भावंडाचं नातं हे सर्वात वेगळं आणि अनोखं असतं. मग ते बहीणभावाचं असो अथवा बहिणीबहिणींचं. प्रत्येकालाच आपली लाडकी बहीण प्रिय असते. तिच्याशी जितकं भांडता येतं तितकाच तिच्यावर प्रेमाने हक्कही गाजवता येतो. कधी कधी ती रुसल्यावर तिची समजूत काढण्यात एक वेगळीच मौज असते. आईबाबांना तुमचं नाव सांगायला ती जितकी तत्पर असते तितकीच त्यांचा मार आणि ओरडा मिळू नये म्हणून तुमची काळजीही घेते. वडीलांप्रमाणे आधार देते आणि आईप्रमाणे जीवापाड प्रेमही करते. अशा तुमच्या लाडक्या बहिणीवरचं प्रेम व्यक्त करणाऱ्या या बेस्ट शायरी
बहिणीवरचं प्रेम व्यक्त करणाऱ्या भावनिक शायरी वाचून तुमच्याही डोळ्यात तराळेल पाणी
१. पवित्र नाते हे बहीण भावाचे
लखलखत राहू दे बंध जिव्हाळ्याचे
२. मायेचं साजूक तूप, आईचं दुसरं रूप
काळजी रूपी धाक, प्रेमळ तिची हाक
कधी बचावाची ढाल तर कधी मायेची उबदार शाल
भरलेलं आभाळ रितं कराया,
तिचीच ओंजळ पुढे येई,
जागा जननीची भरून काढाया देवाने निर्मिली आईनंतर ताई
३. आईसमान भासते मज मोठ्या बहिणीची माया
वटवृक्षाप्रमाणे सतत देते ती मजवर तिची छाया
न सांगताच जी घेते माझ्या मनाचा ठाव
आयुष्यभर माझ्या ओठी माझ्या ताईचे नाव
४. हाती बांधावया राखी, अहो बहीण हवी एक
बहिणीच्या नात्यासाठी प्रत्येक घरात वाचायला हवी लेक
५. माझी बहीण लाडाची जणू वटवृक्षाची सावली, माया ममतेनं भरलेली ती माझी मेवा आणि मिठाई
६. बहीणीचं प्रेम हे अथांग समुद्रासारखं, निखळ असं नातं आयुष्यभर जपण्याचं, इथे असतो फक्त जिव्हाळा अन असतो अतूट विश्वास, बंधन नसतं कुठलं त्यात निर्मळ हास्याचं असतं खास, सोन्याहून सुंदर असं जगात आहे अनमोल, नातं असं हे आपुलकीचं भाऊ बहिणीच्या प्रेमाचं
७. सासरी जाताना मिठी मारून रडणारी, नाही तुला आता ओरडणार असं रडत रडत म्हणणारी, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी बहीण असावी, जीवापाड जपणारी आणि खूप प्रेम करणारी
८. ताई हे नुसतं नाव नाही त्याच्या आयुष्याच गाव आहे, आईनंतर तिच्यामुळे त्याच्या आयु्ष्याला भाव आहे
९. नातं बहीण भावाचं म्हणजे टॉम अॅंड जेरी
तेवढाच राग आणि तेवढंच प्रेम हे म्हणजे लय भारी
१०. कितीही रागावलीस ताई तरी बंध रेशमाचे तोडू नको, वेडा आहे तुझा भाऊ त्याला एकटं सोडू नको
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणखी काही शायरी आणि चारोळ्या ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील.
१. पिल्लू बोलणारी गर्लफ्रेंड नाही ओय हिरो कुठं चालला बोलणारी बहीण पाहिजे... हैपी बर्थडे सिस्टर
२. जरी मी खूप भांडलो तरी तुला रडताना पाहू शकत नाही आणि तुला कधीच दुखवू शकत नाही. तुझं आयुष्य आनंदाने फुलवावं यासाठी आहे जन्म माझा
वाढदिवसाच्या शुभेच्छा तायडे
३. तू एक सुंदर व्यक्ती, विश्वासू मैत्रीण आणि माझी खास बहीण आहेस, तुझ्यामुळे माझे आयुष्य आनंदाने भरून गेले आहे. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
४. सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.... सोन्यासारख्या माझ्या ताईला... वाढदिवसाच्या शुभेच्छा
५. भावाचे जगणे करते कठीण, तरी हवीच त्याला पाठराखीण बहीण, प्रत्येक गोष्टीची तिला घाई, उत्तम व्यवस्थापक आहे माझी ताई, भावाला लुबाडून राहते एकदम साधी, माझ्यावर दादागिरी करण्यात सर्वात आधी, जीवाला जीव लावते माझी माई, अशी मस्तीखोर आहे ही मुक्ताई
वाढदिवसाच्या शुभेच्छा तायडे
६. बाबांची ती परी अन सावली जणू आईची, कधी रागीट तर कधी प्रेमळ हीच ओळख आहे माझ्या ताईची
वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई
७. देवाकडे मी लक्ष्मी मागितली तर त्याने मला बहीण दिली… वाढदिवसाच्या शुभेच्छा छकुली
८. तसं तर या गोड नात्याबद्दल लिहिण्यासारखं खूप आहे, आई दूध असेल तर ताई माझी त्याचं बनलेलं साजूक तूप आहे
वाढदेदिवसाच्या शुभेच्छा ताई
भावाबहिणीचं अप्रतिम नातं सांगणाऱ्या या चारोळ्या आणि शायरी तुम्हाला नक्कीच आवडतील.
१. आपला भाऊ कधीच आपल्याला आय लव्ह यु बोलत नाही, पण आयुष्यात त्याच्या एवढं खरं प्रेम कुणीच करत नाही
२. भाऊ तर भांडखोरच असतात, घरी बहिणीशी रिमोटसाठी भांडतात आणि गरज पडली की तिच्यासाठी जगाशीही भांडू शकतात
३. लग्नात सर्वात जास्त रडतो तो मुलगा मुलीचा भाऊ असतो
४. बहिण म्हणजे भावाच्या ह्रदयाचा तुकडा असतो
५. भाऊ बहिणीची ढाल असतो, मग तो मोठा असो वा छोटा, कारण त्याला माहीत असतं बहीण त्याची जबाबदारी आहे
६. माझी बहीण मलाच हवी, पुढच्या सात जन्मात मला तीच हवी, आवडतं मला तिला त्रास देणं, तिच्यापेक्षा मोठं असूनही तिच्याकडून मार खाणं, तिला त्रास देण्याची मजा जगातील इतर कोणत्याच गोष्टीत नाही.
७. कुठल्या नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं नातं सर्वात गोड आहे
८. बहीण लहान असो वा मोठी तिला नेहमीच असते आपल्या भावाची काळजी
९. आईनंतर शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थ प्रेम करणारी कुणी असेल तर ती म्हणजे बहीण
१०. भावाबहिणीचं प्रेम म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना
भावाबहिणीचा खास सण म्हणजे रक्षाबंधन... म्हणूनच राखीपौर्णिमेला बहीण आणि भावाला द्या 'या' भेटवस्तू (Raksha Bandhan Gift Ideas In Marathi) त्याचप्रमाणे भाऊबीजेसाठी खास शुभेच्छा संदेश
बहीण भावाच्या नात्यावर आधारित सुंदर चारोळ्या
१. तू माझी बहीण
मी तुझा भाऊ
प्रेमाचं आपलं नातं
आयुष्यभर अतूट ठेवू
२. भावाबहीणीचं नातं
नेहमीच घट्ट असतं
आयुष्य संपलं तरी
ते कधीच तुटत नसतं
३. बहीण असावी तर
आमच्या दिदीसारखी
नाहीतर जगात
सिस्टरतर नर्सपण असते
४. माझ्या प्रत्येक आनंदात
मोठा वाटा तिचा असतो
माझ्या प्रत्येक अश्रूचा थेंब
माध्याआधी तिच्या डोळ्यात वाहतो
५. धन्य झालो ताई
तू माझ्या आयुष्यात आली
सतत माझ्यासाठी घालतेस वाद
तू देतेस मला मोलाची साथ
६. कधी चूक झाली तर
ताई माधी बाजू घेते
गोड गोड शब्द बोलून
शेवटी पाठीत फटका देते
७. ताई शब्दातच आहे
माया प्रेमळ आईची
जन्मोजन्मी मज राहो
साथ माझ्या ताईची
८. माझ्या आयुष्यात सर्वकाही
फक्त आहे माझी ताई
भाव मनीचे सांगताना
शब्द शब्द गुंफत जाई
९. आपली ताई
तिला आहे खूपच घाई
प्रश्न काही विचारल्यावर
सांगले मला आता वेळ नाही
१०. पहिली आणि शेवटची
जीवाभावाची मैत्रीण माझी ताई
कितीही सांगा काही बाही
पण माझ्यावर तिचा विश्वास लय भारी
नणंद म्हणजे नवऱ्याची बहीण पण बऱ्याच नणंदा भावजया बहिणीप्रमाणेच एकत्र नांदतात. त्यांच्यासाठी चारोळ्या
१. नणंद भावजयेचं नातं
लोकांमध्ये काही का असेना
आपल्या घरात मात्र तुझं माझं
चांगलंच सूत जमलं आहे
२.नटूनी थटूनी बसल्या
नणंद आणि भावजया
काहीतरी सांगावे वाटले
त्यांना पाहुन मला बया
३. नणंद नाही तू तर
माझी जीवाभावाची बहीण आहेस
मला काही दुखलं खुपलं तर
मदतीसाठी तत्पर आहेस
४. मला वाटतं आपलं पूर्वजन्मीचं
काहीतरी नातं असावं
उगाच नाही नणंद असूनही
तूझं माझं इतकं सूत जुळावं
५. नणंद आणि भावजय
नातं आहे अफलातून
लोकांसाठी काही असेल
आपल्यासाठी मात्र मनातून
पुढे वाचा -