ADVERTISEMENT
home / Celebrity Make Up
अभिनेत्री मृणाल ठाकूरचा पार्टी मेकअप तुम्हाला करेल 'बोल्ड'

अभिनेत्री मृणाल ठाकूरचा पार्टी मेकअप तुम्हाला करेल ‘बोल्ड’

आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे कितीही नाही म्हटलं तरीही मेकअप स्टाईल आपला लुक नक्कीच बदलत असते. नेहमीपेक्षा थोडं वेगळं आणि बोल्ड दिसण्यासाठी आपण लिपस्टिक आणि काजळची मदत घेतच असतो. बॉलीवूडमधील अशा काही मराठमोळ्या अभिनेत्री आहेत ज्यांनी मेकअप गेम फारच गंभीरपणे घेतला आहे. यामध्ये नवे नाव म्हणजे अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur). मृणाल ठाकूर नेहमीच आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या मेकअपचे लुक ट्राय करत असते. एका मेकअप ब्रँडसाठी खरं तर मृणाल काम करते. पण मृणालला स्वतःला मेकअप करायला खूप आवडतो हे तिच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून दिसून येतं. ग्लॅमरस लुकसह मृणाल बऱ्याचदा बोल्ड मेकअप लुकमध्येही दिसते. तर कधी कधी तिचा नो मेकअप लुकही आपल्याला आवडून जातो. तुम्हाला एखाद्या पार्टीला जायचे असेल तर मृणालचा हा लुक तुम्हाला नक्की करता येईल. पार्टीसाठी थोडा बोल्ड मेकअप गरजेचा असतो. पण आपल्याला असा मेकअप जमेल की नाही अथवा शोभून दिसेल की नाही असेल प्रश्नही मनात निर्माण होतात. पण तुम्ही मृणालचा हा लुक पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की हा लुक आवडेल आणि तुम्हीही हा लुक करून पार्टीला जाऊ शकता. 

या लुकसाठी तुम्हाला कशाची गरज लागेल

मृणालने केलेला हा परफेक्ट पर्पल आयशॅडो मेकअप करण्यासाठी तुम्हाला नक्की कोणते मेकअप साहित्य वापरावे लागेल हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तसंच हा लुक तुम्ही कशा प्रकारे करू शकता याचीही माहिती तुम्हाला देत आहोत. 

  • प्राईमर
  • फाऊंडेशन
  • कन्सीलर
  • सेटिंग पावडर
  • कॉन्ट्यूर
  • ब्लश
  • हायलाईटर
  • पर्पल आयशॅडो
  • शिमरिंग पर्पल आयशॅडो
  • फ्लॅट आयशॅडो ब्रश 
  • आयब्रो पेन्सिल
  • ब्लॅक कोहल
  • काजळ
  • ब्राँझर 
  • गुलाबी लिप लाईनर
  • गुलाबी लिपस्टिक 
  • ब्युटी ब्लेंडर 
  • सेटिंग स्प्रे
  • ब्लश ब्रश, फेस कॉन्ट्यूर ब्रश, लहान कॉन्ट्यूर ब्रश, ब्राँझर ब्रश

 

कसा कराल मेकअप?

आता जरी आपल्याकडे सर्व साहित्य असेल तरी आपण हा मेकअप नक्की कसा करायचा हेदेखील आपल्याला माहीत हवे. बरं हा मेकअप करायला साधारण किती वेळ लागतो आणि पटकन होऊ शकतो का असा जर प्रश्न असेल तर नक्कीच त्याचे उत्तर हो असे आहे. तुम्ही आम्ही  सांगितलेल्या टिप्स व्यवस्थित वाचून त्याचा उपयोग केलात तर तुमचा हा बोल्ड लुक नक्कीच पटकन करून होईल आणि तुम्ही दिसाल अधिक आकर्षक.  चला तर मग जाणून घेऊया कसा करायचा हा पर्पल आयशॅडो मेकअप (Purple Eyeshadow Makeup)

ADVERTISEMENT
  • सर्वात पहिले आपल्या चेहऱ्यावर प्राईमर लावा आणि बोटांचा उपयोग करून चेहऱ्यावर प्राईमर ब्लेंड करून घ्या 
    काही मिनिट्स तसंच राहू द्या. प्राईमर चेहऱ्यावर अब्जॉर्ब झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर फाऊंडेशन लावा. ब्युटी ब्लेंडरचा वापर करून फाऊंडेशन व्यवस्थित ब्लेंड करून घ्या
  • आता आपल्या चेहऱ्यावर अगदी कमी प्रमाणात कन्सीलऊ घेऊन आपल्या लीड आणि डोळ्यांखालच्या भागावर ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने लावा. आयशॅडो मेकअप करताना या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
  • यानंतर त्वरीत सेटिंग पावडरने कन्सीलर नीट सेट करा आणि मग फेस कॉन्ट्यूर ब्रशने कॉन्ट्यूर पॅलेट डीप करा. ब्रशच्या मदतीने आपल्या गालांच्या हाडावर याचा उपयोग करा. त्यानंतर आपल्या नाकावर लावा आणि मग ब्रशचा उपयोग करून गालावर लावून घ्या 
  • हा बेस तयार झाला की, मेकअप करणे अत्यंत सोपे आहे. आता फ्लॅट आयशॅडो ब्रशचा वापर करून त्यावर थोडेसे पर्पल आयशॅडो घ्या आणि आपल्या डोळ्यांवर लावा. व्यवस्थित ब्लेंड करा जेणेकरून अति गडद दिसणार नाही
    बोल्ड आणि ड्रॅमेटिक लुक देण्यासाठी आयशॅडो तुम्ही डोळ्याच्या बाहेरच्या कॉर्नरपर्यंत लावा. त्यावर आता ग्लिटरिंग पर्पल आयशॅडो लावा 
  • हे लावल्यावर वॉटरलाईनवर काही ब्लॅक कोहल लावा. आयब्रो पेन्सिलच्या मदतीने आयब्रो फिल करा आणि एक डिफाईन लुक द्या
  • त्यानंतर डोळ्यांच्या पापण्यांवर मस्कारा लावा 
  • ब्रॉँझर ब्रशचा वापर करून चेहऱ्याच्या हायपाँईंट्सवर हायलाईटर लावा
  • फुलर लुकसाठी ओठांवर पहिले गुलाबी लिप लाईनरने बॉर्डर करून घ्या. त्यानंतर गुलाबी रंगाची लिपस्टिक यावर लावा 
    मेकअप करून झाल्यावर सेटिंग स्प्रे एकदा उडवा. तुमचा लुक पूर्ण तयार आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

14 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT