प्रवासात पिंपल्स येण्याची १० कारणे

प्रवासात पिंपल्स येण्याची १० कारणे

प्रवास करायला तुम्हाला आवडत असेल तर आजचा विषय तुमच्यासाठी फारच महत्वाचा आहे. बरेचदा प्रवासात चांगले फोटो काढण्याची इच्छा असते आणि नेमकं त्याचवेळी आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यामुळे फोटो काढण्याची सगळी इच्छा मरुन जाते.तुम्हीही येत्या काळात प्रवासाला जाणार तर तुमच्यासाठी हा विषय फारच महत्वाचा आहे. कारण इतर वेळी कधीही पिंपल्स येत नसतील पण प्रवासातच तुम्हाला असा त्रास होत असेल तर त्यामागे काही कारणं आहेत. प्रवासात नेमके पिंपल्स का येतात याची काही कारणं आम्ही शोधून काढली आहेत. ती जाणून घेतली तर तुम्हाला पिंपल्स येण्याआधीच काळजी घेता येईल.

उष्णता वाढतेय.. त्वचेच्या या समस्यांपासून दूर राहण्यासाठी अशी घ्या काळजी

या 10 कारणांमुळे तुम्हाला येऊ शकतात पिंपल्स

 •  प्रवासात खाण्याची अशी निश्चित वेळ नसते. मजा मजा करण्यामध्ये आपण इतके दंग असतो की, जे मिळेल ते त्यावेळी खातो. विशेषत:  स्नॅक्स हे असे पदार्थ आहेत जे कधीही खाल्ले जातात. चिप्स, फरसाण, चॉकलेट असं काहीसं चटपटीत खात तुम्ही प्रवास करत असाल तर थोडी काळजी घ्या. कारण हात धुण्याचा तितकासा वेळ प्रवासात मिळत नसल्यामुळे तेच हात अनावधानाने चेहऱ्यावर फिरवले जातात. या पदार्थांचे तेल त्वचेला लागते त्यामुळे पिंपल्स येण्याचा त्रास होतो. 

 • त्वचा सतत मॉश्चराइजर असणे गरजेचे असते. बरेचदा प्रवासादरम्यान आपल्या त्वचेची काळजी घेणारे ब्युटी प्रॉडक्ट लावता येत नाहीत. त्यामुळे त्वचा कोरडी होते. त्वचेवर सतत उन आणि धूळ, माती चिकटल्यामुळेही पिंपल्स येण्याचा त्रास होऊ लागतो. अशावेळी तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा चेहऱ्यावर पाणी मारुन मॉश्चरायझर लावण्याचा प्रयत्न करा किंवा एखादे तुमच्या आवडीचे सीरम जवळ ठेवा त्यामुळेही त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते. 

 • प्रवास म्हटला की, बाहेरचे खाणे आले. तेलकट अशा पदार्थांचे सेवन काही जणांसाठी नेहमीच त्रासदायक ठरते. सतत तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळेही पिंपल्सचा त्रास होऊ शकतो.  अशावेळी शक्य असल्यास खूप तेलकट पदार्थ खाऊ नका. 

 • प्रवासात जितके खाणे होते त्या तुलनेत फारच कमी पाणी प्यायले जाते. शरीरात पाणी कमी झाले तरी देखील पिंपल्सचा त्रास होऊ शकतो. शरीरात पाणी असेल तर त्वचेसंदर्भात कोणताही त्रास सहसा होत नाही. त्यामुळे त्वचा ही चमकदार आणि अधिक चांगली दिसू लागते.

 • पोट साफ न होण्याच्या तक्रारी ही अनेकांना असतात. पचायला जड असे पदार्थ खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास खूप जणांना होतो. पोट साफ झाले नाही तरी देखील प्रवासात मोठे मोठे पिंपल्स येतात. असे पिंपल्स टाळायचे असतील तर तुम्ही पोट साफ होण्याची गोळी सोबत ठेवा. हॉटेलमध्ये गेल्यावर या गोळीचे सेवन करा. 
  प्रत्येकीकडे असायलाच हवेत MyGlamm चे हे 5 प्रॉडक्ट

 • कधीकधी प्रवास हा फारच मोठा असतो. प्रवास सुरु करताना केलेला मेकअप दिवस संपेपर्यंत काढता येत नाही. मेकअप दिवसभर चेहऱ्यावर राहिला तरी हा त्रास होऊ लागतो.  मेकअपमधील तेलकट पदार्थ चेहऱ्यावर तसेच राहून जातात. ते पोअर्सच्या आत गेले तर त्याचा अधिक त्रास होऊ लागतो. त्यामुळे मोठे पिंपल्सही येऊ शकतात. 

 • एसपीएफ लावण्याची सवय ही त्वचेसाठी नेहमीच चांगली असते. असे असले तरी देखील बऱ्याच वेळा आपण त्याची टाळाटाळ करतो. थंड प्रदेश असो वा वाळवंट ऊन हे त्वचेच्या आतपर्यंत जाते. सूर्यकिरणांचा त्रास अधिक होऊ लागला की, तरी देखील अशा समस्या हमखास होऊ शकतात. 

 • प्रवासात असताना तुमच्या जवळ असलेले फोन, हेडफोन्स स्वच्छ ठेवा. कारण त्याला लागलेली घाण ही त्वचेवर पिंपल्स आणू शकते. या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करत जा. त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. 

 • जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर तो घाम टिपत जा. चेहरा शक्य असेल तेव्हा टिश्यू पेपरने स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करा. त्यामुळेही त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते. 

 • पिंपल्स येण्याचे शेवटचे आणि महत्वाचे कारण म्हणजे पिंपल्स फोडणे. जर तुम्हाला अगदी छोटासा पिंपल जरी आला असेल आणि जर तो तुम्ही फोडला तर ती जखम तशीच ओली राहते. त्यामुळे पिंपल्स आणखी पसरण्याची शक्यता असते.

  ही काही कारणं आहेत ज्यामुळे प्रवासात पिंपल्स येण्याची शक्यता असते.

दोन्ही स्तनांच्या आकारात आहे का फरक, जाणून घ्या कारण

Beauty

Makeup Blender

INR 700 AT MyGlamm