वचन दिवस संदेश मराठीत (Promise Day Marathi Status)

Promise Day Marathi Status

व्हॅलेंटाईन विकमध्ये वेगवेगळे दिवस साजरे केले जातात आणि त्यापैकी एक महत्वाचा दिवस असतो तो म्हणजे वचन दिवस अर्थात प्रॉमिस डे (Promise Day In Marathi). या दिवशी आपण एकमेकांना वचन देऊन पुढील आयुष्य एकमेकांसह घालविण्याची स्वप्नं पाहत असतो. केवळ गर्लफ्रेड अथवा बॉयफ्रेडच नाही तर अगदी मित्रमैत्रिणीही आपल्या मैत्रिणीच्या आणाभाका या दिवशी  नक्कीच घेऊ शकतात.  पण अशा या प्रॉमिस डे साठी खास संदेशही तितकेच महत्वाचे आहेत ना आणि असे खास वचन दिवसाचे संदेश अर्थात प्रॉमिस डे मेसेज (Promise Day Messages in Marathi) आम्ही तुमच्यासाठी या लेखातून घेऊन आलो आहोत. यावेळी तुम्हाला आपल्या जिवलगांसाठी काही खास करायचं असेल तर मराठीतून खास वचन संदेश तुम्ही तुमच्या प्रियजनांकडे व्यक्त करा. तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी मराठीतून स्टेटस (Promise Day marathi status), कोट्स (Promise Day Quotes Marathi) ठेऊ शकता.  आजकाल अनेक प्रॉमिस डे शायरी (Promise day shayari in marathi),  इमेज (Promise Day Images Marathi) खूपच व्हायरल होताना दिसतात.  असेच काही खास संदेश तुमच्यासाठी.  

Table of Contents

  बॉयफ्रेंडसाठी प्रॉमिस डे स्टेटस (Promise Day Marathi Status)

  Promise Day Marathi Status

  व्हॅलेंटाईन म्हटलं (Valentine Day) की सर्वात पहिले बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड हेच नातं डोळ्यासमोर उभं राहतं. व्हॅलेंटाईनलाठी काय गिफ्ट द्यायचं हेदेखील ठरवलं जातं. त्याच्यासाठी प्रॉमिस डे च्या दिवशी जर तुम्हाला काही खास स्टेटस ठेवायचे असतील तर नक्कीच तुम्हाला या लेखाचा उपयोग होईल. प्रपोझ मेसेज तर खूप असतात पण त्याचबरोबर वचन देणंही महत्वाचं आहे.

  1. आजच्या दिवशी  एक वचन तुला माझ्याकडून, जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईन
  काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईन

  2. प्रत्येक क्षणी तुझ्यावरच करेन प्रेम हे माझे वचन आहे तुला, वचन कायम निभावेन हे देते वचन तुला - Happy Promise Day

  3. जेव्हा भेट होईल आपली एक वचन हवं आहे, याच जन्मी नाही तर प्रत्येक जन्मी मला तूच हवा आहेस

  4. चंद्राचा तो शीतल गारवा, मनातील प्रेमाचा पारवा 
  या नशिल्या संध्याकाळी हात तुझा हाती हवा...वचन दे तुला मला कधीही न ये हा दुरावा

  5. तुला ज्या ज्या क्षणी गरज असेल मी तुझ्याबरोबर असेन, आपल्या प्रेमाची शपथ आज वचन देते तुला 

  6. नाही आजपर्यंत बोलता आले,  आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे,
  नाही जगू शकत तुझ्याशिवाय,  इतके तुला सांगणार आहे -  - Happy Promise Day

  7. प्रेम कसं असतं ते मला बघायचं आहे, भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय 
  श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो, पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय -  Happy Promise Day

  8. तुला दिलेले प्रेमाचे वचन हे कधीही न मोडण्यासाठीच आहे, विश्वास ठेव माझ्यावर 
  तुझ्याशिवाय जगण्याला माझ्या अजिबातच अर्थ नाहीये, विश्वास ठेव 

  9. तुझ्या प्रेमात मी स्वतःला विसरने,  दिले तुला वचन 
  तुला कधी माझी परीक्षा घेऊन पाहायची असेल तर पाहा..मी दिलेली वचनं कधीच मोडत नाही - Happy Promise Day

  10. मी आज तुझ्यासमोर माझ्या प्रेमाचे वचन घेत आहे, 
  माझा श्वास असेपर्यंत  मी फक्त आणि फक्त तुझीच राहीन
  तुझ्याशिवाय  कोणाचाही विचार माझ्या  मनात येणार नाही 

  गर्लफ्रेंडसाठी प्रॉमिस डे मेसेज (Promise Day Messages In Marathi For Girlfriend)

  Promise Day Images Marathi

  गर्लफ्रेंडसाठी शब्द व्यक्त करण्यासाठी खूपच डोकं खाजवावं लागतं ना, मग खास तुमच्यासाठी या प्रॉमिस डे ला आम्ही गर्लफ्रेंडसाठी मराठी मेसेज घेऊन आलो आहोत. तुम्हीही पाठवा आणि करा तिला आनंदी. व्हॅलेंटाईन डे साठी प्रेमाचे संदेश असतात. त्यासाठी अनेक कोट्सही असतात. असेच प्रॉमिस डे साठीही काही खास वचनं.

  1. माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर मुलगी तूच आहेस. आज मी तुला वचन देतो की, मी फक्त तुझ्याशी लग्न करेन आणि इतर कोणालाही माझ्या आयुष्यात तुझी जागा देणार नाही 

  2. माझ्याकडून तुला जितके सुख देता येईल मी कायम देण्याचा प्रयत्न करेन हे माझे तुला वचन आहे

  3. कदाचित मी तुला खूप श्रीमंतीत ठेऊ शकणार नाही, पण माझ्या प्रेमाने मी तुला कायम सुखात ठेवेन हे माझ्याकडून तुला वचन आहे

  4. तुझ्या वडिलांनी तुला ज्याप्रमाणे जपलं आहे त्याप्रमाणेच जपायचा मी नक्की प्रयत्न करेन हे आज तुला वचन देत आहे

  5. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. तू आहेस  तर मी आहे, तुला आयुष्यात कायम असाच साथ देत राहीन हे माझं वचन आहे तुला. 

  6. फक्त हाच जन्म नाही तर पुढे कितीही जन्म मला मिळाले तर मी तुझाच असेन - Happy Promise Day

  7. माझा प्रत्येक क्षण हा फक्त आणि फक्त तुझ्या विचारासाठीच असेल वचन आहे तुला. आयुष्यभराची साथ मी निभावेन 

  8. तुझ्यासारखी मुलगी मला मिळाली हे माझं भाग्य आहे आणि माझं हे भाग्य माझ्यापासून कधीच दुरावणार नाही याची मी काळजी घेईन हे वचन आहे. 

  9. विश्वास, मन आणि वचन या तीन गोष्टी कधीही मोडायच्या नसतात आणि मी हे नेहमी लक्षात ठेवेन 

  10. तुझं मन कधीतरी माझ्याकडून चुकून दुखावलं जाईल पण तुझी साथ मात्र मी कधीही सोडणार नाही याची खात्री बाळग. माझं वचन आहे तुला

  11. फुलाच्या पाकळीप्रमाणे जपेन असं खोटं वचन मी तुला कधीही देणार नाही पण तुझ्या चेहऱ्यावरचे हसू कमी होऊ देणार नाही हे मात्र नक्कीच वचन देईन 

  12. देवाजवळून अजून काय मागू,  तुला माझ्या आयुष्यात आणले यापेक्षा जास्त काही चांगले असूच शकत नाही. तुला आयुष्यभर जपेन हे वचन 

  13. तुझ्यापासून कधीही दूर जाणार नाही हे आज वचन देतो तुला - Happy Promise Day

  14. तू कधीही मला सोडून जाण्याचा विचार जरी केलास तरीही मी तुला पुन्हा आपल्या  प्रेमाने जिंकून घेईन हे वचन आहे तुला माझे 

  15. आयुष्यभर असावी तुझीच साथ हीच एक इच्छा आहे, निभावेन तुझी साथ देतो वचन तुला आज - Happy Promise Day

  16. तू आहेस म्हणून मी आहे, तुझ्याइतकं प्रेम कोणीही करत नाही माझ्यावर याची मला जाणीव आहे. म्हणूनच तुला कधीही सोडून जाणार नाही हे माझं तुला वचन आहे 

  17. नुसतं येण्याचं वचन  देऊ नकोस,  कारण तुझ्या येण्याची वाट पाहून डोळे थकतात माझे.  तू प्रत्येक वचन पूर्ण करशील हे वचन दे मला - Happy Promise Day

  18. तू मिळाल्यावर काय हवंय मला अजून, फक्त  कधीही दुरावा येऊ देणार नाहीस इतकं वचन दे मला - Happy Promise Day

  19. मी एका हाताने सर्व दुनियेशी लढा देऊ शकतो. फक्त त्यासाठी दुसऱ्या हातात तुझा हात हवा,  तू मला कायम साथ देशील हे वचन दे आणि माझी तुला कायम साथ असेलच

  20. मी तुला कायम माझ्या मनात ठेवेन माझे वचन आहे तुला - Happy Promise Day

   

  बॉयफ्रेंडसाठी प्रॉमिस डे मेसेज (Promise Day Messages In Marathi For Boyfriend)

  Promise Day Images Marathi

  नेहमी गर्लफ्रेंडासाठीच मेसेज असायला हवेत असे काही नाही. प्रॉमिस डे ला गर्लफ्रेंडनेही आपल्या बॉयफ्रेंडला वचन देण्यासाठी काही मेसेज पाठवायचे असतील तर तुम्ही नक्की पाठवा 

  1. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. माझे वचन आहे तुला - Happy Promise Day

  2. आपले नाते अधिकाधिक घट्ट व्हावे यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन. तुला माझ्याकडून नेहमीच साथ मिळेल

  3. तुला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे त्यासाठी मी तुझ्याबरोबर कायम खंबीरपणे उभी राहीन हे वचन आहे तुला 

  4. फक्त वचन नाही तर कायम तुझ्याबरोबर राहून मी दिलेले वचन मी पाळेन हा माझा तुला शब्द आहे - Happy Promise Day

  5. केवळ बंद डोळ्यातच नाही तर अगदी उघड्या डोळ्यांनीही मी तुझ्यावर तितकंच प्रेम करत राहीन आणि कायम तुझी राहीन - Happy Promise Day

  6. कितीही कामात असले तरीही तुझी काळजी घेण्यासाठी मी नक्की वेळ काढेन माझं वचन आहे तुला 

  7. पैसा जगण्यासाठी गरजेचा असतो मान्य आहे, पण त्याहीपेक्षा अधिक महत्वाचा तू आहेस. कमी पैशात मी जगू शकते पण तुझ्याशिवाय नाही.  त्यामुळे तुला वेळ नक्की देईन - Happy Promise Day

  8. माझ्या प्रत्येक श्वासावर मरेपर्यंत तुझा आणि तुझाच हक्क असेल - Happy Promise Day

  9. स्वतःपेक्षाही तुझ्यावर जास्त  प्रेम करेन हे माझं तुला वचन आहे

  10. तुला जपणं हे माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि आज मी स्वतःच स्वतःला वचन देत आहे की, तुला मी नेहमी तुला जपणार आहे 

  11. निभावता येणार नाही असं वचन देऊच नकोस, पण तुझी साथ निभावण्याचं वचन मी माझ्याकडून तुला नक्की देत  आहे

  12. केवळ आणाभाका घेतल्या म्हणजे प्रेम पूर्ण होत असं  नाही. ते निभावावं लागतं आणि ते निभावण्यासाठी आणाभाकांचीही गरज असतेच. 

  13. मी तुझ्यापासून कितीही दूर असले तरीही प्रेम कायम निभावेन माझं वचन आहे तुला 

  14. माझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणालाही मी तुझी जागा घेऊ देणार नाही - Happy Promise Day

  15. तू मला विसरलास तरीही मी तुझी साथ सोडणार नाही - Happy Promise Day

  16. मला चंद्र आणि तारे आणून देण्याचं वचन नकोय,  तर कायम तू साथ देशील हेच वचन दे

  17. मला तुझ्या प्रेम,  काळजी आणि वेळेशिवाय अधिक काहीच नको, इतकंच वचन मला दे की, हे तू नक्की निभावशील

  18. मी तुला कधीही विसरणार नाही आणि कायम तुझ्यावर प्रेम करत राहीन - Happy Promise Day

  19. माझ्यासाठी तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचं इतर काहीही असणार नाही - Happy Promise Day

  20. वचन निभावण्याचे वचन मी तुला देते - Happy Promise Day

  व्हॅलेंटाईन डे हिंदी मध्ये कोट्स

  प्रॉमिस डे मेसेज बायकोसाठी (Promise Day Messages In Marathi For Wife)

  Promise Day Messages In Marathi For Wife

  बऱ्याचदा बायकोला गृहीत धरलं जातं. पण तिचा दिवस खास करायचा असेल तर तिला आनंद होईल असंच वचन तुम्ही दिला या प्रॉमिस डे च्या दिवशी द्या. 

  1. मी तुला कामात मदत करत नाही अशी तुझी तक्रार असते ना, मग मला जमेल तितकी आणि तशी मी तुला मदत करेन हे माझं वचन आहे तुला - Happy Promise Day

  2. तुझा रूसवा, तुझा फुगवा सगळं मंजूर आहे मला, पण मला कधीही सोडून जाणार नाहीस हे वचन दे मला 

  3. मी कितीही कामात असलो तरीही तुझी काळजी घ्यायला नक्कीच विसरणार नाही - Happy Promise Day

  4. मी तुला वेळ देत नाही ही तुझी तक्रार मला मान्य आहे, पण मला जेव्हा कधी वेळ मिळेल तो फक्त आणि फक्त तुझाच असेल हे वचन आहे तुला

  5. मी माझे सगळे जन्म हे फक्त आणि फक्त तुझा नवरा म्हणूनच जन्म घेईन - Happy Promise Day

  6. माझ्यासाठी तू सर्वस्व आहेस आणि मी कायम तुला जपणार आहे माझं वचन आहे तुला 

  7. तुझ्याइतकी प्रेमळ आणि मला समजून  घेणारी बायको मिळाली.  मला अजून काय हवं.  तुला आनंदी ठेवण्यासाठी मी सगळे प्रयत्न करेन - Happy Promise Day

  8. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोणाही येणार नाही - Happy Promise Day

  9. माझी मैत्रीण, माझं सर्वस्व, माझी बायको सर्व काही एकाच व्यक्तीत मी पाहतो आणि ती तू आहेस. मी हे कायम जपण्याचा प्रयत्न करेन - Happy Promise Day

  10. मी कायम तुझाच होतो, आहे आणि जन्मभर राहीन - Happy Promise Day

  प्रॉमिस डे मेसेज नवऱ्यासाठी (Promise Day Messages In Marathi For Husband)

  Promise Day Messages In Marathi For Husband

  नवरा म्हटलं की एक वेगळीच भावना मनात येते. त्याच्याभोवतीच सर्व आयुष्य गुंफलेले असते. पण बऱ्याचदा त्याच्याविषयी प्रेम व्यक्त केले जात नाही. आज प्रॉमिस डे च्या दिवशी त्याला तुमच्या मनातील भावना नक्की सांगा 

  1. तुझ्या त्रासाची सवय करून घेतली आहे मी, पण तुझ्या नसण्याची मला कधीही सवय होऊ देऊ नकोस. मी कायम तुझीच राहीन - Happy Promise Day

  2. आयुष्यात कितीही चढउतार येऊ दे. त्या प्रत्येक क्षणी मी तुझ्याबरोबर खंबीरपणे उभी राहीन आणि तुला साथ देईन - Happy Promise Day

  3. तू तुझी दिलेली वचनं नेहमी पाळशील हे आधी वचन दे 

  4. वेळ देऊन तू योग्य वेळी दिलेल्या ठिकाणी पोहचशील असं वचन तू मला दे 

  5. माझ्यासाठी तू सर्व काही आहेस आणि तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. मी आपल्यात कधीही दुरावा येऊ देणार नाही - Happy Promise Day

  6. फक्त नवरा म्हणून नाही तर माझा मित्र म्हणूनही मी तुझा कायम आदर करेन - Happy Promise Day

  7. मी कायम तुझ्यावर विश्वास ठेवेन, पण त्याला कधी तडा जाऊ देऊ नकोस - Happy Promise Day

  8. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे मी वेळोवेळी सांगत राहीन आणि तुला त्याची जाणीव करून  देईन - Happy Promise Day

  9. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे आणि मी जन्मभर तुला असाच त्रास देत राहीन 

  10. तू माझा नवरा आहेस  हे मी अभिमानाने जगाला नेहमी सांगत राहीन - Happy Promise Day

  घनिष्ठ मित्रांसाठी प्रॉमिस डे मेसेज (Promise Day Messages In Marathi For Best Friends)

  Promise Day Messages In Marathi For Best Friends

  मित्रांसाठी आपण कधीही मागे हटत नाही. या प्रॉमिस डे च्या दिवशी अशा घनिष्ठ मित्रांना द्या वचन.  

  1. सदैव पाठिशी उभा राहीन - Happy Promise Day

  2. मी नेहमी तुला समजून घेईन, इतर कोणी काही चुकीचं सांगत असेल तरी विश्वास ठेवणार नाही. कारण माझा तुझ्यावर खूपच विश्वास आहे - Happy Promise Day

  3. मी आयुष्यभर तुझी काळजी घेईन माझं वचन आहे तुला 

  4. तुझा हात जो आता कायम धरला आहे तो कधीही न सोडण्यासाठी - Happy Promise Day

  5. तुझ्या प्रत्येक गोष्टीत मी समसमान भागीदार असने, सुख असेल वा दुःख 

  6. ही दोस्ती तुटायची नाय - Happy Promise Day

  7. कितीही संकट आले तरीही मी तुझ्याबरोबर घट्ट पाय रोवून उभा राहीन - Happy Promise Day

  8. तुझ्याशिवाय या जगात माझा सच्चा आणि पक्का मित्र कोणीही नसेल हे माझं वचन आहे तुला 

  9. तुला जेव्हा जेव्हा माझी गरज असेल मी कायम तुझ्यासह असेन - Happy Promise Day

  10. मी सर्वगुणसंपन्न नाही पण तुझ्यासाठी कायम धावत येईन हे वचन आहे तुला

  प्रॉमिस डे शॉर्ट कोट्स (Promise Day Short Quotes In Marathi)

  Promise Day Marathi Status

  कधी कधी खूप मोठे मेसेज वाचायलाही कंंटाळा येतो. मग अशावेळी शॉर्ट  आणि स्वीट मेसेज नक्कीच हवेहवेसे वाटतात. यामध्ये भावनाही व्यक्त होतात आणि जास्ती वेळी जात नाही. व्हॅलेंटाईन विकमध्ये अनेक दिवस साजरे केले जातात. त्यापैकी एक प्रॉमिस डे आहे.

  1. तू माझी कायम साथ देशील मला वचन दे

  2. मी तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करेन तुला वचन आहे - Happy Promise Day

  3. कधी तुला रडावं वाटलं तर मला बोलाव, हसविण्याचं नाही पण तुझ्याबरोबर रडण्याचे वचन नक्की देते 

  4. चंद्र आणि सूर्य असेपर्यंत मी तुला साथ देईन - Happy Promise Day

  5. आपल्या नात्यात नेहमी तूच प्रथम असशील हे  माझं तुला वचन आहे

  6. मी तुझ्यावर कायम प्रेम करत राहीन - Happy Promise Day

  7. तू कायम राहण्याचं वचन दिलंस तर मी कधीही सोडून जाणार नाही हे वचन 

  8. तुला कधीही भूक लागली तरीही मी कायम तुला नुडल्स करून देईन हे माझं तुला प्रेमाचं वचन 

  9. कायम तुझीच मी - Happy Promise Day

  10. तुझा मी, माझी तू - Happy Promise Day

  मित्रमैत्रिणींसाठी प्रॉमिस डे कोट्स (Promise Day Quotes In Marathi For Friends)

  Promise Day Quotes In Marathi For Friends

  केवळ प्रेमासाठीच किंवा गर्लफ्रेंड अथवा बॉयफ्रेंड या नात्यातच वचनं दिली जातात असं नाही. तर आपल्या मैत्रीचे नाते हे सर्वात महत्वाचे असते. त्यासाठी अनेक आणाभाका घेतल्या जातात.  कारण मैत्रीशिवाय कोणाचंही आयुष्य पूर्ण  होऊ शकत नाही. असेच मित्रमैत्रिणींसाठी काही प्रॉमिस डे कोट्स 

  1. कधी कोणाला वचन देईन असं वाटलंही नव्हतं.  पण काय करणार तुझ्यासारखी मैत्रीण मला गमवायची नाहीये.  त्यामुळे आयुष्यभर ही मैत्री अशीच निभावेन हे माझ्याकडून तुला वचन - वचन दिवस शुभेच्छा 

  2. कदाचित ही वेळ कायम अशीच राहणार नाही, जसे आज आपण एकत्र आहोत तसे आपण उद्या एकत्र असूच असंही नाही. मैत्री मात्र कायम राहील. भेटू अथवा न भेटू ...मनात ही ज्योत उमलतच राहील. वचन आहे कायमच्या या मैत्रीचं. 

  3. आपण नशिबानेच भेटलो, आपण एकमेकांशी बोलायला लागलो हे कदाचित आपल्या नशिबात लिहून ठेवलं असेल. इतक्या वर्षांनी आजही आपली मैत्री आपण टिकवून ठेवली आहे आणि ती कायम तशीच राहील हे मात्र वचन आहे तुला. काहीही होवो आपली मैत्री कधीही तुटणार नाही

  4. कोणतीही परिस्थिती येवो,  आपल्यामध्ये कधीही कोणाला मी येऊ देणार नाही. माझ्यावर तुझा कायम हक्क असेल हे माझं वचन आहे तुला. आपली मैत्री अशीच निखळ राहील. 

  5. रक्ताच्या नात्यापेक्षा मला आपल्या मैत्रीचं नाते अधिक महत्वाचे आहे आणि त्याचं कारण म्हणजे तुझं माझ्यावर असलेले अतोनात प्रेम. तुझ्यासारखा मित्र फारच भाग्यवान लोकांना मिळतो आणि अशा भाग्यवान लोकांपैकी एक मी आहे.  ही मैत्री कधीही तुटू देणार नाही माझं वचन आहे तुला. 

  6. मैत्रीची एक गोष्ट चांगली असते की यामध्ये कोणत्याही मागण्या नसतात.  पण तरीही मला तुला वचन द्यायचं आहे की ही मैत्री मी कायम निभावेन - Happy Promise Day

  7. आपण नेहमीच खरे मित्र होतो,  आहोत  आणि राहू.  त्यासाठी वेगळं वचन द्यायची अथवा घ्यायची गरज नाही हे मला माहीत आहे. पण कधी कधी भावना बोलून दाखवल्या तरी त्यातील खोलपणा जाणवतो आणि म्हणूनच आपली मैत्री कायम अशीच राहावी यासाठी मी तुला वचन देत आहे. 

  8. वचन आहे की ही मैत्री मी कायम अशीच निभवेन, तुला कायम असंच छळत राहीन, दिवस असो रात्र असो कायम तुला त्रास देत राहीन. पण तितकंच तुझ्यावर प्रेम करेन आणि तुझी काळजी घेईन 

  9. मैत्री हा शब्दच एक प्रकारचं वचन आहे. ती जेव्हा तुझ्याशी केली तेव्हाच वचनबद्ध झालो. 

  10. आज स्वतःलाच एक वचन देत आहे. आयुष्यात कितीही नवे मित्रमैत्रिणी येवोत पण जुन्या मित्रमैत्रिणींना कधीही सोडणार नाही आणि विसरणार नाही

  पुढे वाचा - 

  Love Shayari in Hindi

  तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक