लहान मुलांचे केस गळण्यामागची कारणं

लहान मुलांचे केस गळण्यामागची कारणं

आजकाल मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांचेही केस वांरवार गळताना दिसतात. लहान मुलांचे केस मोठ्यांपेक्षा नाजूक आणि मऊ असतात. त्यामुळे त्यांच्या केसांची विशेष काळजी घ्यायला हवी. लहान मुलांचे केस मोठ्या प्रमाणावर गळण्यामागे अनेक कारणं असू शकतात. जसं की, केस स्वच्छ न ठेवणे, केसांमध्ये उवा अथवा लिखा असणं, वातावरण आणि प्रदूषण, धुळ आणि मातीत खेळणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चुकीचा आहार. या सर्व कारणांमुळे लहान वयातच मुलांचे केस गळू शकतात. लहान मुलांचे केस गळणं ही एक गंभीर बाब असल्यामुळे त्यावर वेळीच योग्य उपचार व्हायला हवेत. 

केसांची वाढ आणि केस गळण्याचं प्रमाण -

केसांबाबत असं म्हटलं जातं की केसांची वाढ दर तीन महिन्यांनी ठराविक उंचीपर्यंत होते आणि मग काही काळासाठी थांबते. कारण त्यामुळे जुने केस गळतात आणि नवीन केस उगवतात. जर तुमच्या लहान मुलांचे केस काही महिन्यांनी ठराविक प्रमाणात गळत असतील तर ते नैसर्गिक आहे. पण जर मुलांचे केस नेहमीच भरपूर प्रमाणात गळत असतील तर ही नक्कीच एक गंभीर बाब आहे हे तुम्ही ओळखायला हवं. शिवाय तुमच्या मुलांच्या  केसांचे आरोग्य राखण्यासाठी योग्य ते उपचारदेखील करायला हवेत. 

instagram

आरोग्य समस्या -

लहान मुलांना जर काही आरोग्य समस्या असतील तर त्यामुळे त्यांचे केस मोठ्या प्रमाणावर गळू शकतात. यासाठीच लहान मुलांच्या आरोग्याकडे नीट लक्ष द्यायला हवे. केस गळण्यासोबतच त्यांच्यामध्ये आजारपणाची काही इतर लक्षणे आढळत असतील तर त्यांना त्वरीत डॉक्टरांकडे न्यायला हवे. कारण ताप, मानसिक ताण, अपघात, अभ्यासाची  चिंता अशा अनेक कारणांमुळे तुमच्या मुलांच्या केसांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळीच या आरोग्य समस्यांवर उपचार करा. 

चुकीचा आहार -

आजकाल मोठ्यांचाच आहार चुकीचा असल्यामुळे लहान मुलांच्या आहाराबाबत फारसं कुणी जागरूक असलेलं दिसत नाही. जे मोठी माणसं खातात तेच लहान मुलं खाण्याचा हट्ट करतात. बर्गर, पिझ्झा, चॉकलेट हे तर मुलं आवडीने खातात. मात्र अशा पदार्थांमुळे मुलांचे योग्य पोषण होत नाही. अपुरे पोषण हे केस गळण्यामागचे महत्त्वाचे कारण असू शकते. कारण आहारातून मिळणारे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटिन्स केसांसाठी खूप महत्त्वाचे ठरतात. यासाठीच जर तुमच्या मुलांचे केस गळत असतील तर त्यांच्या आहाराकडे नीट लक्ष द्या. त्यांना असे पदार्थ खाण्याची सवय लावा ज्यातून त्यांच्या शरीराला योग्य पोषण मिळेल. 

instagram

लहान मुलांच्या हेअरस्टाईल -

आजकाल मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांचे खास पार्लर अथवा सलॉन असतात. जिथे मुलांच्या खास हेअरस्टाईल केल्या जातात. लहान मुलांवर नेहमीच मोठयांचा प्रभाव होत असतो. शिवाय मोबाईल आणि इतर माध्यमांमधून त्यांना जगात घडणाऱ्या गोष्टी समजत असतात. फॅशनेबल राहण्यासाठी अथवा ट्रेंड आहे म्हणून मग मुलं मोठ्यांप्रमाणे हेअर स्टाईल करण्याचा आग्रह करतात. दिसायला हे कितीही कौतुकाचं वाटत असलं तरी त्यामुळे तुमच्या मुलांच्या केसांवर वाईट परिणाम होतो. केस रंगवणे, केसांना हिट देणे, हेअर ड्रायरचा वापर करणे यामुळे तुमच्या मुलांचे केस खराब होतात आणि मोठया प्रमाणावर गळू लागतात. शिवाय तुम्ही मुलांना नेहमी बेबी प्रॉडक्टच वापरायला हवे. मोठ्यांचे हेअर प्रॉडक्ट मुलांच्या केसांना सूट होत नाहीत त्यामुळे त्यांचे केस गळू शकतात. 

Beauty

WIPEOUT Baby Safety Wipes

INR 299 AT MyGlamm