लग्नासाठी जोडीदार पाहायला जाताना कधीच करु नका या चुका

लग्नासाठी जोडीदार पाहायला जाताना कधीच करु नका या चुका

तुमचं लग्नाचं वयं झालयं?, लग्नासाठी जोडीदार बघण्यासाठी तुम्ही सुरुवात केलीय? तुमच्या अपेक्षांची एक यादीही तयार केलीय? मग तुम्हाला काय चुका टाळायला हव्यात हे देखील माहीत असायला हवे. लग्न हा आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय आहे तो असा कसाही घेऊन चालत नाही. फार विचार करुन हा निर्णय घेणे गरजेचे असते. लग्नासाठी कोणतेही स्थळ बघायला घेतल्यानंतर सगळ्यांचा गोंंधळ उडणे स्वाभाविक आहे. कारण बरेचदा जे मनाशी ठरवले असते ते सगळे मिळेलच असे सांगता येत नाही. कधी त्याहून जास्त तर कधी त्याहून कमी असं कमी-जास्तच  हे प्रमाण ठरलेलंच असतं. पण एखाद्या मुलाला किंवा मुलीला भेटायला जाताना एकमेकांच्या वागण्यातून चुकीचा अर्थ दुसऱ्यांपर्यंत जाऊ नये असे वाटत असेल तर या खाली दिलेल्या चुका टाळा. 

लग्नात सुंदर दिसण्यासाठी सर्व नववधूंनी फॉलो कराव्यात या हेल्थ टिप्स

वेळ पाळा

खूप जणांना वेळ पाळायचं म्हणजे कसं काय जमवायचं ते कळत नाही. पण तुम्ही पहिली ही चूक केली तर तुमच्याबद्दल आधीच काही मत समोरच्याच्या मनात तयार झालेली असतात. त्यामुळे तुमच्या कपड्यांपेक्षाही वेळ ही महत्वाची असते. जर तुम्ही योग्य वेळेत गेला तर तुम्ही वेळेचं गणित जमवू शकता असे वाटते. काही जणांना उशिरा जायला आवडते. त्यामुळे समोरचा आपली वाट पाहतो ही गोष्ट अभिमानाची वाटते. पण असे अजिबात चांगले नाही. कोणत्याही योग्य कारणांशिवाय उशिरा जाणे टाळा. जर तुम्हाला उशीर होणार असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला आधी फोन करुन कळवा. म्हणजे तुम्ही किती काळजी करता हे कळते. अनेकदा या गोष्टी मनात असतात .त्या आचरणात आणल्या जात नाहीत. त्यामुळे तुमच्याबद्दल एखाद्याच्या मनात गैरसमज निर्माण होऊ शकतो. 

डेस्टिनेशन वेडिंग बजेटमध्ये करायचे असेल तर असे करा प्लॅनिग

पुढाकार घ्या

लग्नासाठी जोडीदार पाहायचा म्हणजे तुम्हाला त्याला जाणून घेणे अगदी गरजेचे आहे. एखाद्याला जाणून घेताना काही गोष्टींचा श्रीगणेशा हा तुम्हालाच करावा लागतो. तो श्रीगणेशा करा. बोलायला सुरुवात काही विषयांपासून करा. थेट विषयाला हात घालण्याऐवजी चौकशी किंवा एखादी छान कॉम्पलिमेंट एकमेकांना द्या. त्यामुळे एक चांगली सुरुवात होऊ शकेल. कोणत्याही नियमानुसार मुलीने बिल देऊ नये असा नियम नाही. मुलीही कॉफी शॉपमध्ये जाऊन खाण्याची ऑर्डर किंवा कॉफीचे बिल भरु शकतात. पण समोरची व्यक्ती बिल भरत असेल तर किमान त्याच्यासोबत उठून जाण्याची तसदी घ्या. त्यामुळे तुम्ही फुकटे नाहीत हे समोरच्याला कळते. खूप जणांचा हा अनुभव असेल की, काही जण बाहेर गेल्यावर काही खायला बघत नाही. एक भयाण शांतता करुन बसतात. त्यामुळे नकारात्मक उर्जा अधिक तयार होते. 

प्रसन्न राहा

तुम्ही लग्न करणार आहात. तुम्हाला जोडीदार मिळणार आहे. त्यामुळे आनंद हा तुमच्या चेहऱ्यावर असायला हवा. चेहऱ्यावर आनंद असेल तर त्या व्यक्ती समोरच्यालाही सकारात्मक उर्जेने भरलेल्या वाटतात. पडका चेहरा आणि एखादी व्यक्ती आवडली नसेल तर ते चेहऱ्यावर दाखवणे गरजेचे नसते. तुम्ही त्या काळासाठी चेहरा प्रसन्न ठेवला तर तुमच्याबद्दल एक चांगले मत तयार होते. अशापद्धतीने लग्न ठरवताना अनेकदा फोटो आणि प्रत्यक्ष व्यक्तीमध्ये बरीच तफावत असते. त्यामुळे होतं असं की, अनेकांचा मिटिंगचा मूड उडून जातो. त्यामुळे शक्य असेल तर प्रसन्न राहा.

बाता मारणे टाळा

काही जणांना बाता मारण्याची सवयच असते. सतत मोठेपणा आणि स्वत:च्या गोष्टी ऐकायला समोरच्या व्यक्तीला आवडतेच असे नाही. काहींना उगाचच सगळ्या गोष्टी सांगायला आवडते. जर तुम्हाला अशा बाता मारायची सवय असेल तर तुम्ही ती सवय कमी करा. अशी व्यक्ती पहिल्याच भेटीमध्ये अनेकांना आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला अशी सवय असेल तर तुम्ही खूप गप्पा मारणे टाळा. समोरची व्यक्ती गपिष्ट असेल तर तुम्ही अगदी बिनधास्त गप्पा मारा. पण बाता मारु नका. यामध्ये तुमचा खरा स्वभाव असू द्या. 

लग्नात असा सेट करा सोपा आणि साधा मेन्यू

रेंगाळू नका

काही जणांना  निर्णय घेण्यासाठी खूप वेळ लागतो. अशावेळी ते स्थळ पाहून झाले  तरी खूप वेळ रेंगाळत राहतात. तुमच्या रेंगाळण्याचा अर्थ समोरच्या कळाला नाही. तर तुम्ही संभ्रमात आहात असेच वाटते. त्यामुळे जर तुम्हाला एखादे स्थळ आवडले नसेल तर  रेंगाळू  नका. जो निर्णय आहे तो योग्य विचार करुन आणि योग्य वेळी द्या. कारण जर तुम्हाला हे स्थळ पसंत नसेल तर तुम्हाला पुढचे स्थळ पाहायला जायचे असते. त्यामुळे रेंगाळू नका. योग्य तो निर्णय घ्या 


लग्नाचा विचार असेल आणि ठरवून लग्न करायचे असेल तर या चुका टाळा.