ADVERTISEMENT
home / मनोरंजन
Shivaji Maharaj Books In Marathi

आवर्जून वाचावीत छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तके (Shivaji Maharaj Books In Marathi)

शिवरायांचे आठवावे रुप…शिवरायांचा आठवावा प्रताप| छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राला लाभलेले असे आराध्यदैवत आहे. ज्यांच्या पराक्रमाची गाथा पिढ्यांपिढ्या अनेकांना प्रेरित करत आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सगळ्यांना कळावी यासाठी महाराजांवर साहित्य (Shivaji Maharaj Books In Marathi List) लिहिले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या प्रत्येक पराक्रमापर्यंत, त्यांच्या मावळ्याप्रती असलेल्या प्रेमापासून ते लोककल्याणापर्यंत सगळ्या गोष्टींच्या नोंदी (Shivaji Maharaj Books In Marathi) या साहित्यात करण्यात आलेल्या आहेत. महाराजांविषयी असलेले तुमचे प्रेम अधिक दृढ आणि अभ्यासबद्ध करण्यासाठी तुम्ही शिवाजी महाराजांचे पुस्तक वाचायला हवे. छत्रपती शिवरायांवर लिहिलेल्या साहित्याची आम्ही एक यादी केली आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रेमासाठी आणि त्यांचा संपूर्ण इतिहास (Shivaji Maharaj History In Marathi) जाणून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तके पुस्तके तुम्हाला नक्कीच मदत करतील. या शिवाय शिवाजी महाराजांचे सुविचार जाणून घ्यायला हवेत. चला करुया सुरुवात.

श्रीमान योगी (Shriman Yogi)

शिवाजी महाराज ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी व्यक्तिरेखा आहे. ज्यांची ख्याती संपूर्ण जगभरात पसरली आहे. रणजीत देसाई यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेले हे पुस्तक प्रत्येक मराठी घरात असायलाच हवे आहे. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीपासून या ऐतिहासिक कादंबरीला सुरुवात होते. महाराजांच्या आयुष्यातील पराक्रमाच्या गाथा आणि राज्यकर्ता म्हणून असलेले त्यांचे गुण या सगळ्याची प्रचिती या पुस्कात मिळते. शिवाजी महाराजांचे पराक्रमाचे किस्से अंगावर काटा आणल्यावाचून राहात नाही. महाराजांच गनिमी कावा, त्यांची हुशारी यामध्ये पाहायला मिळते.रणजित देसाई यांना शब्दबद्ध अशा सुंदर पद्धतीने केले आहे की हे पुस्तक रोमांचकाही वाटते. त्यामुळे श्रीमान योगी हे पुस्तक तुम्ही वाचायलाच हवे.

लेखक: रणजित देसाई
पब्लिकेशन: मेहता पब्लिकेशन
किंमत: 518 रुपये

वाचा – झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची माहिती

ADVERTISEMENT

शिवचरित्र (Shivcharitra)

वादविवाद आणि अभ्यासूवृत्ती अशी ओळख असलेले लेखक श्यामसुंदर मुळे यांच्या लेखांचा हा संग्रह असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रासंदर्भात  वादविषय निरीक्षणे व आग्रही मते मांडण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या अनेक लेखांमधून केला आहे. मासिंकामधून लिहिलेल्या लेखांचा हा एक संग्रह असून यामध्ये शिवचरित्रातील वादस्थळांचा विचार मांडला आहे. गेली अनेक वर्ष सुरु असलेल्या वादाचा परामर्श त्यांनी या पुस्तकात एकत्रितपणे मांडले आहे. त्यांच्या या पुस्तकातून त्यांची इतिहासाची (Shivaji Maharaj History In Marathi) आवड आणि सूक्ष्म बारकावे दिसून येतात. शिवाजी महाराजांविषयीच्या अनेक गोष्टींचा उलगडा तुम्हाला या पुस्तकात होईल. म्हणूनच तुम्ही या पुस्तकाचे वाचन करायला हवे.

लेखक: श्यामसुंदर मुळे
पब्लिकेशन: कॉन्टिनेंटल प्रकाशन
किंमत: 225 रुपये 

शककर्ते शिवराय खंड 1, 2 (Shakkarte Shivray Khand 1)

स्वराज्याची स्थापना करत शिवाजी महाराज रयतेचे राजा झाले. शिवपूर्वकालीन परिस्थिती अशी नव्हती. त्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा याच्या पहिल्या भागात पाहायला मिळतो. त्यानंतरच्या दुसऱ्या भागात शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कालखंडाचा आढावा तुम्हाला नक्की मिळेल. शिवजन्म, शहाजीराजांचे स्वप्न, विजापूरची मोहीम, आग्रातून सुटका,आदिलशहा आणि पोर्तुगीज या सगळ्या घटना वाचायला मिळतील.एकेक धडा हा उत्कंठा वाढवेल इतके नक्की

लेखक: विजय देशमुख
पब्लिकेशन: छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान, नागपूर
किंमत: 1350/-रुपये

ADVERTISEMENT

वाचा – मराठीतील हे दर्जेदार साहित्य तुम्ही आवर्जून वाचायलाच हवे

छत्रपती शिवाजी महाराज: जीवन रहस्य (Chatrapati Shivaji Maharaj : Jivan Rahasya)

शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे गोडवे गाण्यासाठी कितीही शब्द वापरले तरी ते अपुरे आहेत. पण कमीत कमी शब्दात शिवरायांच्या स्वराज्य मोहीमेतील महत्वाच्या घटना मांडण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केला आहे.  सहा विभागात विभागणी करुन हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. सोप्या आणि परिणामकारक अशा शब्दात याची मांडणी करण्यात आल्यामुळे हे पुस्तक तुम्हाला आपलेसे करुन घेते. त्यामुळे तुम्ही हे पुस्तक वाचाच. लेखकांनी प्रसिद्ध श्रीमानयोगी या पुस्तकाची प्रस्तावनादेखील लिहिली आहे.

लेखक : नरहर कुरुंदकर
पब्लिकेशन: देशमुख अँड कंपनी पब्लिशर्स लिमिटेड
किंमत: 60/-

रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज (Raytecha Raja Chartapati Shivaji Maharaj)

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची निर्मिती करुन मरगळलेल्या लोकांमध्ये नवचैतन्य भरण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. समाजातील वर्णद्वेष, जातिभेद या सगळ्यांना समाजातून काढून स्वराज्याचे स्वप्न मोठे करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करत रयतेचा राजा म्हणूनही त्यांनी वेगवेगळ्या गोष्टीला चालना देण्याचे काम छत्रपतींनी केले.  शिवाजी महाराजांनी माणुसकीला अधिक महत्व दिले. त्यांनी हिंदू- मुस्लिम किंवा जातींमधील भेदही केला नाही. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा शोध या पुस्तकात तुम्हाला नक्की लागेल. 

ADVERTISEMENT

लेखक: डॉ. उत्तम सावंत
पब्लिकेशन: निर्मल प्रकाशन
किंमत:  262/-  रुपये

शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र (Shivaji Maharajanche Arthashastra)

कोणत्याही संस्थेची उभारणी करणे ही सोपी गोष्ट नाही. शिवाजी महाराजांनी अवघ्या 3 लाख 6000 रुपयांना सुरु केलेली स्वराज्याची स्थापना पुढे जाऊन कोटींच्या घरात पोहोचली. महाराजांचे अर्थशास्र हा कायमच कुतुहलाचा विषय राहिला आहे.त्यावरच प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे. शिवकालीन चलन, शिवकालीन शिवराजमुद्रा काटकसर,विदेश व्यापार आणि उत्पन्न यांचा योग्य ताळमेळ बसवून शिवाजी महाराजांनी पायाभूत सुविधांची निर्मिती केली. जर तुम्हाला अर्थशास्त्राची माहिती घ्यायला आवडत असेल तर महाराजांच्या अर्थशास्त्राची माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल.

लेखक: प्रा. नामदेवराव जाधव
पब्लिकेशन: राजमाता प्रकाशक
किंमत: 187/-रुपये

हिंदवी स्वराजाचे संस्थापक छत्रपती शिवाज महाराज (Hindavi Swarajyache Sansthapak Shivaji Maharaj)

शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या एक- एक गोष्टी तुम्हाला वाचायच्या असतील तर तुमच्यासाठी हे पुस्तक आहे. सोप्या आणि समजेल अशा शब्दात त्यांनी शिवाजी महाराजांची ओळख आपल्याला या पुस्तकातून करुन दिली आहे. स्वराजाच्या स्थापनेपासून ते महानिर्वाणापर्यंत सगळ्या घटना यामध्ये प्रकरणाच्या स्वरुपातून मांडण्यात आल्या आहेत. महाराजांचा इतिहास (Shivaji Maharaj History In Marathi) छोट्या छोट्या प्रकरणातून वाचायचा असेल तर तुम्ही हे पुस्तक घेऊन वाचायलाच हवे. लहान मुलांना छोटछोट्या प्रकरणाच्या माध्यमातून शिवाजी महाराज नक्की कळतील.

ADVERTISEMENT

लेखक: अशोकराव शिंदे सरकार
पब्लिकेशन: सह्रयाद्री प्रकाशन संस्था
किंमत: 105/- रुपये

गनिमी कावा (Ganimi Kava)

स्वराज्याची स्थापना हे काही साधेसोपे काम नव्हते. मावळ्यांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. पण मावळ्यांची संख्या कमी असतानाही शिवाजी महाराजांनी हे यश कसे मिळवले याचे उत्तर आहे त्यांचा गनिमी कावा. शत्रूसोबत लढण्याचे त्यांचे हे तंत्र जाणून घेणे फार गरजेचे आहे. शिवाजी महाराजांची सेन्य रचना आणि व्यवस्था, गनिमी काव्याची शिस्त, लढण्यासाठीच्या ठिकाणाची निवड या सगळ्या गोष्टी या रणणितीचा भाग आहे. या पुस्तकात शिवरायांच्या पहिल्या लढाईपासून लालमहातील पराक्रम या शिवाय विविध मोहिमा याबद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे.

लेखक: नामदेवराव जाधव
पब्लिकेशन: राजमाता प्रकाशन
किंमत: 399/- रुपये

छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य (Chatrapati Shivaji Maharaj Samrajya)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहीमा आणि त्यांच्या पराक्रमाविषयी इत्यंभूत माहिती देणारा असता हा संग्रह असून साम्राज्यातून शिवाजी महाराजांचा विस्तार याबद्दल अधिक माहिती देण्याचा उत्तम प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. शहाजी राजे आणि शिवाजी महाराज यांच्या यशाचा आढावा घेणारे हे पुस्तक असून महाराजांचे किल्ले आणि मोहीमा यांची उत्तम माहिती यामध्ये देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

लेखक: नीरज साळुंके
पब्लिकेशन: लोकायत प्रकाशन
किंमत: 187/- रुपये

राजा शिवछत्रपती (Raja Shivaji – Babasaheb Purandare)

बाबासाहेब पुरंदरे यांचा शिवाजी महाराजांविषयीचा अभ्यास फारच दाणगा आहे.शिवाजी महाराजांविषयची अभिमान आणि प्रेम त्यांच्या प्रत्येक शब्दातून ओतप्रोत दिसून येते. बाबासाहेब पुरंदरे यांनी अगदी पुर्वाधापासून यामध्ये सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्या काळात नेऊन उत्कंठा निर्माण करणारी अशी ही कादंबरी आहे.  या पुस्तकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी छत्रपतींनी घराघरात जाऊन पोहोचले. प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक असून घरात हा संच असायला हवा. भगव्याची झिंग काय होती ती तुम्हाला या पुस्तकातून नक्की कळेल.

लेखक: बाबासाहेब पुरंदरे
पब्लिकेशन: पुरंदरे प्रकाशन
किंमत: 1107/-  रुपये

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला ?

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म तारखेबद्दल बरेच गोंधळ असले तरी देखील शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाबद्दल काहीही गोंधळ नाही. छत्रपती शिवाजी महाराज शहाजी राजे आणि जिजामाताचे पूत्र असून त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.

2. शिवाजी महाराजांवर लिहिलेले उत्तम साहित्य कोणते ?

छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक साहित्य आतापर्यंत लिहिले गेले आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य प्राप्तीचा अनुभव या सगळ्यातून आपल्याला वाचायला मिळतो. पण लेखक बाबासाबहेर पुरंदरे यांनी लिहिलेले राजा शिवछत्रपती आणि रणजीत देसाई यांचे ‘श्रीमानयोगी’ हे पुस्तक तुम्ही वाचायलाच हवे.

3. गनिमी कावा म्हणजे काय ?

गनीम या शब्दापासून गनिमी कावा या शब्दाची निर्मिती झाली आहे. गनीम हा शब्द मूळ फारसी भाषेतील आहे. गनीम याचा अर्थ शत्रू आणि कावा याचा अर्थ ‘कपट’. शत्रुवर केलेला कपटहल्ला या अर्थाने आता प्रचलित आहे. शिवाजी महाराज हे शक्तीपेक्षाही अधिक युक्तीने काम घ्यायचे. शत्रूवर मात करण्यासाठी जे योजना ते आखायचे त्याला गनिमी कावा असे म्हणतात. अनेकांनी गनिमी कावा हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना नक्कीच वाचला असेल आणि शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा अंदाजही आला असेल.

09 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT