मासिक पाळीचा त्रास होईल कमी, आहारात सोयाबीनचा करा वापर

मासिक पाळीचा त्रास होईल कमी, आहारात सोयाबीनचा करा वापर

सोयाबीनमध्ये अनेक पोषक घटक असतात. यात प्रोटिन्सचे प्रमाण भरपूर असल्यामुळे शाकाहारी लोकांसाठी ते अतिशय पोषक ठरते. सोयाबीनपासून टोफू अथवा सोया मिल्क बनवलं जातं. सोयाबीन सीड्स, सोयाबीन तेल आणि सोयाबीनपासून बनवलेले इतर पदार्थ आहारात असायला हवे. कारण त्यामुळे अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका मिळू शकते. सोयाबीनमध्ये प्रोटिन्ससोबतच मिनरल्स, व्हिटॅमिन्सही असतात. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते, मधुमेहींसाठी सोयाबीन खाणं सोयाबेन तेलाचे फायदे खूपच फायदेशीर ठरतं. एवढंच नाही सोयाबीन खाण्याने तुमच्या मासिक पाळीच्या समस्या दूर होऊ शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा सोयाबीन कधीच कच्चं खाऊ नये. त्याचप्रमाणे सोयाबीन चंक्सचा भाजीसाठी वापर करण्यापूर्वी ते काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा.  यासाठीच जाणून घ्या सोयाबीन खाण्याचे फायदे आणि तोटे 

सोयाबीनचे फायदे

सोयाबीन कसं  खावं आणि त्याचे आरोग्यावर काय काय परिणाम होतात हे प्रत्येकाला माहीत असायला हवं.

मासिक पाळीच्या समस्या कमी होतात

सोयाबीन खाण्यामुळे तुमच्या मासिक पाळीतील अनेक समस्या दूर होतात. सोयाबीनमुळे शरीरातील एस्ट्रोजीनची पातळी संतुलित राहते. जर एस्ट्रोजीनची पातळी कमी झाली तर महिलांना अंगदुखी सारखे अनेक त्रास जाणवतात. ज्या महिलांना मासिक पाळीतही अंगमेहनतीची अथवा कष्टाची कामं करावी लागतात. अशा महिलांच्या आहारात सोयाबीन असणं खूप गरजेचं आहे.

सोयाबीन दूधमुळे हाडे मजबूत होतात

सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स आणि कॅल्शिअम असतात. हाडे मजबूत होण्यासाठी याची शरीराला गरज असते. ज्या लोकांना आर्थ्राटीस सारखे गंभीर हाडांचे विकार आहेत. त्यांनी आहारात सोयाबीनचा वापर केल्यास चांगला आराम मिळू शकतो. शिवाय सोयाबीनमध्ये फॅट्स आणि कॅलरिज कमी असतात. ज्यामुळे तुमचे वजन वाढत नाही. 

मधुमेहींसाठी अतिशय उत्तम

मधुमेहींना नेमकं काय खावं हा प्रश्न नेहमीच सतावत असतो. कारण मधुमेहींच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या ह्रदय, किडनी, मेंदूवर होऊ शकतो. सोयाबीन खाण्यामुळे मधुमेंहीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित तर राहतेच. शिवाय त्यामुळे त्यांचे कोलेस्ट्रॉल वाढत नाही. यासाठीच मधुमेहींनी नियमित सोयाबीन पासून बनवलेल्या पोळ्या खाव्या. गव्हात सोयाबीन मिसळून दळलेलं पीठ पोळ्यांसाठी वापरल्यास चांगला फायदा होऊ शकतो. 

ह्रदयाचे आरोग्य सुधारते

सोयाबीन खाण्यामुळे ह्रदयाच्या अनेक समस्या कमी होतात. ह्रदयाचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल कमी आणि गुड कोलेस्ट्रॉल योग्य प्रमाणात असण्याची गरज असते. कारण कोलेस्ट्रॉल मुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो आणि ह्रदयाच कार्य सुरळीत होत नाही. सोयाबीनमध्ये गुड कोलेस्ट्रॉल असते. ह्रदयाचे कार्य चांगले राहण्यासाठी शरीराला याचा चांगला फायदा होतो. सोयाबीनमध्ये असलेल्या लेसीथीनमुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचून राहत नाही. म्हणूनच ह्रदयविकार असलेल्या लोकांनी सोयाबीनचा आहारात अवश्य वापर करावा. 

एनिमिया अथवा अशक्तपणा कमी होतो

एनिमिया अथवा अशक्तपणामुळे अनेकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येतात. मात्र अशा लोकांनी नियमित सोयाबीनची भाजी खाल्लास चांगला फायदा होऊ शकतो. कारण त्यामुळे त्यांच्या शरीरातील लाल रक्त पेशीतर वाढतातच शिवाय हाडेही मजबूत होतात. शरीराचा योग्य विकास करण्यासाठी सोयाबीन हा एक चांगला पर्याय आहे. कारण त्यामुळे तुमच्या मांसपेशी, नखं, हाडे, केस मजबूत होतात

सोयाबीन खाण्याचे दुष्परिणाम

जसे सोयाबीन खाण्याचे अनेक फायदे आहेत तसेच त्याचे काही दुष्परिणामही आहेत. कोणत्याही गोष्टीचे आहारात अधिक प्रमाणात सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम जाणवतात. सोयाबीनचेही अधिक प्रमाणात सेवन करणे त्रासदायक ठरू शकते.

  • जर तुम्ही गरोदर असाल अथवा स्तनपान देणाऱ्या नवमाता असाल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्लानुसारच सोयाबीनचे सेवन करा. 
  • सोयाबीनमुळे स्पर्म काऊंट कमी होण्याची शक्यता असते. यासाठी जर तुम्ही बाळासाठी प्लॅनिंग करत असाल तर सोयाबीनचा वापर आहारात प्रमाणातच करा.