ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
Turpentine Oil Uses In Marathi

टरपेंटाईन तेलाचे फायदे तुम्हाला करतील आश्चर्यचकित (Turpentine Oil Uses In Marathi)

रंग काम करताना टरपेंटाईन असा शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल. घरात रंगकाम करायचे असेल तेव्हा रंगाला सैल करण्यासाठी टरपेंटाईन आणले जाते. टरपेंटाईनचा एक ठराविक असा सुंगध असतो. घरात रंग काम केल्यानंतर तो हमखास जाणवतो. टरपेंटाईन तेल देवदार या झाडाच्या सालीपासून काढले जाते. हिंदीमध्ये या तेलाला तारपीन तेल असे देखील म्हटले जाते. सुंगधी तेल म्हणून याची ओळख असली तरी याचा वापर सहसा केला जात नाही. पण टरपेंटाईन तेलाचे आणखी काही फायदे (turpentine oil uses in marathi) आहेत जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील. जाणून घेऊया टरपेंटाईन तेलाचे काही आश्चर्यकारक फायदे

टरपेंटाईन तेल म्हणजे काय? (What Is Turpentine Oil)

टरपेंटाईन तेल

Instagram

ADVERTISEMENT

टरपेंटाईन तेलाचा शोध इसवी सन 1605 मध्ये पहिल्यांदा करण्यात आला. पाईन झाडापासून अर्थात देवदारच्या झाडापासून याची निर्मिती करण्यात आली. टरपेंटाईन तेलामध्ये टर्पेनिन आणि इतर काही खनिजांचा समावेश असतो. टरपेंटाईन या तेलाचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जाऊ लागला. उद्योगधंद्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी टरपेंटाईन तेलाचा वापर केला जातो. टरपेंटाईन तेल हे सुगंधी असल्यामुळे याचा वापर साबण आणि इतर सुगंधी गोष्टींसाठी केला जातो. टरपेंटाईन तेलाचे काही आणखीही उपयोग आहेत ज्याचा वापर तुम्ही नक्कीच करु शकता. 

टरपेंटाईनचे तेलाचे फायदे (Benefits Of Turpentine Oil)

टरपेंटाईनचे तेलाचे फायदे

Instagram

ADVERTISEMENT

टरपेंटाईन तेलाचा उपयोग फारसा केला जात नाही. त्यामुळे कितीही शोधले तरी त्याचे फार फायदे सापडत नाहीत. पण काहींनी केलेल्या अभ्यासानुसार टरपेंटाईन तेलाचे काही फायदे आहेत. जे जाणून घेऊया. (पण याचा उपयोग करताना काही सावधानता बाळगायला हवी. कारण या फायद्याची हमी POPxo मराठी देत नाही)

बुरशीला ठेवते दूर Help To Get Rid Of Fungus)

कोणत्याही बुरशीला आणि किडण्याच्या प्रक्रियेला दूर ठेवण्याचे काम टरपेंटाईन करते. पण याचा उपयोग हा केवळ लाकडी काम  किंवा घरकामातील काही गोष्टींमध्ये करता येतो. खाद्यपदार्थांमध्ये याचा उपयोग अजिबात केला जात नाही. ज्या गोष्टींना बुरशी लागण्याची शक्यता असते अशा ठिकाणी याचा उपयोग केला जातो. पण याचा उपयोग करताना तुम्ही एक्सपर्टचा सल्ला घेणेही आवश्यक असते. 

दातांचे दुखणे करते कमी (Toothache)

दातांचे दुखणे कमी करण्यासाठीही टरपेंटाईन तेलाचा वापर केला जातो.  टरपेंटाईन तेलाच्या दुप्पट ऑलिव्ह ऑईल घेऊन एकत्र केले जाते आणि मग ते दातांवर लावले जाते. त्यामुळे दात दुखीपासून आराम मिळतो. यामध्ये टरपेंटाईन तेलाची मात्रा ही फार कमी असायला हवी. कारण जास्त टरपेंटाईन तेलाचा वापर हा आरोग्यासाठी मुळीच चांगला नाही. त्यामुळे त्याचा वापर जपून करा.

वाचा – निलगिरी तेलाचे फायदे

ADVERTISEMENT

मांसपेशीचे दुखणे करते कमी (Muscle Pain)

मांसपेशीच्या दुखण्याने त्रस्त असाल तर त्याच्यासाठीही टरपेंटाईन तेलही उत्तम आहे. तुमच्या सांध्यांवर तेल थेट घेऊन लावा आणि थोडा मसाज करा. त्यामुळे नक्कीच तुम्हाला आराम मिळेल. त्यामुळे तुम्हीही याचा वापर करु शकता. पण याचा सतत वापर करु नका.

अंगदुखी (Body Pain)

अंगदुखीसाठीही टरपेंटाईन तेल हे फारच फायद्याचे असते. शरीराचा जो भाग दुखत आहे त्या ठिकाणी तुम्ही टरपेंटाईन तेल लावा. त्यामुळे अंगदुखी कमी होण्यास नक्कीच मदत मिळते. त्यामुळे अंगदुखीसाठीही याचा वापर करु शकतो. अन्य कोणत्याही तेलाचा वापर करुन तुम्ही त्याने मसाज करु शकता. त्यामुळे तुम्हाला नक्की आराम मिळेल.

ताप आणि सर्दी (Flu And Cold)

विक्स किंवा बाम ज्या पद्धतीने तुमच्या सर्दीवर काम करतात अगदी त्याचपद्धतीने थोडेसे टरपेंटाईन हुंगल्यामुळे छातीतील सर्दी कमी होण्यास मदत मिळते. पण याचा अति वापर शरीराला इतर त्रास देण्यास भाग पाडू शकते. त्यामुळे त्याचा वापर फारच बेताने आणि जपून करायला हवा. जर तुम्हाला कसली अॅलर्जी असेल तर याचा वापर मुळीच करु नका. 

ADVERTISEMENT

टरपेंटाईनचे तोटे (Side Effect Of Turpentine)

टरपेंटाईनचे तोटे

Instagram

टरपेंटाईन तेलाचे जसे काही फायदे आहेत. तसेच त्याचे काही तोटे आहेत. ते तोटे जाणून घेऊन मगच त्याचा वापर करायचा की नाही हे तुम्ही जाणून घ्यायला हवेत.

निद्रानाश (Insomnia)

टरपेंटाईनच्या अति वापराचा परिणाम झोपेवर होतो. याचा सुंगध इतका जास्त असतो की,त्याची सणक डोक्यात जाऊन बसते. सतत टरपेंटाईन तेलाच्या संपर्कात आल्यामुळे निद्रानाश होण्याचा त्रास होऊ शकतो. त्याचा अति वापर हा शरीरावर हळुहळू परिणाम दाखवू लागतो. त्यामुळे निद्रानाशाचा त्रास तुम्हाला सहन करायचा नसेल तर  टरपेंटाईनचा वापर हा अगदी प्रमाणात आणि योग्य सल्ल्यानुसार होणे फारच गरजेचे असते. 

ADVERTISEMENT

मेंदू दुखी (Brain Pain)

ज्या प्रमाणे निद्रानाशासाठी कारणीभूत टरपेंटाईन ठरते. अगदी त्याच पद्धतीने मेंदूचे काही विकार होण्यासाठीही टरपेंटाईन कारणीभूत असते. टरपेंटाईनच्या सतत संपर्कात राहिल्यामुळे मेंदू दुखी किंवा मेंदूचे काही आजार होण्याची दाट शक्यता असते. मेंदू हे शरीराचे कार्य उत्तम सुरु ठेवण्यासाठी जबाबदार असते.जर त्याच कार्यामध्ये अडथळा येत असेल तर अशा गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. टरपेंटाईन तेलामुळे अनेकदा मेंदू संदर्भात विकार जोडलेले आहेत. त्यामुळे त्याचा वापर टाळणे अधिक चांगले

डोकेदुखी (Headache)

टरपेंटाईन तेलाच्या सतत वापरामुळे डोकेदुखीचा त्रासही होण्याची शक्यता असते. अनेकांना हा त्रास झालेला जाणवलेला आहे. ज्यांचा टरपेंटाईनशी सतत संपर्क येतो त्यांना त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे त्रास दिसून आलेले आहेत. त्यामुळे हा एक त्रास टरपेंटाईनचा वापर केल्यामुळे अगदी हमखास होऊ शकतो. त्यामुळे सतत टरपेंटाईनचा वापर हे टाळणे कधीही चांगले

कफ (Cough)

टरपेंटाईनचा आरोग्याशी निगडीत आणखी एक तोटा म्हणजे याच्या संपर्कामुळे शरीरात कफ साचण्याची शक्यता अधित असते. कदाचित काही  वेळा खूप जणांची शरीर प्रवृत्ती ही कफ जन्य असल्यामुळे ती तशी जाणवून येत नाही. पण कफ असण्याचा त्रासही अनेकांना होऊ शकतो. कफचा त्रास थांबला नाही तर सर्दी, खोकला, पडसं, डोकेदुखी, अंगदुखी असे काही प्रदीर्घ परिणाम अगदी हमखास शरीरावर दिसून येतात.

उलट्या (Vomiting)

काही जणांना काही वासाची अॅलर्जीच असते. उदा. डिझेलचा वास जरा जरी आला तरी काही जणांना उलट्या यायला सुरुवात होते. पण अगदी तसाच त्रास हा अनेकांना टरपेंटाईनच्या बाबतीतही होऊ शकतो.याच्या वासानेच अनेकांना मळमळायला होते. त्यामुळे हा एक त्रासही टरपेंटाईनमुळे होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला वासाची अॅलर्जी असेल तर तुम्ही याचा वापर मुळीच करु नका. 

ADVERTISEMENT

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

FAQ’s

1. टरपेंटाईन तेल आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?

वेगवेगळ्या देशात टरपेंटाईन तेलाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. वेगवेगळ्या स्पेलिंग टरपेंटाईनसाठी लिहल्या जातात. पण त्याला टरपेंटाईन तेल असेच म्हणतात. त्यामुळे टरपेंटाईनला या एकाच नावाने ओळखले जाते. गुगल केल्यानंतर तुम्हाला टरपेंटाईन तेलाची अन्यही काही नावं कळू शकतील.

2. टरपेंटाईन हे अँटिसेप्टिक आहे का?

टरपेंटाईन तेलाचे असे काही फायदे आहेत ज्यामुळे ते काही दुखण्यावर चांगलेच कामी येते असे दिसून येते. पण हे मानवी वापराच्या दृष्टिकोनातून फारच घातक असल्यामुळे त्याचा वापर कितपत करणे योग्य आहे हे सांगणे फारच कठीण आहे

3. टरपेंटाईनची अॅलर्जी होऊ शकते का?

होय, टरपेंटाईनच्या वापरामुळे काही अंशी एलर्जी होण्याची शक्यता असते. त्याच्या वापरामुळे त्वचेवर अॅलर्जी होऊ शकतात. रॅशेश येणे, त्वचेला खाज सुटणे, त्वचा सुजणे असे काही त्रास टरपेंटाईनमुळे होण्याची शक्यता असते.

25 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT