाचा एक भाग, आयुष्य |
जिजा | शिवाजी महाराजांची आई |
कियारा | पवित्रता, शांततापूर्ण |
निसा | सौंदर्य, रात्र, महिला |
ओजस्वी | झळाळी, प्रकाश, दैदिप्य |
उर्मी | एखाद्याला जन्म देणारी, ऊर्जा |
ऊर्जा | उत्साह, सतत दुसऱ्याला उत्साह देणारी |
ऊर्वी | जमीन, धरती |
रक्षा | संरक्षण करणारी, जपणारी |
सावी | चांदणी, सन्मानाने मोठी, लक्ष्मीचे नाव |
सानवी | लक्ष्मीचे नाव, नवी, नव्यासह |
अपारा | ज्ञान, ज्ञानासह, हुशार |
अंजोरी | चंद्राचा प्रकाश, चंद्रप्रकाश, चंद्राच्या प्रकाशात न्हाऊन निघणारी, प्रकाश |
मरूषिका | शंकर देवाच्या आशिर्वादाने जन्मलेली, शंकराचा आशिर्वाद |
आर्णा | देवी लक्ष्मीचे एक नाव, भरभराट |
आहाना | सूर्याचा पहिला किरण |
आरोही | संगीताचा ध्वनी, सूर |
ध्वनी | आवाज |
अक्षरा | देवी सरस्वती |
अनायशा | विशेष, खास व्यक्ती |
छवी | प्रतिबिंब, सावली |
इरा | भक्तीत न्हालेली, एकत्रित |
इशानी | देवाच्या जवळ असणारी, परमेश्वराशी संबंधित |
जीविका | नर्मदा नदीचे दुसरे नाव, जीवन |
पाखी | पक्षी |
पर्णिका | लहान पान, पानाचे दुसरे नाव, पार्वतीचे नाव |
स्मर्णिका | स्मरणात राहणारी |
प्रिशा | देवाकडून मिळालेले गिफ्ट |
साधिका | देवी दुर्गा, साधना करणारी, साधक |
तीच तीच नावे ऐकून कंटाळा आलेला असतो. त्यामुळे प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलीचे नाव वेगळे आणि रॉयल असावे असे वाटते. त्यातही अगदी जुनी नावे असू नयेत असंही वाटतं. बाळाचे नाव ठेवताना काही विशिष्ट गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. त्यामुळे ज्या आईवडिलांना आपल्या मुलीचे नाव आधुनिक असावे असे वाटते खास त्यांच्यासाठी ही अर्थासह मुलींंची नावे
मुलींची आधुनिक नावे | अर्थ |
अर्जा | राजकन्या, पवित्र |
परी | लोभस कन्या, राजकन्या |
कायरा | सूर्यासारखी, राजकन्या |
आर्या | देवी, देवीचे नाव |
अमायरा | राजकन्या, सुंदर |
तान्या | सुंदर राजकन्या, नाजूक |
आकृती | आकार |
आयुक्ता | राजाची मुलगी, राजकन्या |
मलिहा | खंबीर मनाची, सुंदर, सौंदर्यवती |
साजिरी | सुंदर, कोमल |
साक्षी | एखाद्याच्या चांगल्या वाईटासाठी साक्षीदार असणे |
समायरा | सुंदर, राजकन्या |
आख्या | प्रसिद्धी |
आरष्टी | पवित्र |
अधिश्री | प्रमुख, प्राधान्य |
अमोली | मौल्यवान, अमूल्य |
अनिका | दुर्गेचे रूप, देवी दुर्गा |
अनिशा | न संपणारी, सतत कार्यरत असणारी |
दक्षा | पार्वतीचे नाव, जमीन, भगवान शिवाची पत्नी |
दृष्टी | बघण्याची ताकद, आनंद, दृष्टीकोन, साहस |
इलाक्षी | सुंदर डोळ्यांची, नयनाक्षी |
गणिका | सुंदर फुल |
लावण्या | सुंदर, सौंदर्यवती, सुंदर दिसणारी |
संजिता | बासरी |
शैली | सवय, स्टाईल |
वार्या | स्वरूप, एखाद्या गोष्टीचा आराखडा |
वामिका | योद्धा, युद्धात लढणारी |
देविषा | देवीप्रमाणे, देवी, देवीचे रूप |
चित्राणी | गंगेचे नाव, गंगेचे रूप, गंगा नदी |
अर्णवी | पक्षी, जगाची सुरूवात |
कशिका | निसर्गाशी जोडली गेलेली व्यक्ती |
मिष्का | प्रेमाचे प्रतीक, प्रेमाने दिलेले बक्षीस |
निद्रा | झोप, प्रेम |
पिहू | पक्षांची किलबिल |
पावनी | संपूर्ण चंद्र, पूर्ण चंद्राचा चेहरा |
नेयसा | पवित्र |
नित्या | नियमित, नेहमीचे |
नव्या | नवीन, तरूण, नवे |
नाएशा | विशेष असणारी, नवी |
ओमिषा | आयुष्याची देवी, जीवनमरणाची देवी |
र वरून मुलींची खास रॉयल नावे ठेवायची असतील तर तुम्हाला या लेखातून अर्थासह ही नावे मिळतील. तुम्हाला जास्त शोधायची गरज भासणार नाही
लहान मुलींची नावे | अर्थ |
अभिज्ञा | आज्ञा पाळणारी, नम्र |
लीनल | नम्र स्वभावाची |
गुंजाली | चराचरात नाव कमावणारी, आपल्या नावाची गुंज सगळीकडे पसरवणारी |
ध्रुवा | ध्रुव ताऱ्यावरून घेण्यात आलेले मुलीचे नाव, अढळ, कधीही न ढळणारी |
व्रितिका | यश, यशस्वी, कामात नेहमी यश मिळविणारी |
आदिरा | खंबीर, कधीही न ढळणारी |
द्विजा | आकाशाप्रमाणे उंच |
ईश्वासा | पवित्र, देवाच्या जवळ असणारी |
निर्जरा | कोणालाही न घाबरणारी, योद्धा |
पार्थी | राजकन्या, लढाऊ राजकन्या |
युधा | लढाईमध्ये जिंकणारी, युद्धात सहभागी होणारी |
युगा | जग |
चार्वी | सुंदर, दिसायला सुंदर |
केया | सुंदर, अप्रतिम |
सायुरी | कमळ, फुल |
विहा | लक्ष्मीचे नाव |
अहावा | पाणी, पाण्यासारखी निर्मळ |
अमुक्ता | मूल्यवान |
अन्वी | सूर्याचा पहिला किरण, शांत, सुंदर, देवी दुर्गा, सुंदर डोळ्यांची |
अत्रेयी | नदीचे नाव, आनंदी |
भौमी | धरा, जमीन, पृथ्वी |
प्रजा | जनता, लोकसमुदाय |
दर्शिनी | कृष्णाचे रूप, कृष्णाचा हिस्सा |
इधिता | वाढ, प्रगती, प्रगतीपथाकडे वाटचाल |
फाल्गुनी | मराठी महिना, फुल, फाल्गुन महिन्यात जन्माला आलेली |
अर्थी | देवाजवळ आपले प्रेम व्यक्त करणे, देवाची कृपा |
अर्का | आशेचा किरण, रवि, सूर्य |
आर्जव | एखाद्याकडे मागणे करणे, प्रामाणिक असणे |
असिमा | यमुना नदीचे नाव, सीमा नसणारी |
अन्विता | दुर्गा देवी, दुर्गेचे नाव, दुर्गेचे रूप |
शनाया | शनिवारी जन्म झालेली, सूर्याचे पहिले किरण |
तृषा | तहान |
उद्यती | उगम, उगम असण्याचे ठिकाण |
वंशा | पाठीचा कणा, बांबू |
वस्तिका | सकाळचा प्रकाश, लवकर येणारा सूर्याचा प्रकाश |
इनिका | लहानशी पृथ्वी |
जिज्ञासा | कुतूहल, एखाद्या गोष्टीविषयी असणारे प्रश्न |
क्षमा | माफ करणे |
कालिंदी | अप्रतिम, सांगितिक नाव |
मयुखी | मोर, मादी मोर |
मुलींची युनिक नावे ठेवायची असतील तरीही आम्ही तुम्हाला काही अशी नावे देत आहोत जी तुम्हाला जास्त ठिकाणी नक्कीच ऐकू येणार नाहीत. मुलींची अशी युनिक नावे अर्थासह जाणून घ्या. मराठी नावांमध्ये सहसा तीच तीच नावे बारशाला ठेवली जातात. तुम्हालाही काही युनिक नावे हवी असतील तर नक्की वाचा.
मुलींची काही युनिक नावे | अर्थ |
गेष्णा | गायिका, सुंदर गाणारी |
अब्जा | पाण्यात जन्म झालेली, पाण्याशी संबंधित |
अगम्या | हुशार, कोणालाही कळू शकत नाही अशी |
इधा | पवित्र |
जश्विता | नशीबवान, भोळी, साधीसुधी, साधेपणा जपणारी |
सुकेशिनी | सुंदर केसांची, सुंदर |
जशोदा | कृष्णाचा अंश |
जिताशी | कायम जिंकणारी, जिंकण्याची देवता |
महती | नारदाचे नाव, ऊर्जा, प्रसिद्धी, गाण्यातील रागाचे नाव |
मैत्रा | अत्यंत निखळ, मैत्री जपणारी, मित्रत्वाचे नाते |
मंजिष्ठा | अत्यंत टोकाचे, वाद्य |
मार्या | मर्यादेतील, मर्यादा, प्रेम करणारी |
मिराया | कृष्णाच्या भक्तीत न्हाऊन निघालेली, भरभराट करणारी |
प्रशालिका | योग्य मार्गावर चालणारी, योग्य मार्ग निवडणारी |
पंखुडी | पान, पानाचा भाग |
प्रतिची | पश्चिम भाग, एखाद्या गोष्टीचा अनुभव येणे |
रागवी | सुंदर, शिवाचा भाग |
रविश्ता | सूर्याकडून प्रेम मिळालेली, सूर्याचा अंश |
रिष्मा | आनंदी, मजेशीर, विश्वासाचा किरण |
रूहानी | संत, शुद्ध मनाची, शांत |
तपानी | गोदावरी नदीचे दुसरे नाव, स्वतः तापत राहून दुसऱ्यांना शांत करणारी, सहनशील |
ताशा | तरूण मुलगी, ख्रिसमसच्या दिवशी जन्माला आलेली |
तविष्का | धैर्यवान, धैर्यशील, धैर्य असणारी |
तितिक्षा | सहनशील, प्रकाश, दैदिप्यमान |
उद्विता | उमललेल्या कमळाने भरलेले तळे, कमळांची नदी, कमळांनी भरलेली नदी |
उज्जेशा | पहिले, जिंकणारे |
वाणिका | सीतेचे नाव, सहनशील |
वज्रा | हिरा, दधिची ऋषींच्या हाडांपासून तयार करण्यात आलेले शस्त्र, इंद्राकडे असणारे शस्त्र |
वराली | चंद्र, चंद्राचा भाग |
स्वस्तिका | स्वस्तिक, पवित्र, कार्याची सुरूवात |
याहवी | पृथ्वीवरील स्वर्ग |
योचना | विचार, मनात चालू असलेला विचार |
भूवी | स्वर्ग, पृथ्वीवरील स्वर्ग |
दिती | कल्पना, मनात येणारी कल्पना |
द्युती | लहानशी, नाजूक, सुंदर अशा मुलगी |
गीतश्री | भगवद् गीता |
ग्रिष्मा | ओलावा, ग्रीष्म ऋतूमध्ये जन्माला आलेली, आनंदी |
हृदिनी | आनंद, हृदयात वसणारी, प्रकाशमान, दैदिप्यमान |
हिया | हृदय |
इदिका | पृथ्वी, धरती |
हेही वाचा :
प्यार से बुलाने वाले लड़कियों के नाम की लिस्ट
बच्चों के नये नाम की लिस्ट 2020
त वरून मुलांची नावे, आधुनिक नावे अर्थासह
प वरून मुलांची नावे, आधुनिक नावे अर्थासह
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक