ADVERTISEMENT
home / आरोग्य
Shatavari Kalpa Benefits In Marathi

शतावरी कल्पचे फायदे आणि वापर (Shatavari Kalpa Benefits In Marathi)

प्राचीन काळापासून शतावरी ही आयुर्वेदिक वनस्पती औषधोपचारांचा वापरली जाते. शतावरीचा वापर अनेक आरोग्य समस्या दूर करण्यासाठी विशेषतः महिलांमधील वंधत्वावर उपाय करण्यासाठी केला जातो. शतावरी वेलस्वरूपात आढणारी वनस्पती आहे. या वेलींच्या मुळांचा वापर औषधासाठी केला जातो. एका एका वेलीला तीस ते शंभर सेंमी लांब आणि एक ते दोन सेमी रूंद मुळ्या असतात. शतावरीमध्ये व्हिटॅमिन ए, ई, के, बी 6, फॉलेट, लोह, कॅल्शिअम, फायबर्स आणि प्रोटिन्स असतात. एखाद्या कंदाप्रमाणे दिसणाऱ्या या मुळ्या अनेक आजारांवर उपचारासाठी वापरल्या जातात. यासाठीच जाणून घ्या शतावरी कल्पचे फायदे आणि कसा करावा वापर.

Benefits Of Shatavari Kalpa In Marathi

Instagram

शतावरी कल्पचे फायदे (Benefits Of Shatavari Kalpa In Marathi)

 

शतावरी कल्पचे अनेक आरोग्य फायदे आहेत. महिलांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शतावरीचा वापर केला जातो.

ADVERTISEMENT

अॅंटि ऑक्सिडंट गुणधर्म

 

शतावरीच्या मुळांमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमचे वातावरणातील फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते. या फ्री रेडिकल्समुळे शरीरावर दुष्परिणाम होत असतो. ज्यामुळे आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र शतावरी यापासून तुमचे रक्षण करते आणि तुम्हाला आरोग्य आणि मनस्वास्थ देते. जर एखाद्या गरोदर महिलेला या समस्येचा त्रास झाला तर त्यामुळे तिच्या होणाऱ्या बाळावर दुष्परिणाम होऊ शकतो. यासाठीच बाळासाठी प्रयत्न करणाऱ्या महिलांना गर्भधारणेआधी शतावरीचे उपचार केले जातात. 

महिलांची प्रजननक्षमता सुधारते

 

महिलांच्या शरीरात प्रत्येक टप्प्यावर शतावरी वरदान ठरते. शतावरीचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तिच्या सेवनामुळे महिलांच्या शरीरातील हॉर्मोन्स संतुलित होतात. मासिक पाळी नियमित होण्यासाठी, मासिक पाळीच्या समस्या कमी होण्यासाठी तर शतावरी फायद्याची आहेच. पण यासोबतच शतावरीमुळे महिलांच्या प्रजनन संस्थेतील अडथळे कमी होऊ शकतात. यासाठीच ज्या महिलांना गर्भधारणेमध्ये अडचणी येत असतात त्यांना शतावरीचा उपचार केला जातो.

पानफुटीचे फायदे आणि उपयोग

मॅनोपॉजची लक्षणे कमी होतात

 

मॅनोपॉज हा महिलांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. रजोनिवृत्तीचा काळ म्हणजे महिलांची पाळी जाण्याच्या काळ म्हणजे मॅनोपॉज. मॅनोपॉज एका दिवसात होत नाही त्यामुळे पाळी जाण्याच्या आधीची एक ते दोन वर्ष आणि पाळी गेल्यानंतरही एक ते दोन वर्ष असा चार ते पाच वर्षांचा काळ तो असू  शकतो. या काळात महिलांना मूड स्विंगचा त्रास जाणवतो. यामागे त्यांच्या शरीरात होणारे हॉर्मोन्स असंतुलन कारणीभूत असतात. मूड स्विंगमुळे त्यांना दैनंदिन कामेच नाही तर लोकांशी संवाद साधण्यासही त्रास होतो. अशा परिस्थितीत आराम मिळण्यासाठी शतावरी कल्प फायदेशीर ठरते. 

ADVERTISEMENT

गरोदर आणि स्तनपान देण्याऱ्या मातांसाठी लाभदायक

 

बाळ झाल्यावर नवमातांना दूध निर्मितीमध्ये बऱ्याचदा अडचणी येतात. वास्तविक सहा महिन्यांपर्यंत बाळाचे योग्य पोषण फक्त आईच्या दुधावरच होत असते. मात्र आईच्या स्तनात पुरेसं दूध निर्माण झालं नाही तर बाळाचे योग्य पोषण होत नाही. यासाठीच अशा मातांना दुधातून शतावरी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण शतावारीमुळे अशक्तपणा कमी होतो, रक्तप्रवाह सुधारतो, ताणतणावापासून मुक्ती मिळतो. ज्याचा  परिणाम मातेच्या दूध निर्मितीवर होतो. यासाठीच गरोदर आणि स्तनपान देणाऱ्या मातांना शतावरी कल्प दिले जाते.

प्रतिकार शक्ती वाढते

 

आयुर्वदात शतावरी प्रतिकार शक्ती वाढवणारी वनस्पती म्हणून ओळखली जाते. काही संशोधनानुसार शतावरीचे उपचार घेतल्यामुळे आजारपणाचा सामना करण्यासाठी शरीरात अॅंटि बॉडीज निर्माण होतात असं आढळून आलं आहे. ज्यामुळे कोणत्याही आजारापणात रूग्ण लवकर बरे होतात आणि त्याचे आरोग्य लवकर सुधारते.आजारपणातून लवकर बरे होण्यासाठी शरीरात पुरेशी प्रतिकार शक्ती असणं गरजेचं असतं. शतावरीने रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढते.

खोकला आणि कफ कमी होतो

 

काही संशोधनात प्राण्यावर कफावर उपचार करण्यासाठी शतावरीच्या रसाचा वापर करण्यात आला होता. तेव्हा त्या उपचारांनी कफ लवकर बरा झाल्याचे आणि खोकला कमी झाल्याचे आढळून आले होते. ज्यामुळे शतावरीचा वापर खोकल्यावर केला जाऊ लागला. कफाचे प्रमाण अती झाल्यामुळे खोकल्याचा त्रास होतो. मात्र शतावरीचा रस कफ नियंत्रित करते. ज्यामुळे खोकल्याचा त्रास हळू हळू कमी होतो असं या संशोधनात आढळलं होतं.

जुलाबावर उपचार करण्यासाठी

 

फार प्राचीन काळापासून शतावरी जुलाबावरील एक प्रभावी औषध म्हणून वापरले जाते. जुलाब अथवा अतिसारामुळे शरीरातील सर्व पाणी निघून जाते आणि रूग्णाला अशक्तपणा येतो. ज्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलेट अनियंत्रित होते आणि अंगात ताकद राहत नाही. मात्र डायरिआवर उपचार करण्यासाठी आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी शतावरीचे कल्प नक्कीच फायदेशीर ठरू शकते. 

ADVERTISEMENT

अल्सरवर उपचार करण्यासाठी

 

अल्सर म्हणजे तुमच्या पोटातील छोट्या आतड्याला झालेली दुखापत होय. अल्सर होण्यामागची कारणं अनेक असू शकतात. मात्र अल्सर हे खूपच वेदनादायक असून त्यामुळे रूग्णाच्या पोटात खूप दुखते. कधी कधी अशा परिस्थितीत आजार बळावून गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते. जसं की पोटात रक्तस्त्राव होणे अथवा पोटात जखम होणे वगैरे. अल्सर जर जास्त प्रमाणात त्रासदायक नसेल तर तो बरा करण्यासाठी आयुर्वेदिक शतावरीचा नक्कीच फायदा होऊ शकतो. 

मुतखड्याचा त्रास कमी करण्यासाठी

 

मुतखडा अथवा किडनी स्टोन ही समस्या आजकाल अनेक लोकांमध्ये आढळते. मूत्रमार्गात खडे झाल्यामुळे युरिनला स्वच्छ होत नाही. पोटात मूत्रसाठा झाल्यामुळे या परिस्थितीत पोटात दुखते आणि युरिन करताना खूप त्रास होतो. मूतखडे हे अन्नातील न विरघळणाऱ्या घटकांचा साठा झाल्यामुळे तयार होत असतात. मूतखडा किती मोठा आहे यावर त्या व्यक्तीला होणारा त्रास ठरत असतो. शतावरी कल्पामुळे मुतखडा तयार होण्याचे प्रमाण कमी होते. कारण यातील मॅग्नेशिअममुळे लघवीला व्यवस्थित होते आणि मुतखडा तयार होत नाही. 

रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी

 

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की मधुमेहींची समस्या वाढू लागते. टाईप 2 मधुमेहींना रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी औषधे आणि योग्य आहार घ्यावा लागतो. शतावरीने मधुमेहींच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवता येऊ शकते. कारण या औषधामुळे रूग्णाच्या इन्शुलीनच्या निर्मितीवर नियंत्रण मिळवता येते. मात्र यावर आजही संशोधन सुरू आहे. त्यामुळ मधुमेहींनी योग्य औषधोपचारांसोबतच शतावरीचे  सेवन करावे. 

अॅंटि एजिंग

 

वाढत्या वयासोबतच चेहऱ्यावर सुरकुत्या, डार्क सर्कल्स, फाईन लाईन्स सारख्या एजिंगच्या खुणा दिसू लागतात. मात्र शतावरी हे नैसर्गिक अॅंटि एजिंग आहे. काही संशोधनानुसार शतावरीच्या मुळांमध्ये तमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या, फाईन लाईन्स निर्माण करणारे फ्री रेडिकल्स कमी करणारे गुणधर्म असतात. शतावरीमुळे तुमच्या त्वचेतील कोलेजीनच्या निर्मितीवर नियंत्रण राहते. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अॅंटि एजिंगच्या खुणा कमी होतात आणि त्वचा चिरतरूण आणि सुंदर होते. 

ADVERTISEMENT

डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी

 

आजकाल डिप्रेशन ही एक खूप मोठी समस्या जगभरातील लाखो लोकांना सतावत आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधील ताणातून नैराश्य निर्माण होते. डिप्रेशनच्या आहारी गेलेल्या लोकांना त्यातून पुन्हा बाहेर काढणे अतिशय कठीण असल्यामुळे यावर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. आयुष्यातील ताणतणाव वेळीच कमी करण्यासाठी काही घरगुती उपचार उपयोगी पडू शकतात. शतावरी कल्प नियमित घेतल्यामुळे तुमचा ताणतणाव कमी होतो. कारण शतावरीमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट असतात. 

Shatavari For Depression

Instagram

 

ADVERTISEMENT

 

शतावरीचा कसा करावा वापर (Shatavari Kalpa Uses In Marathi)

शतावरी पावडर, कॅप्सुल्स, गोळ्या, लिक्विड अशा स्वरूपात आयुर्वेदिक दुकानात उपलब्ध असते. शतावरी हे एक नैसर्गिक आणि आयुर्वेदिक औषध असल्यामुळे ते ठराविक प्रमाणातच घ्यावे असं नाही. मात्र शतावरीचा एखाद्या आरोग्य समस्येसाठी वापर करायचा असेल तर त्यासाठी तज्ञ्जांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. साधारणपण पावडर स्वरूपात शतावरी दुधातून एक ते दोन चमचे दररोज घेण्याचा सल्ला दिला जातो. तर पाचशे मिलीग्रॅमच्या गोळ्या अथवा कॅप्सुल्स दिवसभरात एक ते दोन वेळा घेण्याचा सल्ला दिला जातो. शतावरीचा रस दिवसातून कमीत कमी तीन वेळा पाण्यातून चमचाभर घेण्यास सांगितले जाते. 

शतावरीचे दुष्परिणाम (Side Effects Of Shatavari In Marathi)

शतावरी आरोग्यासाठी अतिशय लाभदायकच आहे. पण म्हणतात ना कोणतीही गोष्ट कितीही चांगली असली तरी अतीप्रमाणात सेवन केल्यास त्रासदायक ठरू शकते. त्याचप्रमाणे शतावरीचे अतीसेवन आरोग्यास चांगले नाही.

  • अती प्रमाणात शतावरी सेवन केल्यास त्वचेवर अॅलर्जी होऊ शकते
  • अती प्रमाणात शतावरी खाण्यामुळे युरिनला घाणेरडा वास येतो
  • जर तुम्हाला आधीच कांदा अथवा लसणाची अॅलर्जी असेल तर तुम्हाला शतावरीमुळे त्रास होऊ शकतो
  • काही लोकांना शतावरीच्या अती प्रमाणामुळे ह्रदयाचे ठोके वाढल्याचा त्रास होतो
  • डोळ्यांना जळजळ, श्वास घेण्यास त्रास, चक्कर या समस्या शतावरीच्या दुष्परिणामुळे होऊ शकतात

Side Effects of Shatavari

ADVERTISEMENT

Instagram

शतावरी कल्पबाबत मनात असलेले प्रश्न (FAQ’s)

1. शतावरी कल्पने वजन वाढते का ?

शतावरीने वजन वाढत नाही, मात्र जर तुम्ही अंडरवेट अथवा अशक्त असाल तर तुम्ही तुमची शरीरप्रकृती सुधारण्यासाठी शतावरी कल्प नक्कीच घेऊ शकता. ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.

2. शतावरीने मासिक पाळी नियमित होते का ?

शतावरीमध्ये तुमची प्रजननसंस्था सुधारणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमची मासिक पाळी नियमित होते, हॉर्मोन्सचे कार्य सुरळीत होते. यासाठीच मासिक पाळी अनिमित असल्यास शतावरीचा उपचार केला जातो.

3. शतावरीमुळे गर्भधारणेतील अडचणी दूर होतात का ?

शतावरीमुळे तुमच्या प्रजनन क्षमतेला चालना दिली जाते. मासिक पाळी नियमित होण्यासाठी, हॉर्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी शतावरी कल्प फायदेशीर ठरते. ज्यामुळे पुढे गर्भधारणेतील अडचणी कमी होतात आणि गर्भधारणा होणे सोपे जाते.

09 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT