हाताच्या रेषांवरून जाणून घ्या तुमची श्रीमंती

श्रीमंत होण्याची संधी आहे की नाही, दर्शवतात हाताच्या रेषा

तुमच्या हातावरील रेषा तुम्हाला तुमच्या भविष्याची माहिती देतात हे तर सगळ्यांना माहीत आहे. त्याचा एक विशिष्ट अभ्यास आहे. तुम्हाला या रेषा अभ्यास करणाऱ्यांकडून तुमची आर्थिक स्थिती कशी आहे याचीही माहिती घेता येते. या हाताच्या रेषा तुमच्या नशिबात श्रीमंत होण्याची संधी आहे की नाही याचीही कल्पना देतात असं म्हटलं जातं. पण हे प्रत्येकाला कळत नाही आणि जाणून घेण्याची इच्छा मात्र असते. हस्तरेखा शास्त्रामध्ये सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. आपल्या हातावर अशा काही रेषा असतात, ज्याचा योग्य प्रकारे अभ्यास केला तर आपल्याला आपल्या नशिबात श्रीमंती आहे की नाही अथवा आपली आर्थिक स्थिती कशी राहणार आहे याचा अंदाज घेता येतो. तुम्हालाही अधिक जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचा. हाताच्या कोणत्या रेषा कशा प्रकारे असल्या तर तुमची आर्थिक स्थिती मजबूत असते आणि तुम्ही श्रीमंतीकडे वाटचाल करू शकाल याचा अंदाज आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत.

शनि पर्वतावरून रेषा खाली येत असेल तर

Freepik.com

आपल्या हातावर शनि पर्वत असतो.  जे हस्तरेषा अभ्यासक्रमात शिकविण्यात येते.  तुमची धनरेषा जर या शनि पर्वतावरून येत असेल तर तुम्ही खूपच भाग्यवान व्यक्ती आहात असं समजण्यात येते. हस्तरेषेनुसार ही रेषा जर सरळ असेल तर संपत्तीच्या बाबतीत अतिशय शुभ मानले जाते.  या व्यक्ती आपल्या पूर्वजांच्या चांगल्या कर्मामुळे धनवान होतात. वास्तविक पाहता अशा व्यक्ती  मेहनतीने नाही तर आपल्या नशिबाच्या जोरावर श्रीमंत होतात.  तसंच तुमच्या भाग्यरेषेपासून जर फोर्कसारख्या रेषा निघत असतील आणि त्या शनि पर्वताजवळ पोहचत असतील तरत तुम्ही पैशांच्या बाबतीत नशिबवान ठरता. तसंच या व्यक्ती सामाजिक क्षेत्रातही अत्यंत प्रसिद्ध ठरतात. 

जर हातावर अशा परिस्थितीत त्रिकोण होत असेल

तुमच्या हातावरही जर भाग्यरेषा आणि हृदय रेषेच्या मदतीने त्रिकोण तयार होत असेल तर तुम्हाला होणाऱ्या धनलाभाकडे याचा इशारा आहे. अशा व्यक्तींना आयुष्यात  एका क्षणी अचानक धनलाभ होतो आणि असा त्रिकोण असेल तर वेगवेगळ्या स्रोतांकडून तुम्हाला धनप्राप्ती होते. तुमच्याकडे अनेक मार्गाने पैसा येतो आणि तुम्ही धनवान होण्याची शक्यता असते. 

हस्तरेषाच नाही तर बोटांमधील फटही सांगते तुमच्या आयुष्यातील घडामोडी

अंगठ्याजवळ रेषा असेल तर

Freepik.com

तुमच्या हाताच्या अंगठ्याजवळ तर्जनीच्या बोटाकडे जाणारी रेषा असेल तर अशा व्यक्ती अत्यंत समजूतदार आणि बुद्धीमान असतात. आपल्या नेतृत्व गुणांमुळे आणि मेहनतीने अशा व्यक्ती धनाची प्राप्ती करून घेतात. अशा व्यक्तींना आयुष्यात पैसा कमी पडत नाही.  अशा व्यक्ती सहसा हालाखीच्या परिस्थितीमध्ये राहात नाहीत. 

हातांच्या रेषा सांगतील कसं असेल तुमचं वैवाहिक जीवन, जाणून घ्या

अंगठा आणि करंगळीला जोडणारी रेषा

तुमच्या हातावर अशी एक रेषा असेल जी अंगठ्यापासून सुरू होते आणि सर्वात लहान बोट अर्थात करंगळीपर्यंत ही रेषा असेल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पैसे मिळतात. तुम्हाला तुमच्या पूर्वजांकडून आलेली वाडवडिलार्जित संपत्ती सहजरित्या मिळते आणि त्याशिवाय तुम्हाला लग्नानंतरही अनेक लाभ मिळतात. अशा हस्तरेषेमुळे तुम्हाला पैशाची चणचण भासत नाही. 

हाताच्या रेषा दर्शवतात तुमचं करिअर

अंगठ्याजवळून शनि पर्वताकडे जाणारी रेषा

जर रेषा तुमच्या अंगठ्याच्या  खालच्या बाजूने सुरू होऊन शनि पर्वताजवळ जात असेलल आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही नक्की त्यामध्ये  यशस्वी होऊ शकता. या रेषेवरून तुम्हाला अफाट पैसा मिळण्याचे संकेत आहेत. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक