ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
डोळ्यांना मसाज करुन घालवा डोळ्यांचा थकवा

डोळ्यांना मसाज करुन घालवा डोळ्यांचा थकवा

डोळे’ हे चेहऱ्यावरील सगळ्यात महत्वाचा भाग आहे. डोळे प्रसन्न असतील तर चेहरा प्रसन्न दिसतो. पण जर डोळ्यांचा भाग अनाकर्षक आणि थकलेला असेल तर असा चेहरा मुळीच चांगला दिसत नाही. सतत फोनचा वापर, लॅपटॉपचा वापर यामुळे दिवसभर डोळ्यांवर किरणांचे आघात होत असतात. आरशात नीट निरखून बघा. तुमचेही डोळे चेहऱ्याच्या तुलनेत असेच अनाकर्षक वाटू लागले असतील तर तुम्हाला डोळ्यांना आराम देण्याची गरज आहे. डोळ्यांना आराम देण्यासोबतच तुम्ही त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. डोळ्यांना आराम देण्यासाठी अगदी घरच्या घरीच तुम्हाला मसाज करता येईल. या मसाजमुळे तुम्हाला आराम तर मिळेलच शिवाय डोळ्यांच थकवाही दूर होईल.

डोळ्यांच्या आजाराकडे कधीही करु नका दुर्लक्ष येईल अंधत्व (Eye Problems In Marathi)

गोलाकार मसाज

डोळ्यांना पहिला करण्यासारखा सोपा मसाज म्हणजे गोलाकार मसाज. एखादे चांगले मॉश्चरायझर घेऊन ते तर्जनी आणि मधल्या बोटावर घ्या. डोळे बंद करुन शांतपणे ही बोटं डोळ्यांवर गोलाकार दिशेने फिरवत राहा. साधारण 5-5 वेळा ही स्टेप्स करा. क्लॉक वाईज- अँटी क्लॉक वाईज तुम्हाला ही क्रिया करुन घ्या. असं केल्यामुळे डोळे एकदम शांत होतात. डोळ्यांच्या आजुबाजूची निस्तेज त्वचा चांगली दिसू लागते. 

डोळ्यांवर करा टॅप

बोटांच्या मदतीने करण्यासारखा आणिखा एक मसाजचा प्रकार म्हणजे डोळ्यांना करा टॅप. बोट स्वच्छ करुन मगच हा मसाज करा. डोळ्यांवर टॅप करताना डोळे बंद करुन अगदी हळुवारपणे डोळ्यांवर टॅप करा. असे केल्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. डोळ्यांना दोन- चार वेळा टॅप करुन शांत करा. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि छान झोपही लागते. 

ADVERTISEMENT

इन अँड आउट

इन अँड आउट

Instagram

इन अँड आऊट हा डोळ्यांचा मसाजही डोळ्यांसाठी फारच चांगला आहे . हा मसाज करण ही डोळ्यांसाठी एकदम चांगला आहे. बोट एकत्र करुन चार बोट डोळ्यांवर ठेवून द्या. बोटांना एकत्र बाहेर आणा. बोट उचलून पुन्हा एकदा डोळ्यांच्या कडांकडे पुन्हा एकदा न्या. असे किमान 5 वेळा तरी करा. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. 

डोळ्याची पापणी नक्की का फडफडते, जाणून घ्या कारणं

ADVERTISEMENT

क्रिस आय मसाज

डोळ्यांवर असलेल्या लाईनला क्रिस लाईन असे म्हणतात. ही क्रिसलाईन डोळ्यांसाठी फारच महत्वाची असते.  क्रिसलाईन आणि डोळ्यांचा मसाज करण्यासाठी तुम्ही मसाजरचा उपयोग करु शकता. क्रिसलाईनचा मसाज केल्यामुळेही थोडेसे शांत वाटते. डोळ्यांना आराम करा. क्रिस लाईन मसाजमुळेही फार बरे वाटते. 

डोळ्यांवर ठेवा गरम कपडा

डोळ्यांवर ठेवा गरम कपडा

Instagram

चेहऱ्याला वाफ जसे तुम्ही घेता अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला एखादा टर्किश टॉवेल पाण्यात  भिजवून तो डोळ्यांवर ठेवा. हा कपडा ठेवल्यानंतर तुम्हाला अगदी वाटत असेल तर डोळ्यांव हलक हलका दाब देऊन मसाज करा. डोळ्यांच्या खालच्या बाजूला मसाज करुन घ्या.त्यामुळे आराम मिळेल. 

ADVERTISEMENT


आता डोळ्यांचा थकवा घालवायचा असेल तर अशा पद्धतीने डोळ्यांची काळजी घ्या. त्यामुळे डोळे नक्कीच प्रसन्न दिसतील. 

डोळ्यांना येणाऱ्या रांजणवाडीवर हे करा घरगुती उपाय (Home Remedies For Ranjanwadi)

22 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT