अतिशय संवेदनशील असतात कन्या राशीच्या व्यक्ती, कसा आहे स्वभाव जाणून घ्या

अतिशय संवेदनशील असतात कन्या राशीच्या व्यक्ती, कसा आहे स्वभाव जाणून घ्या

कन्या राशीच्या (Virgo) व्यक्तींचा जन्म हा 23 ऑगस्टपासून ते 22 सप्टेंबरपर्यंत मानला जातो. अर्थात या कालावधीत जन्म झालेल्या व्यक्तींची रास इंग्रजी महिन्यानुसार कन्या असते. या राशीचा स्वामी हा बुध आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती या अत्यंत दयाळू आणि नाजूक असतात. लहानसहान बाबतीत या व्यक्ती खूपच सावधानता बाळगतात. फिटनेसच्या बाबतीत या व्यक्ती अत्यंत सतर्क असतात. ऐकतात सर्वांचे पण करतात मात्र आपल्या मनाचे. आपल्या साधेपणामुळे या व्यक्ती कोणालाही आपलंसं करून घेतात. या व्यक्तींना अनेक व्यक्ती आदर्श मानतात. तुमच्या जवळच्यांपैकी कोणतीही व्यक्ती कन्या राशीची असेल तर बघा आहेत का त्या व्यक्तींमध्ये आम्ही सांगितलेली ही वैशिष्ट्ये. जाणून घ्या अधिक कन्या राशीविषयी.

जन्मभर एकमेकांना साथ देतात ‘या’ चार राशीच्या व्यक्ती

कन्या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव (Virgo sign people Positive and Negative Characteristics in Marathi)

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येकाच्या जन्म, वेळ हे सर्व वेगळे असते.  सूर्यराशीनुसार ज्यांनी रास कन्या आहे त्यांची वैशिष्ट्ये आम्ही या लेखातून तुम्हाला सांगत आहोत. तुमच्याही जवळच्या व्यक्तींपैकी अथवा मित्रमैत्रिणींपैकी कोणी कन्या राशीचे असेल तर नक्की जाणून घ्या त्यांची वैशिष्ट्ये.  

या राशीच्या व्यक्ती असतात धडाकेबाज (Brave & Courageous Zodiac Signs In Marathi)

 • या व्यक्तींच्या आसपास असणाऱ्या व्यक्तींंना वाटतं की या व्यक्ती अतिशय शांत आणि कमी बोलणाऱ्या आहेत.  पण या व्यक्तींची निरीक्षण शक्ती अफाट असते.  या व्यक्तींना स्वतःमध्ये मग्न राहणे आवडते. अति गर्दी या व्यक्तींंना आवडत नाही
 • कन्या राशीच्या व्यक्तींना दुसऱ्या व्यक्तींबरोबर सामावून जायला वेळ लागतो.  अधिक काळापासून जवळ असणाऱ्या व्यक्तींसह या व्यक्ती अतिशय मजेशीर असतात.  पण ओळख नसलेल्या व्यक्तींशी या व्यक्तींना बोलायला त्रास होतो
  या व्यक्ती काही अंशी कंटाळवाण्या असतात.  पण जवळच्या मित्रमैत्रिणी असलेल्यांसाठी मात्र या व्यक्ती अप्रतिम असतात. यांना फिट राहण्याचा आणि उत्तम दिसण्याचा नाद असतो. बाकी गोष्टींमध्ये  या व्यक्तींचा कमी रस असतो
 • कन्या राशीच्या व्यक्ती अधिक स्वरुपात फिटनेस फिल्ड करिअरमध्ये निवडतात.  नोकरी मिळताना या व्यक्तींना थोडा त्रास होतो.  सगळ्यांचे ऐकून स्वतःचा योग्य निर्णय घेण्यावर या व्यक्तींंचा विश्वास असतो.  मात्र या व्यक्ती सहसा कोणाचे मन दुखावत नाहीत. त्यामुळेच या व्यक्तींना  अनेक जण आपला आदर्श मानतात 
 • प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती अत्यंत नॉटी आणि खोडकर असतात.  आपल्या जोडीदारांकडून या व्यक्तींना खूपच अपेक्षा असते. त्यामुळेच यांना  जोडीदार जरा उशीराने सापडतात आणि लग्नही बरेच उशीरा होते
 • आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठीही या व्यक्ती खूपच उशीर लावतात.  या राशीच्या व्यक्ती पटकन सेटल होत नाहीत. तसंच आपल्या मनातल्या गोष्टी पटकन बोलून दाखवत नाहीत.  तुम्ही या व्यक्तींसह बरीच वर्ष असाल आणि तुमची काळजी या व्यक्ती न सांगता घेत असतील तर समजून जावे या व्यक्तींसाठी तुम्ही महत्त्वाच्या आहात.  पण शब्दातून व्यक्त होणे या व्यक्तींना  सहसा जमत नाही
 • कन्या राशीसाठी मकर राशीच्या व्यक्ती या परफेक्ट मॅच आहेत. या दोन्ही पृथ्वी तत्वाच्या  राशी आहेत. त्यामुळे दोन्ही राशींच्या स्वभावात समानता असते.  या दोन्ही राशीच्या व्यक्ती अत्यंत जबाबदार असतात.  एकमेकांमध्ये कोणतेही वाद विवाद असतील तर ते सोडवणं या दोन्ही व्यक्तींना सहज सोपे असते. भावनिक,  रोमँटिक आणि प्रॅक्टिकल या तिन्ही गोष्टी या मकर आणि कन्या राशीमध्ये असतात.  त्यामुळे एकमेकांना या राशी कायम साथ देतात
 • कन्या राशीच्या व्यक्तींचे हे वैशिष्ट्य आहे की,  त्या व्यक्ती कोणताही निर्णय हा स्वतःच्या विचारानेच घेतता आणि आपल्या मेहनतीने नाव कमावतात. कोणतेही काम हातात घेतले तर ते पूर्ण  केल्याशिवाय या व्यक्तींना चैन पडत नाही
 • कन्या राशीच्या व्यक्तींचे डोके हे अत्यंत शार्प आणि हुशार असते.  प्रत्येक समस्येवर यांच्याकडे तोडगा असतोच.  चालते फिरते गुगल असे या व्यक्तींना म्हटले तर वावगे ठरणार नाही. या व्यक्तींसारखी हुशारी असावी असं प्रत्येकालाच वाटतं
  या व्यक्ती मनात खूप गोष्टी साठवून ठेवतात. आपल्याला वाटणारे दुःखही कधी या व्यक्ती सांगत नाहीत.  पण समाजासमोर नेहमी हसतमुख राहतात. अप्रतिम डोळे आणि बोलण्याची  ढब यामुळे सर्वांनाच आपलंसं करून घेण्यात या व्यक्ती माहीर आहेत.  याच कारणामुळे यांचा चाहतावर्ग मोठा असतो
 • या राशीच्या व्यक्ती उतावीळ स्वभावाच्या असतात.  स्वतःचे चांगले वाईट समजून घेण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे यांना आयुष्यात  खूपच धोका मिळतो. कोणीही उलटउलट बोललं तर या व्यक्तींचा स्वतःवर ताबा राहत नाही 

सिंह राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास असतो भारी, जाणून घ्या स्वभाव

भाग्यशाली क्रमांक  – 4, 5, 16, 90, 29

भाग्यशाली रंग - ब्राऊन, निळा आणि हिरवा 

भाग्यशाली वार - बुधवार

भाग्यशाली खडा - पाचू 

कन्या राशीचे बॉलीवुड स्टार्स  - करीना कपूर, अक्षय कुमार, रणबीर कपूर, आयुष्मान खुराना, नेहा धुपिया, विवेक ओबेरॉय, शबाना आझमी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक