ADVERTISEMENT
home / Jewellery
झुमका गिरा रे…नक्की ट्राय करा झुमक्याचे हे प्रकार

झुमका गिरा रे…नक्की ट्राय करा झुमक्याचे हे प्रकार

झुमका गिरा रे… बरेली के बाजार मे…. कानातील झुमक्यांचा हा प्रकार काही केल्या जुना होणारा नाही. वेस्टर्न वेअर असू दे की, ट्रेडिशनल वेअर सगळ्यांवर झुमक्याचा हा प्रकार कायमच उठून दिसतो. हल्ली झुमक्यांची ही फॅशन पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. गोल्डन, सिल्व्हर, कपड्यांपासून बनवलेले, कुंदन, क्विलिंग अशा प्रकारातील झुमके हे सध्या पुन्हा एकदा बाजारात दिसू लागले आहेत.कानातल्यांमधील झुमका हा प्रकार तुम्ही कधीही वापरुन पाहिला नसेल तर तो तुम्ही अगदी हमखास वापरायला हवा. झुमक्याचा कोणता प्रकार निवडावा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुमच्यासाठी झुमक्याचे काही असे प्रकार निवडले आहेत. जे तुम्हाला कोणत्याही आऊटफिटवर अगदी सहज घालता येतील.

लग्नात सोन्याहूनही अधिक सुंदर दिसतील दागिन्यांचे हे प्रकार

चांदबाली झुमका

गोलाकार आकाराच्या चांदबाली या अनेकांच्या आवडीच्या आहेत. ट्रेडिशन प्रकारात मोडणारा कानातल्यांमधील हा प्रकार अनेकांकडे असेल पण तुम्ही कधी चांदबाली झुमका ट्राय केला आहे का? चांदबालीचा चंद्र आणि त्याला लटकवण्यात आलेले झुमके दिसायला फारच सुंदर दिसतात. गोल्डन रंगामध्ये कुंदन आणि खड्यांचे काम केलेले हे चांदबाली झुमके साडी, पंजाबी ड्रेस किंवा तुम्ही घातलेल्या इंडो-वेस्टर्न ड्रेसला एक चांगलाच लुक देतात. यांचा आकार हा वेगवेगळा असतो. तुम्ही चेहऱ्याच्या आकारानुसार याची निवड करु शकता. 

टेम्पल ज्वेलरीचा साज भारी, लग्नामध्ये वाढतोय दागिन्यांचा ट्रेंड

ADVERTISEMENT

सिल्व्हर ऑक्सिडाईज झुमका

सध्या ऑक्सिडाईज झुमक्यांचा चांगलाच ट्रेंड सुरु आहे. यामध्ये कितीतरी व्हरायटीचे कानातले आणि गळ्यातले चोकर मिळतात. जर तुम्हाला ऑक्सिडाईज दागिने घालायला आवडत असतील तर तुम्ही सिल्व्हर रंगाचे हे झुमके ट्राय करायला हवे. गोल्ड मटेरिअलमध्ये मिळणारे झुमके हे फार कमी प्रकारावर घालता येतात. पण सिल्व्हर प्रकारातील हे झुमके तुम्हाला अगदी जीन्स आणि टॉपवरही परफेक्ट दिसतात. सिल्व्हर ऑक्सिडाईजच्या दागिन्यांमध्ये बरेच काम केलेले असते. तुम्हाला अगदी टेंपल डिझाईन्सपासून ते आताच्या लेटेस्ट डिझाईनपर्यंत बरीच विविधता यामध्ये मिळू शकते. 

 

चेन झुमकी

झुमके या प्रकाराला अधिक सुंदर करणारे चेन झुमके किंवा झुमकी हा प्रकारही दिसायला खूपच सुंदर दिसतो. हे झुमके चेनमुळे मानेपर्यंत येतात. जे दिसायला फारच सुंदर आणि वेगळे दिसतात. एखाद्या साडी किंवा पंजाबी ड्रेसवर थोडासा हटके आणि वेगळा लुक त्यामुळे येऊ शकतो. या झुमक्यांच्या प्रकारामुळे मान उंच दिसते. ट्रेडिशनल लुक देणारे असे हे झुमके असल्यामुळे ते फारच सुंदर दिसतात. यामध्ये तुम्हाला सिंगल चेन, डबल चेन असे प्रकार मिळतात.  जे तुम्ही नक्की ट्राय करुन पाहायला हवे. हे झुमके घातल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही दागिना घालण्याची गरज नाही.

लग्नात नक्की ट्राय करा या लेटेस्ट बांगड्यांच्या डिझाईन्स

ADVERTISEMENT

क्लोथ झुमका

झुमका हा प्रकार खूप जणांना हेव्ही वाटतो. त्यामुळे अनेक जण तो घालायला बघत नाही. पण जर तुम्हाला कानातले फार जड नको असतील कर तुमच्यासाठी कपड्यांपासून किंवा कागदांपासून बनवलेल्या हलक्या झुमक्यांचा पर्याय आहे. कपडा किंवा क्विलिंगच्या मदतीने हे झुमके बनवले जातात. या झुमक्यांमध्ये तुम्हाला व्हरायटी मिळते. झुमक्यांमध्ये विविधता आणताना कानालगतचा भाग हा कपड्याचा आणि त्याला झुमके लावले जातात. हे झुमके आकाराने मोठे असले तरी बऱ्यापैकी हलके असतात. त्यामुळे तुम्हाला ते कशावरही घालता येतात. 


आता नक्की ट्राय करा हे काही नवे झुमक्याचे प्रकार आणि दिसा सुंदर 

01 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT