Quick makeup tips - 5 मिनिट्समध्ये सोप्या पद्धतीने करा झटपट मेकअप

Quick makeup tips - 5 मिनिट्समध्ये सोप्या पद्धतीने करा झटपट मेकअप

आपल्या मेकअप रूटीनला तुम्हाला जर अगदी सोपं आणि सहज बनवायचं असेल तर तुम्हाला काही त्वरीत करता येणाऱ्या अशा सोप्या ट्रिक्स शिकून घ्यायला हव्यात. बाहेर जाताना जर तुम्हाला खूप त्रास होत असेल अथवा मेकअप करायला वेळ लागत असेल तर तुम्ही या सोप्या टिप्स वापरा आणि दिसा सुपर स्टायलिश आणि आकर्षक. तुम्हाला यासाठी जास्त वेळ लागणार नाही आणि झटपट मेकअप करून तुम्ही तयार होऊ शकता. यासाठी नक्की कोणत्या झटपट मेकअप टिप्स (Quick makeup tips) वापरायच्या आपण पाहूया.

लग्न असो वा साखरपुडा, ट्रेंडमध्ये आहे ग्लिटरी मेकअप

असा करा झटपट मेकअप

Beauty

POWDER MAGIC EYESHADOW PENCIL - GOLDMINE

INR 950 AT MyGlamm

Beauty

POSE HD Foundation Stick - Walnut

INR 599 AT MyGlamm

 • रोजच्या मेकअपसाठी तुम्ही संपूर्ण मेकअप करायची अजिबात गरज नाही. डोळ्यांना काजळ आणि लायनर लावा. फाऊंडेशन आणि कॉम्पॅक्ट लावा. ओठांवर लिप ग्लॉस लावा आणि तुम्ही व्हाल पटकन तयार. हे सर्व करण्यासाठी तुम्हाला पाच मिनिट्सपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. 
 • तुम्हाला अचानक पार्टीला जायचं असेल आणि तुमच्याजवळ केवळ 5 मिनिट्स असतील तर तुम्ही डोळ्यांचा आणि ओठांचा भाग जास्त हायलाईट करणं गरजेचे आहे. तुम्ही डोळ्यांना पटकन स्मोकी आय लुक देऊ शकता अथवा डोळ्यांना थोडं जाडे आयलायनर लाऊन काजळ लावा.  ओठांना गडद रंगांची लिपस्टिक लावा. अगदीच वेळ नसेल तर तुम्ही डोळ्यांना थोडे गडद काजळ लावा आणि लिपस्टिकची लाईट शेड लावली तरीही तुमचा मेकअप पूर्ण होईल.
 • फाऊंडेशन लावायला वेळ नसेल तर चेहऱ्याला प्राईमर लावायला मात्र विसरू नका.
 • संध्याकाळच्या पार्टीसाठी तुम्ही मॉईस्चराईजर लावा आणि स्किन टोनला मॅचिंग असणारे फाऊंडेशन लावा. त्यावर फेस पावडर आणि व्हाईट आयशॅडो लावल्यास, तुमचा लुक पूर्ण बदलेल. यामुळे तुमच्या चेहऱ्याला एक वेगळा आणि ताजातवाना लुक मिळेल. यावर तुम्ही काळे काजळ,  आयलायनर आणि मस्कारा लावा. लिपस्टिकशी हलकीशी शेड तुमचा मेकअप आणि तुमचा लुक पूर्ण करेल. 
 • लिप बाम, लिप ग्लॉस, बॉडी लोशन, मॉईस्चराईज आणि सनस्क्रिन या चार गोष्टी तुम्ही तुमच्या मेकअप किटमध्ये नेहमी ठेवायला हव्यात.  आयत्या वेळी कुठेही जायचं झालं तर तुम्हाला या गोष्टी पटकन उपयोगी ठरतात. अगदी सहज झटपट तयार होण्यासाठी या गोष्टींचा वापर करता येतो. ऑफिसला जातानाही या गोष्टी वापरून तुम्ही तुमचा साधा लुक पूर्ण करू शकता
 • झोप पूर्ण न झाल्याने जर डोळ्यांवर सूज आली असेल तर तुम्ही गडद शेड आयशॅडो लावा आणि तुम्ही डोळ्यांचा पफीनेस सहजपणाने लपवू शकता. तसंच डोळ्यांखालील काळी वर्तुळं असतील तर गडद शेडचे आयशॅडो लावा
  फाऊंडेशन नेहमी लावा, हे तुमच्या त्वचेला फ्रेश लुक देते. यामुळे हिट,  प्रदूषण आणि धुळीपासून वाचविण्यास मदत मिळते. फाऊंडेशनमध्ये दोन थेंब पाणी मिक्स  करा आणि मग स्पंजने फाऊंडेशन लावा. चेहऱ्यावर काही लेअर आहे असं वाटू नये अशा प्रकारे फाऊंडेशन लावा. असं केल्याने तुम्हाला दिवसभर ताजेतवाने राहू शकता
 • त्वरीत उजळपणा येण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर सर्वात पहिले मॉईस्चराईजर लावा. त्यानंतर तुमच्या स्किन टोनला मॅच असणारे फाऊंडेशन लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर त्वरीत उजळपणा दिसून येईल. 
 • आपल्या बॅगमध्ये बाकी काही असेल किंवा नसेल पण एखादी लाल रंगाची लिपस्टिक नेहमी ठेवा.अचानक कोणत्याही पार्टीला अथवा एखाद्या कार्यक्रमाला जावं लागलं तर लाल लिपस्टिक लावल्याने तुमचा लुक अचानक बदलतो. एकच लिपस्टिक तुम्ही ओठांना आणि आयशॅडो म्हणून आणि हायलायटर म्हणूनही वापरू शकता. याचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला अगदी पाच मिनिट्स लागतात. 
 • तुमचे डोळे लहान असतील डोळे मोठे दाखविण्यासाठी तुम्ही पांढऱ्या पेन्सिलचा वापर करा. असं केल्याने तुमचा लुक आपोआप लगेच बदलेल. अचानक पार्टीत जाण्यासाठी पटकन मेकअप करायचा असेल आणि ग्लॅमरस दिसायचं असेल तर तुम्ही गडद निळ्या आयलायनर पेन्सिलचाही वापर करू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्याचा लुक पूर्ण बदलून जातो.

10 मिनिट्समध्ये कसे व्हाल बाहेर जाण्यासाठी तयार, मेकअप ट्रिक्स

Beauty

LIT Liquid Matte Lipstick - Sugar Mama

INR 395 AT MyGlamm

लहान डोळ्यांसाठी परफेक्ट आय मेकअप

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक