चमचमीत वेगवेगळ्या चवीच्या नुडल्स बनवा घरच्या घरी (Noodles Recipe In Marathi)

Noodles Recipe In Marathi

घरी नेहमी नेहमी तेच तेच जेवण जेऊन कंटाळा येतो. मग अशावेळी बऱ्याचदा बाहेरून चायनीज नुडल्सची ऑर्डर करण्यात येते. पण तुम्ही घरच्या घरीही नुडल्स तयार करू शकता. नुडल्स त्यातील सॉसमुळे अधिक चविष्ट लागतात. अगदी तुम्ही नाश्त्यालाही देशी पद्धतीने नुडल्स करून खाऊ शकता. आपल्याकडे आता वेगवेगळी नुडल्सची रेसिपी (noodles recipe in marathi) असते. हाका नुडल्स (hakka noodles recipe in marathi), शेजवान नुडल्स (schezwan noodles recipe in marathi), चिकन नुडल्स (chicken noodles recipe in marathi), एग नुडल्स (egg noodles recipe in marathi) या तर अगदी सर्रास घरात करू शकतो. काही जणांना वाटतं की या नुडल्स घरात बनवणं (recipe of noodles in marathi) कठीण आहे. पण तसं अजिबात नाही. मुंबईत अनेक ठिकाणी असे स्ट्रीट फूड तुम्हाला नक्कीच चाखता येतं.  मात् आम्ही तुम्हाला या लेखातून काही चविष्ट आणि चमचमीत नुडल्सच्या रेसिपी देणार आहोत.

Table of Contents

  हाका नुडल्स (Hakka Noodles Recipe In Marathi)

  Instagram

  आपल्याकडे अगदी पारंपरिक चायनीज नक्कीच केले जात नाही. आपण त्यामध्ये आपल्याला हव्या त्या भाजी आणि सॉस मिक्स करून चायनीज बनवत असतो. सर्वात जास्त खाल्ला जाणारा नुडल्सचा प्रकार म्हणजे हाका नुडल्स (hakka noodles recipe in marathi). हॉटेलमध्ये गेल्यावर सर्रास आपण याची  ऑर्डर करतो. पण आपण घरीही अगदी सोप्या पद्धतीने आणि त्याच चवीच्या हाका नुडल्स बनवू शकतो 

  साहित्य 

  • हाका नुडल्स
  • पाणी 
  • किसलेले गाजर
  • चिरलेली कोबी
  • फरसबी बारीक कापून 
  • चिरलेला कांदा 
  • पातीचा कांदा
  • 9-10 सोललेल्या लसणीच्या पाकळ्या
  • सोया सॉस
  • चिली सॉस
  • रेड चिली सॉस
  • व्हिनेगर (व्हाईट)
  • मीठ चवीपुरते (अजिनोमोटो वापरू नये त्याऐवजी मीठ वापरावे)
  • तेल

  बनविण्याची पद्धत

  • हाका नुडल्स पाण्यात शिजवून घ्याव्या. शिजल्यावर त्यातून पाणी काढून टाकावे
  • एका पातेलीत तेल गरम करावे. त्यात कांदा, पातीचा कांदा, गाजर, कोबी, फरसबी, ठेचलेली लसूण घालावी आणि व्यवस्थित परतावे
  • लसणीचा घमघमाट यायला लागला की त्यात मीठ, वरून सोसा सॉस, चिली सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर घालून नीट परतावे 
  • हे एकत्र मिक्स झाले की वरून शिजलेले हाका नुडल्स घालून परतावे आणि दोन मिनिट्स व्यवस्थित वाफ देऊन गरमागरम खायला द्यावे. (तुम्हाला हवं असल्यास, इतर सॉससह तुम्ही टॉमेटो सॉसही यामध्ये मिक्स करू शकता. पण काही जणांना टॉमेटो सॉसची गोड चव त्यात आवडत नाही  त्यामुळे हे तुमच्या चवीनुसार तुम्ही ठरवावे)

  शेजवान नुडल्स (Schezwan Noodles Recipe In Marathi)

  Instagram

  हाका नुडल्सनंतर सर्वात जास्त कोणत्या चायनीज पदार्थाला मागणी असेल तर ती आहे शेजवान नुडल्सना (schezwan noodles recipe in marathi). हा पदार्थ लहान मुलांनाच नाही तर अगदी  मोठ्यांनाही खूपच आवडतो. घरी या नुडल्स कशा तयार करायच्या ते जाणून घेऊया. संध्याकाळच्या वेळात मात्र असे फास्ट फूड पदार्थ खाणे टाळा.

  साहित्य 

  • साध्या नुडल्स 
  • कापलेले गाजर
  • एक सिमला मिरची बारीक कापून
  • कापलेला एक कांदा 
  • चिरलेला कोबी 
  • 2 चमचे लसूण आणि लाल मिरची पेस्ट
  • 2 चमचे टॉमेटो सॉस
  • शेजवान सॉस
  • अर्धा चमचा काळी मिरी पावडर
  • 2 चमचे तेल
  • चवीनुसार मीठ

  बनविण्याची पद्धत 

  • सर्वात पहिले गॅसवर कढई ठेवा. त्यात तेल गरम करा
  • त्यामध्ये कांदा परतून घ्या. कांदा शिजत आल्यावर त्यात लसूण आणि लाल मिरची पेस्ट मिक्स करा आणि परतून घ्या 
   त्यामध्ये गाजर, कोबी, सिमला मिरची घालून थोडंसं वाफवा आणि मग त्यात मीठ घालून वरून टॉमेटो सॉस, शेजवान सॉस, काळी मिरी पावडर घालून शिजवा
  • नुडल्स वेगळ्या पातेल्यात शिजवून घ्या 
  • भाज्या  शिजत आल्यानंतर त्यात नुडल्स घालून मिक्स करा. नुडल्स खायला देताना त्यावरून सोसा सॉस, व्हिनेगर घालून द्या

  चिकन नुडल्स (Chicken Noodles Recipe In Marathi)

  Instagram

  नॉनव्हेज प्रेमींसाठी चिकन नुडल्स म्हणजे मेजवानीच. नुडल्स आणि चिकन शिजल्यावर येणारा सुगंध म्हणजे आहाहा...चिकन नुडल्सही तुम्हाला घरी बनवता येतात. फक्त त्याची योग्य पद्धत जमायला हवी. चिकनच्या स्टार्स्टर्सह हे नुडल्स मस्त लागतात.

  साहित्य 

  • साध्या नुडल्स 
  • 1 कप श्रेडेड चिकन 
  • 1 चिरलेला कांदा 
  • पातीचा कांदा 
  • 1 चमचा सोया सॉस
  • 1 चमचा टॉमेटो सॉस 
  • 1 चमचा चिली सॉस 
  • चवीनुसार मीठ 
  • तेल

  बनविण्याची पद्धत 

  • चिकन शिजवून श्रेड करून घ्या
  • एका कढईत तेल गरम करा आणि त्यात कांदा आणि पातीचा कांदा परतून घ्या
  • नुडल्स आधीच शिजवून घ्या
  • कांदा शिजत आल्यावर त्यात चिकन, मीठ घालून थोडं शिजू द्या
  • मग त्यावर नुडल्स, सोया, टोमॅटो आणि चिली सॉस घालून मिक्स करा
  • गरमागरम चिकन नुडल्स परतल्यावर तयार आहे

  एग नुडल्स (Egg Noodles Recipe In Marathi)

  Instagram

  नुसत्या व्हेजिटेबल नुडल्स खाण्यापेक्षा त्यात अंडे असेल तर त्याचा स्वाद भारीच. भरपूर भूक लागली असेल आणि चविष्ट हवं असेल तर एग नुडल्स हा चांगला पर्याय आहे. 

  साहित्य 

  • साध्या नुडल्स
  • एक अंडे 
  • पिरी पिरी 
  • एक चिरलेला कांदा 
  • आलं आणि लसूण बारीक चिरलेले
  • सोया सॉस
  • चिली सॉस 
  • व्हिनेगर 
  • चवीनुसार मीठ 
  • तेल

  बनविण्याची पद्धत 

  • अंडे फेटून घ्या 
  • नुडल्स शिजवून घ्या 
  • तेल कढईत गरम करा. त्यामध्ये कांदा आणि आलं, लसूण घालून परतून घ्या 
  • लसणीचा वास आल्यावर फेटलेले अंडे घाला आणि वरून शिजलेल्या नुडल्स घालून त्यावर सर्व सॉस मिक्स  करा आणि मीठ घाला
  • थोडेसे वाफवून तुमच्या एग नुडल्स तयार. त्यावर पिरी पिरी मिक्स करू शकता अथवा चिली फ्लेक्सही घालू शकता 
  • तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अंड्याचा पोळा आधी तयार करून तो नंतर नुडल्समध्येही मिक्स करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतीही पद्धत वापरावी

  स्पाईसी स्टर फ्राय नुडल्स (Spicy Stir Fry Noodles)

  Instagram

  स्पाईसी नुडल्सची मजाच काही वेगळी असते. यासाठी तुम्हाला घरच्या घरी तयारी करून पटकन नुडल्स तयार करता येतात.  

  साहित्य

  • नुडल्स 
  • 7-8 काजूचे तुकडे 
  • तेल
  • फरसबी
  • गाजर 
  • कोबी
  • बेबी कॉर्न 
  • ब्रोकोली 
  • लसणीच्या पाकळ्या चिरून 
  • चिरलेले आले 
  • सोया सॉस
  • चवीनुसार मीठ 
  • दोन सुक्या लाल मिरच्या 

  बनविण्याची पद्धत 

  • नुडल्स उकडून घ्या. त्यातील पाणी काढून टाका 
  • एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात काजू भाजून बाजूला ठेवा
  • त्यानंतर पुन्हा तेलामध्ये वरील सर्व चिरलेल्या भाज्या स्टर फ्राय करून घ्या. भाज्या थोड्या कच्च्या राहू द्या 
  • पुन्हा तेल गरम करून त्यात लसूण, मिरची आणि आल्याचे तुकडे घालून स्टर फ्राय करा. त्यामध्ये सॉस आणि मीठ घाला
   त्यानंतर नुडल्स आणि सर्व स्टर फ्राय केलेल्या भाज्या मिक्स करा. भाजलेले काजूही मिक्स करा आणि मग व्यवस्थित टॉस करून खायला द्या

  व्हेज नुडल्स (Veg Noodles)

  Instagram

  व्हेज नुडल्स बनवणं तर अगदी सोपं आहे. तसंच या पटकन तयार होतात आणि तुम्हाला जर घरात मुलांना भाजी खायला घालायची असेल तर व्हेज नुडल्स हा अत्यंत सोपा पर्याय आहे. या बनविण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही.

  साहित्य 

  • साध्या नुडल्स
  • पाणी 
  • किसलेले गाजर
  • चिरलेली कोबी
  • फरसबी बारीक कापून 
  • चिरलेला कांदा 
  • पातीचा कांदा
  • 9-10 सोललेल्या लसणीच्या पाकळ्या
  • सोया सॉस
  • चिली सॉस
  • रेड चिली सॉस
  • व्हिनेगर (व्हाईट)
  • मीठ चवीपुरते (अजिनोमोटो वापरू नये त्याऐवजी मीठ वापरावे)
  • तेल

  बनविण्याची पद्धत

  • नुडल्स पाण्यात शिजवून घ्याव्या. शिजल्यावर त्यातून पाणी काढून टाकावे
  • एका पातेलीत तेल गरम करावे. त्यात कांदा, पातीचा कांदा, गाजर, कोबी, फरसबी, ठेचलेली लसूण घालावी आणि व्यवस्थित परतावे
  • लसणीचा घमघमाट यायला लागला की त्यात मीठ, वरून सोसा सॉस, चिली सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर घालून नीट परतावे 
  • हे एकत्र मिक्स झाले की वरून शिजलेले नुडल्स घालून परतावे आणि दोन मिनिट्स व्यवस्थित वाफ देऊन गरमागरम खायला द्यावे. 

  चिली गार्लिक नुडल्स (Chili Garlic Noodles)

  Instagram

  तुम्हाला जर मुळमुळीत नुडल्स आवडत नसतील आणि अगदी देशी नुडल्स खायच्या असतील तर तुम्ही चिली गार्लिक नुडल्स घरच्या घरी बनवू शकता. चिली आणि गार्लिकचं योग्य प्रमाण असेल तर तुम्हाला या नुडल्सची चव नक्कीच आवडेल. 

  साहित्य 

  • पाच कप उकडलेल्या साध्या नुडल्स 
  • पातीचा कांदा
  • चिरलेला बारीक एक कांदा 
  • बारीक कापलेली लसूण 
  • दोन सुक्या मिरच्या 
  • सोया सॉस
  • रेड चिली सॉस
  • चिली व्हिनेगर अथवा व्हाईट व्हिनेगर
  • चवीनुसार मीठ
  • तिळाचे तेल वा रिफाईंड ऑईल

  बनविण्याची पद्धत 

  • पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. त्यात सुकी मिरची आणि लसूण परतून घ्या
  • त्यात पातीचा कांदा, चिरलेला कांदा घाला आणि नीट शिजवा 
  • त्यानंतर त्यामध्ये मीठ, सोसा सॉस, चिली सॉस आणि व्हिनेगर मिक्स करा 
  • वरून नुडल्स घालून हे मिक्स्चर नीट मिक्स करा आणि गरमागरम नुडल्स खायला द्या

  मलेशियन नुडल्स (Malasian Noodles)

  Instagram

  केवळ चायनीज नुडल्सच नाहीत तर मलेशियन नुडल्सही आपल्याकडे अगदी आवडीने खाल्ल्या जातात. पण या फक्त हॉटेलमध्येच मिळतात असं नाही तर तुम्हीही घरी या तयार करू शकता. 

  साहित्य

  • तेल
  • ठेचलेली लसूण 
  • कापलेला कांदा 
  • अर्धा कप सिमला मिरची
  • कापलेले गाजर 
  • एक चमचा लिंबाचा रस 
  • एक चमचा लाल मिरची पावडर
  • एक चमचा साखर
  • सोया सॉस 
  • भाजलेले शेंगदाणे
  • चवीनुसार मीठ
  • अर्धा कप पनीर
  • उकडलेले नुडल्स

  बनविण्याची  पद्धत 

  • एका नॉनस्टिक पॅनमध्ये तेल घ्या. त्यात लसूण आणि कांदा घालून परता. नंतर सिमला मिरची घालून वाफवा 
   मग त्यात गाजर घालून पुन्हा शिजवा
  • वरून लिंबाचा रस, लाल मिरची पावडर, शेंगदाणे, सोया सॉस, मीठ घालून नीट मिक्स करा 
  • त्यात वरून पनीरचे कापलेले तुकडे घाला आणि नीट मिक्स करून घ्या 
  • नंतर नुडल्स मिक्स करून नीट टॉस करा. तुम्हाला हवं तर तुम्ही आंबटपणासाठी यात व्हिनेगर घालू शकता

  क्रिस्पी फ्राईड नुडल्स (Crispy Fried Noodles)

  Instagram

  हॉटेलमध्ये गेल्यानंतर सूप पिताना आपल्याला क्रिस्पी फ्राईड नुडल्स घालून अधिक आवडतं. आपण हे नुडल्स नुसतेदेखील खातो. घरात करणे अत्यंत सोपे आहे

  साहित्य

  • 2 कप उकडलेले नुडल्स 
  • 2 चमचे कॉर्न स्टार्च अथवा कॉर्न फ्लोअर
  • तळण्यासाठी तेल

  बनविण्याची  पद्धत 

  • नुडल्स उकडून घ्या. पण नेहमीसारखे अति उकडू नका. थोडेसे कच्चट ठेवा 
  • त्यानंतर थोडे थंड होऊ द्या. एका भांड्यात काढून घेऊन त्यावर कॉर्न फ्लोअर पसरा आणि सर्व नुडल्सला लागले आहे की नाही याची खात्री करून घ्या
  • एका कढईत तेल घ्या आणि मध्यम आचेवर या नुडल्स तळा आणि नंतर खा अथवा सूपमध्ये घालूनही तुम्ही खाऊ शकता

  व्हेज सोबा नुडल्स (Veg Soba Noodles)

  Instagram

  आजकाल व्हेज सोबा नुडल्स जास्त प्रमाणात खाल्ल्या जात असलेले दिसून येते. याच्या चवीमुळे याची मागणी वाढत आहे. घरीच कशा तयार करायच्या या नुडल्स जाणून घेऊया 

  साहित्य 

  • 2 कप उकडलेले सोबा नुडल्स 
  • 2 चमचे तिळाचे तेल
  • कापलेले आलं आणि लसूण 
  • कापलेला कांदा 
  • सिमला मिरची 
  • गाजर
  • कोबी 
  • सोया सॉस
  • मध
  • साखर 
  • मीठ 
  • काळे तीळ

  बनविण्याची  पद्धत 

  • एका नॉनस्टिक कढईत तेल घ्या. त्यात आलं, लसूण, कांदा, सिमला मिरची नीट परतून घ्या
  • त्यानंतर त्यात गाजर आणि कोबी घाला. थोडे कच्चे ठेवा 
  • वरून साखर, मध, सोया सॉस आणि मीठ घाला आणि मग नुडल्स घालून परता 
  • गरमागरम नुडल्स डिशमध्ये घालून वरून काळे तीळ घाला आणि सर्व्ह करा

  प्रश्नोत्तरे (FAQ's)

  1. नुडल्स बनविण्यासाठी कोणते पीठ वापरावे?

  नुडल्स घरीच बनवायच्या असतील तर त्यासाठी मैदा वापरावा लागतो. मैदा व्यवस्थित भिजवून त्याच्या शेवया करून मग नुडल्स बनवाव्या लागतात.

  2. नुडल्स चिकट न होण्यासाठी काय करावे?

  नुडल्स शिजवताना याची खात्री करा की, तुम्ही जे पाणी घेणार आहात ते आधीच उकळवावे. ज्यामुळे नुडल्स चिकट होत नाहीत आणि व्यवस्थित उकडल्या जातात. तसंच यामध्ये आधीच तेल मिक्स करू नका

  3. माझ्या नुडल्स चिकट का होतात?

  बऱ्याचदा नुडल्स अति शिजवल्यामुळेही चिकट होतात. त्यामुळे नुडल्स उकडवताना आणि नंतरही स्टर फ्राय असो अथवा नुडल्स तयार करताना त्या जास्त शिजणार नाहीत याची काळजी घ्या.

  4. कोरड्या नुडल्स तळता येतात का?

  हो कोरड्या नुडल्स तळता येतात. तळताना आच मध्यम राहील याची मात्र काळजी घ्या. एकदम मंच आच अथवा अगदी अति आच ठेऊ नका.

  5. नुडल्स साधारण किती वेळ उकडून घ्याव्या?

  नुडल्स उकडण्यासाठी साधारण 8-10 मिनिट्स इतका वेळ हा योग्य आहे. यापेक्षा कमी अथवा जास्त काळासाठी नुडल्स उकडत ठेऊ नयेत. त्या चिकट होतात.

  Beauty

  WIPEOUT Sanitizing Wipes 25 Wipes Pack

  INR 159 AT MyGlamm

  तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक