फ्लॅट चप्पलही ठरु शकते पाय दुखीचे कारण, जाणून घ्या

फ्लॅट चप्पलही ठरु शकते पाय दुखीचे कारण, जाणून घ्या

उंच टाचेच्या चपला पायांसाठी आरामदायी नसतात म्हणून त्यांचा वापर सहसा आपण रोज करत नाही. रोजच्या वापरासाठी सपाट अर्थात फ्लॅट चप्पलस किंवा शूज अनेक जण वापरतात. अशा चपला जास्त काळासांठी घातल्या तरी देखील पाय दुखत नाही असे अनेकांना वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का ? फ्लॅट चपलांमुळेही पाय दुखू शकतात. होय, ही गोष्ट सोळा आणे सच आहे. सतत पायांमध्ये फ्लॅट चपला असतील तर असा त्रास होणे अगदीच स्वाभाविक आहे.  यामागे नेमकी कारणे कोणती? आणि तुम्ही नेमक्या कोणत्या उंचीची पादत्राणे घालायला हवीत ते जाणून घेऊया. 

सॅलिसिलिक अॅसिडच्या मदतीने घालवा पिंपल्सचे डाग

फ्लॅट चपलांमुळे दुखतात पाय

फ्लॅट चपलांमुळे नेमके पाय का दुखतात आणि इतर कोणते त्रास होतात हे जाणून घेऊया 

  • फ्लॅट चपला या जमिनीला अगदी समांतर असतात. अगदी एक पातळशी जागा त्याने घेतलेली असते. अशावेळी सतत जमिनीशी समांतर पाय राहिल्यामुळे पायदुखी, पोटऱ्यांना सूज येऊ शकते. 
  • फ्लॅट चपला या शरीराला कोणताही वेगळा आधार देत नाही. त्यांना कोणताही आकार नसल्यामुळे या चपला त्रासदायक ठरतात.त्यामुळे पाठदुखीही संभवू शकते. 
  • काही फ्लॅट चपलांना कोणताही सोल नसतो. नुसतं चामडं किंवा प्लास्टिक असते. जे जमिनीला टेकलले असते. अशा चपला जास्त वेळांसाठी घातल्या की पायांना थकवा येतो. पाय सतत घासून चालल्यासारखे वाटू लागते. 
  • पायांना जमिनीशी जास्त संबंध आल्यामुळे पायांसंदर्भातील अनेक त्रासही  होण्याची शक्यता असते. पाय घासल्यामुळे पायांना भोवरी येणे, पायांवरील चामडी जाड होणे, पायांची बोट दुखू लागणे असे त्रासही होऊ लागतात.
  • खूप जणांचे वजन, शरीरयष्टी यालाही फ्लॅट चपला चालत नाही. खूप उंच आणि खूप वजनदार व्यक्तिंना त्यामुळे चांगली ग्रिप मिळत नाही. अशांनीही शक्यतो फ्लॅट चपला घालू नये.

अंधश्रद्धा म्हणून नाही तर या कारणांसाठी घातला जातो काळा दोरा

Instagram

अशा असाव्यात चपला

आता फ्लॅट चपला घालायच्या नाहीत मग नेमके काय घालायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही नेमक्या कशा चपला घालायच्या त्या देखील जाणून घेऊया. 

 चपलांचे सोल : तुम्हाला उंच चपला घालायला हव्यात असे नाही. तर एखाद्या फ्लॅट चपला निवडताना त्याचे सोल किमान बोटाचे एक पेर असावे. त्यामुळे तुम्हाला थोडी ग्रिप आणि ग्रेम मिळतो.

 प्लॅटफॉर्म हिल्स :  प्लॅटफॉर्ममध्ये वेगवेगळे प्रकार मिळतात. सगळेच फार उंच असतात असे नाही. तुम्ही फ्लोअरवर चालताना तुम्ही अगदी जमिनीवर चालल्यासारखे वाटणार नाही अशा चपला बघा. 

कुशन्स:  काही फ्लॅट चपलांना पायांना आधार मिळण्यासाठी कुशन्स असतात. अशा कुशन्स पायांना आराम देतात. जर तुम्ही अगदीच फ्लॅट चपला निवडायचा विचार करत असाल तर तुम्ही किमान एवढी गोष्ट तरी निवडा.

 आता फ्लॅट चप्पल वापरत असाल तर पायदुखी लक्षात घेत तुम्ही चपलांची निवड करणे नेहमीच चांगले.

कोणत्याही ट्रेडिशनल ड्रेसवर उठून दिसतात मोजडी, तुम्ही ट्राय केलीत का?