अंडरआर्म्सची त्वचा चांगली ठेवण्यासाठी असे तयार करा स्क्रब

अंडरआर्म्सची त्वचा चांगली ठेवण्यासाठी असे तयार करा स्क्रब

काळवंडलेले अंडरआर्म्स कोणालाच आवडत नाही. अंडरआर्म्सची काळजी घेण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो. खूप जण घरगुती उपायही करत असतील. बेकिंग सोडा, स्क्रबिंग, वेगवेगळ्या क्रिम असे तुम्ही अंडरआर्म्ससाठी वापरत असाल तर तुमच्या अंडरआर्म्ससाठी स्क्रबिंगही फारच महत्वाचे आहे. अंडरआर्म्स काळवंडण्यासोबतच तेथील त्वचा चांगली राहणे गरजेची असते. शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत अंडरआर्म्सची त्वचा ही थोडी नाजूक असते. तिची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा माईल्ड स्क्रब करणे गरजेचे असते. असे माईल्ड स्क्रब तुम्ही घरीच बनवून त्याचा वापर करु शकता. जाणून घेऊया अंडरआर्म्सच्या त्वचेला अधिक चांगले करणारे काही घरगुती स्क्रब

तुमच्या या सवयी टाळल्यात तर अंडरआर्म्स पडणार नाहीत काळे, कारणे नक्की काय

स्क्रब आहे महत्वाचे

त्वचेवरुन मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रब हे फार महत्वाचे असते. स्क्रबचा योग्य वापर केला तर अगदी हळुवारपणे त्वचेवरील डेड स्किन निघून जाते. अंडरआर्म्समधील केस काढताना बरेचदा रेझर, हेअर रिमु्व्हल क्रिमयाचा वापर करतो. त्यामुळे त्वच्या पोअर्समध्ये प्रॉडक्ट तसेच अडकून राहतात. जर तुम्ही तेथील त्वचा स्क्रब केली तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा मिळू शकेल. आठवडयातून एकदा तरी अशा पद्धतीने स्क्रब केले तर त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते. म्हणूनच त्वचेसोबत बॉडी स्क्रब करण्याचा सल्ला दिला जातो.

अंडरआर्म्स काळवंडलेत? मग रोजच्या रोज अशी घ्या काळजी

असे घरी तयार करा स्क्रब

Instagram

जर अंडरआर्म्ससाठी तुम्ही असे स्क्रब करण्याचा विचार करत असाल तर काही सोपे आणि माईल्ड स्क्रब घरी बनवता येतात. 

  • कॉफी- साखर हे त्वचेसाठी उत्तम स्क्रब आहे. हे लायटनिंग आणि मॉश्चरायझिंग असे स्क्रब असल्यामुळे याच्या वापरामुळे त्वचा कोरडी पडत नाही. ती अधिक चांगली आणि आकर्षक दिसते.
  • वॉलनट- क्रिम स्क्रब- हे देखील त्वचेसाठी उत्तम स्क्रब आहे. जर तुमच्याकडे एखादे रेडीमेड स्क्रब असेल तर तुम्ही त्याचा नक्की वापर करा. तुम्हाला तुमच्या शरीरात झाालेला बदल नक्कीच जाणवेल. 
  • शुगर-हनी स्क्रब- साखर हे एक उत्तम स्क्रब आहे. जर तुम्ही साखर आणि मध एकत्र करुन तुमच्या अंडरआर्म्सला चोळले तर ते चांगला रिझल्ट देतील. यामुळे तुमच्या अंडरआर्म्समधील काळे डाग कमी होतील शिवाय तुमचे आर्मपीट अधिक चांगले दिसू लागतील. 
  • मसूर डाळ ही नैसर्गिक स्क्रब असून तुम्ही त्याचा वापर करुनही स्क्रब तयार करु शकता.डाळ भिजत घालून ती किंवा कोरडीच जाडसर वाटून घ्या.त्यामध्ये दही किंवा दूध घालून ती अंडरआर्म्सला चोळा. त्यामुळे मृत त्वचा निघून जाण्यास मदत मिळेल. 
  • बेसन - मसूर डाळ पिठ यांचा वापर करुनही तुम्ही तुमच्या अंडरआर्म्ससाठी स्क्रब बनवू शकता.  असे स्क्रबही त्वचेसाठी फारच फायदेशीर आहे. 

    आता तुम्ही असे काही स्क्रब बनवून  अंडरआर्म्सची काळजी घेऊ शकता. त्यामुळे अंडरआर्म्ससंदर्भातील तुमच्याही समस्या कमी होतील.

मुलायम आणि कोमल पायांसाठी झटपट घरगुती उपाय (Foot Care Tips In Marathi)

Beauty

Makeup Blender

INR 700 AT MyGlamm