ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
अंघोळ करताना तुम्ही शॉवरखाली धुता का चेहरा, जाणून घ्या दुष्परिणाम

अंघोळ करताना तुम्ही शॉवरखाली धुता का चेहरा, जाणून घ्या दुष्परिणाम

तुम्हाला शॉवरखाली तुमचा चेहरा धुण्याची सवय आहे का? असं असेल तर ही सवय ताबडतोब बदला. कारण यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. शॉवरखाली चेहरा धुतल्यामुळे तुमच्या त्वचा पेशींचे नुकसान होते. त्वचा कोरडी पडून ती सैल आणि निस्तेज दिसते. शिवाय शॉवरचं पाणी अती गरम अथवा अती थंड असतं. ज्यामुळे तुमच्या त्वचेचे पोअर्स ओपन होतात आणि ते पुन्हा बंद न झाल्यामुळे बाथरूममधील बॅक्टेरिआसोबत त्यांचा थेट संबध येतो. जीवजंतूमुळे तुमच्या चेहऱ्यावर पिपंल्स, अॅलर्जी होण्याचा धोका निर्माण होतो. शॉवर घेतल्यावर लगेचच फेसवॉशने वॉशबेसिनमध्ये चेहरा धुणं गरजेचं असतं. असं केलं नाही तर तुमच्या चेहऱ्याचं नुकसान टाळणं नक्कीच कठीण होऊन बसतं. 

शॉवरखाली चेहरा धुण्याचे दुष्परिणाम –

शॉवर खाली चेहरा धुणं अतिशय चुकीचं असून त्यामुळे तुमच्या पुढील समस्या जाणवू शकतात. यासाठी जाणून घ्या हे दुष्परिणाम आणि व्हा सावध.

 

चेहऱ्यावरील नैसर्गिक तेल कमी होणे

शॉवरचं पाणी बऱ्याचदा खूप गरम असतं. हिवाळ्यात अशा गरम पाण्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटू शकतं. मात्र हे पाणी थेट चेहऱ्यावर घेतल्यामुळे तुमच्या चेहऱ्याचं नुकसान नक्कीच होऊ शकतं. गरम पाण्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि त्वचेवरील नैसर्गिक तेल निघून जातं. नैसर्गिक तेलामुळे तुमच्या त्वचेचं जीवजंतू, वातावरणापासून संरक्षण होत असतं. त्वचेचं हे संरक्षण कवच कमी झाल्यामुळे पुढे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. यासाठीच अंघोळ करताना चेहऱ्यावर गरम पाण्याचे सिंचन होणार नाही याची काळजी घ्या.

ADVERTISEMENT

चेहऱ्यातील मॉईस्चराईझर कमी होते

खूप वेळ शॉवरखाली अंघोळ करणं चेहऱ्यासाठीच नाही तर तुमच्या संपूर्ण शरीरावरच्या त्वचेसाठी धोकादायक आहे. कारण  जितका वेळ तुम्ही शॉवरखाली राहाल तितकं तुमच्या चेहऱ्यावरील मॉईस्चराईझरचा थोर कमी होत जाईल. चेहऱ्यावरील त्वचेत फॅटी अॅसिड, तेल, सिरम असतं. पण जर तुम्ही बराच वेळ शॉवरखाली असाल तर ते मुळापासून निघून जातं. यासाठीच दहा ते पंधरा मिनिटांपेक्षा जास्त काळ चेहरा शॉवरखाली असता कामा नये. 

त्वचेचं इनफेक्शन

शॉवरचं पाणी ते खूप वेगाने शरीरावर पडत असतं. चेहऱ्यावरच्या त्वचापेशींसाठी ते मुळीच योग्य नाही. कारण यामुळे त्या दुखावल्या जातात आणि त्याचं नुकसान होतं. त्वचापेशींचे नुकसान झाल्यास त्वचेला इनफेक्शनचा धोका पटकन निर्माण होऊ शकतो. यासाठी अंघोळ करताना शॉवरखाली चेहरा नेण्यापेक्षा पाठ ठेवा. शॉवरखाली केस धुतल्यामुळे शॅम्पूमधील केमिकल्स, केसांचा कोंडा यांचा संपर्क चेहऱ्यावरील त्वचेशी येतो आणि त्वचेला इनफेक्शनचा धोका निर्माण  होतो. यासाठी या गोष्टींची काळजी घ्या आणि मगच शॉवरचा आनंद लुटा.

चेहऱ्यावर पिंपल्स येतात

चेहरा शॉवरखाली धरल्यामुळे अती गरम अथवा अती थंड पाण्यामुळे चेहऱ्यावरील पोअर्स ओपन आणि लॉक होतात. याचा परिणाम असा होतो की त्वचेवरील धुळ त्वचेच्या छिद्रांमध्ये बंद होते. यासाठीच अंघोळ झाल्यावर लगेचच वॉश बेसिनमध्ये तुमचा चेहरा चांगल्या फेशवॉशने धुवा. ज्यामुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होईल आणि त्वचेचे पोअर्स बंद होतील. असं  केलं नाही तर त्वचेवर पिंपल्स निर्माण होऊ शकतात.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

चेहरा धुण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का

नारळपाण्याने चेहरा धुवा आणि त्वचेच्या समस्यांपासून मुक्त व्हा

जाणून घ्या दिवसभरात कितीवेळा करायला हवा चेहरा क्लिन

ADVERTISEMENT
23 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT