लग्न करण्याआधी जोडीदाराकडून घ्या गोष्टीची खात्री

लग्न करण्याआधी जोडीदाराकडून घ्या गोष्टीची खात्री

लग्न करण्याचा विचार असेल आणि लग्नासाठी तुम्ही जोडीदाराची निवड केली असेल तर काही गोष्टींची खात्री लग्नाआधीच करणे फार गरजेचे असते.  लग्नासाठी जोडीदार आवडल्यानंतर त्या काळासाठी आपण प्रेमाच्या अशा नावेत असे स्वार असतो की बऱ्याच महत्वाच्या गोष्टी विचारणे विसरुन जातो.तुम्ही कोणाच्या प्रेमात असाल आणि लग्नाचा विचार करत असाल तर प्रेमाला थोडेसे बाजूला ठेवून थोडा प्रॅक्टिकल विचार करायला घ्या. कारण जर तुम्ही या गोष्टी आधीच जाणून घेतल्या नाहीत तर त्याचे दूरगामी परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.जाणून घेऊया लग्न किंवा रिलेशनशीपसाठी प्रेमासोबत काहीबाबतीत प्रॅक्टिकल असणे का गरजेचे असते आणि नेमक्या कोणत्या गोष्टींची तुम्ही चौकशी करायला हवी.

लग्नात सुंदर दिसण्यासाठी सर्व नववधूंनी फॉलो कराव्यात या हेल्थ टिप्स

घर, नोकरी या विषयीची माहिती

Instagram

प्रेम कितीही आंधळे असले तरी देखील ते इतके आंधळे नसावे की, ज्यामुळे तुमचे भविष्य अंधारात येईल. ज्या घरी तुम्ही तुमचे आयुष्य घालवण्याचा विचार करत आहात. त्याच्या विषयीची सगळी माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. जोडीदाराची नोकरी, त्याचा पगार आणि त्याचे राहते घर याविषयीची अधिक माहिती तुम्ही आधीच जाणून घ्यायला हवी. बरेचदा चांगले स्थळ मिळवण्यासाठी खूप जण  खोटी माहिती देतात. घराविषयी, नोकरीविषयी बरेचदा खोटे सांगितले जाते. याची खातरजमा इतर कोणाकडूनही करण्यापेक्षा स्वत: याची खात्री करुन घ्या.नोकरी,हुद्दा, पगार आणि घराबद्दलची सगळी माहिती तुम्हाला असणे हा तुमचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही ही सगळी माहिती खूप वाहण्याआधीच जाणून घ्या. प्रेम असेल तर या गोष्टी महत्वाच्या नाहीत असे म्हटले जातात. पण याच गोष्टी तुम्ही आनदी राहणार की नाही हे ठरवतात. 

लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहायचं आहे, मग या गोष्टी ठेवा लक्षात

लग्नाआधीचे प्रेमसंबध

कोणाचेही लग्नाआधी प्रेमसंबंध असणे मुळीच वाईट नाही. पण लग्नाआधी असलेले तुमचे प्रेम संबंध तुम्ही जोडीदाराला सांगणे फार गरजेचे असते. तुम्ही ज्या मुलाला निवडले आहे. त्या मुलाचे भूतकाळात जर कोणाशी प्रेमसंबंध असतील तर ते नव्या जोडीदाराला सांगण्यास काहीच हरकत नाही. जर एखाद्या मुलाने तुम्हाला त्याच्या भूतकाळातील काही गोष्टी सांगितल्या असतील तर ही फार चांगली गोष्ट आहे. पण एखाद्याने त्याच्या भूतकाळातील गोष्टी लपवल्या असतील तर त्या पुढे जाऊन अधिक त्रासदायक ठरु शकतात. त्यामुळे यागोष्टी तुम्ही नक्कीच जाणून घ्या किंवा आधीच विचारा कारण या गोष्टी नंतर कळल्यानंतर त्याचा खूप त्रास होतो.

डेस्टिनेशन वेडिंग बजेटमध्ये करायचे असेल तर असे करा प्लॅनिग

स्वभाव आणि सवयी

Instagram

एखाद्याचा स्वभाव हा काही दिवसात किंवा काही भेटीतून कळत नाही. त्यासाठी तुम्हाला काही वेळ त्याच्यासोबत घालवावा लागतो. पण सतत भेटल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी या जाणवू लागतात. एखाद्याची चिडचिड, रोमँटीक अंदाज, खाण्याची आवड, नावडत्या गोष्टी याचा अंदाज येतो. यासगळ्या स्वभावाच्या गोष्टी तुमच्याशी जुळल्या तरच तुमचे नाते पुढे जाते. पण या स्वभाव आणि आवडीनिवडीच्या गोष्टींबरोबर एखाद्या गोष्टीचे व्यसन असेल तर त्याची माहिती जाणून घ्या. एखाद्या गोष्टीचे व्यसन हे पुढे जाऊन कोणते रुप धारण करेल सांगता येत नाही. त्यामुळे अगदी आवर्जून त्या व्यक्तीला कोणते व्यसन आहे ते जाणून घ्या.


लग्न करण्याआधी तुम्ही या काही गोष्टी नक्की जाणून घ्या.