मिनिटात स्वच्छ करा जळलेली भांडी, सोप्या टिप्स

मिनिटात स्वच्छ करा जळलेली भांडी, सोप्या टिप्स

कधी कधी दुधाची पातेली गॅसवर ठेऊन विसरायला होतं आणि मग भांडे गॅसवर जळते किंवा कुकरमध्ये पाणी आटतं आणि कुकर खालून जळतो. असे जळलेले काळपट डाग काढण्यासाठी मग अक्षरशः हातामधली ताकद घासून घासून घालवावी लागते. रोजच्या धावपळीत हे असं झालं की चिडचिडही वाढते. अशी भांडी स्वच्छ करताना नक्की काय करायचं हे मग काही जणांना कळत नाही. कारण नेहमीच्या साबणाने अथवा लिक्विडने ही भांडी स्वच्छ होत नाहीत आणि अशी काळी भांडी बघून आपल्यालाही काही सुचत नाही. पण अशी भांडी जास्त ताकद न लावता पटकन मिनिटात आपण स्वच्छ करू शकतो. आश्चर्य वाटलं ना? पण खरंच असं करता येतं. अशा काही सोप्या टिप्स आणि हॅक्स (easy tips and hacks) आहेत ज्यामुळे तुम्ही ही अशी जळलेली काळी भांडी पटकन स्वच्छ करू शकता. तुमच्या भांड्यांना पूर्वीसारखी चमक पुन्हा मिळू शकते. या अशा सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत.

करा मीठाचा वापर

Shutterstock

जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी मीठ हे अत्यंत प्रभावी साधन आहे. हे वाचून तुम्हाला नक्की वाटलं असेल की अरे याआधी आपण हा प्रयोग का केला नाही. मीठाने जळलेली भांडी स्वच्छ करणे अत्यंत सोपे आहे. यासाठी सर्वात आधी तुम्ही स्क्रब पॅडवर मीठ घ्या आणि त्यावर आपला रोजचा साबण घेऊन भांडे घासा. मीठामुळे भांड्यावरील काळे डाग पटकन निघून जाण्यास मदत होते आणि महत्वाचे म्हणजे तुम्हाला तासनतास भांडे घासत बसावे लागत नाही. विशेषतः स्वयंपाकघरातील कढई घासायला जास्त त्रास होतो. मात्र एक लक्षात ठेवा. भांडे घासण्यापूर्वी काही वेळ आधी त्यामध्ये पाणी घालून ठेवा. जेणेकरून भांडे उमलू शकेल आणि त्यावरील जळलेली झालर लवकर निघून जाण्यास मदत मिळेल. घरातील अगदी जुन्या काचेच्या भांड्यानाही तुम्ही अशी छान चमक आणू शकता. 

कोकने करा स्वच्छ

जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही घरातील कोकचा वापर करू शकता. त्यासाठी तुम्हाला जे भांडे काळे झाले आहे त्यामध्ये कोक टाकावे लागेल. असे केल्यानंतर हे भांडे पुन्हा गॅसवर चढवा आणि मंद आचेवर गरम करा. कोकमधून बुडबुडे येणं बंद झालं की प्लास्टिक ब्रश अथवा भांडी घासण्याच्या साबणाने हे स्क्रब करा आणि मग जळलेला भाग स्वच्छ करून घ्या. ही ट्रिक अल्युमिनिअमच्या भांड्यावर अत्यंत पटकन लागू होते आणि स्टीलची भांडीही स्वच्छ करण्यास याची मदत होते.

बेकिंग सोडा

Shutterstock

भांड्यांवरील काळे डाग हटविण्यासाठी तुम्हाला बेकिंग सोडा हादेखील चांगला पर्याय आहे. यासाठी बेकिंग सोडा आणि पाणी घालून पेस्ट बनवून घ्या आणि जळलेल्या भांड्याला ही पेस्ट लावा. ही पेस्ट लावल्यानंतर कमीत कमी साधारण 15 मिनिट्स भांडे तसेच ठेवा. त्यानंतर पुन्हा साबण घेऊन हे भांडे घासा. त्यावरील आलेली जळणाची परत निघायला मदत होते. भांडे पूर्वीसारखे तुम्हाला दिसून येते.

टॉमेटो केचअप

Shutterstock

जळलेल्या भांड्यांवर टॉमटो सॉस लावल्यास पुन्हा एकदा भांडी चमकवता येतात. यासाठी टॉमेटो सॉस भांड्यावर लावा. रात्रभर हे भांडे तसंच सॉस लाऊन ठेवून द्या. सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्क्रबर आणि साबणाच्या सहाय्याने हे भांडे घासावे. तुमचे भांडे पूर्वीसारखी चकमकीत तुम्हाला दिसेल. टॉमेटोमध्ये असलेल्या आंबटपणामुळे भांड्यावरील डाग निघायला मदत मिळते.

लिंबाचा रस

Shutterstock

लिंबाचा वापर भांड्यांसाठी अगदी पुरातन कालापासून करण्यात आला आहे. अधिकांश साबणामध्ये लिंबाचा अर्क आपल्याला वापरलेला दिसून येतो. खराब भांड्यांसाठी आणि अगदी कपड्यांवरील डाग घालविण्यासाठीही लिंबाच्या रसाचा उपयोग करण्यात येतो. भांड्यांवरील जळलेले डाग काढण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर ठरतो. भांडे ज्या ठिकाणी काळे झाले आहे त्यावर लिंबू घासा अथवा लिंबाचा रस रगडा. त्यानंतर काही वेळ तसंच राहू द्या. लिंबाच्या रसातील अॅसिडमुळे हे डाग निघण्यास मदत मिळते. अगदी सहजतेने हे डाग स्वच्छ होतात.

व्हिनेगर

Shutterstock

व्हिनेगरदेखील डाग काढून टाकण्यास फायदेशीर ठरते. यामुळे जळलेली भांडी स्वच्छ करण्यास मदत मिळते. काही वेळ जळलेल्या या भांड्यामध्ये व्हिनेगर घालून ठेवा. नंतर थोड्यावेळाने थोडे गरम पाणी आणि डिशवॉश घालून हे भांडे घासा आणि स्वच्छ करा. याच्या वापराने तुम्हाला पुन्हा एकदा चमकदार भांडी मिळतील. तसंच व्हिनेगर वापरल्यास, तुम्हाला भांडी घासायला जास्त ताकद लावावी लागणार नाही.

कपड्यांच्या सॉफ्टनरचा करा वापर

Beauty

WIPEOUT Sanitizing Wipes 25 Wipes Pack

INR 159 AT MyGlamm

कपड्यांचे सॉफ्टनर आपल्याला हे डाग काढण्यास उपयुक्त ठरतात. हेदेखील एक प्रभावी साहित्य आहे. जळलेल्या भांड्यामध्ये फॅब्रिक सॉफ्टनर टाका आणि काही काळासाठी तसंच ठेवा. तुम्ही रात्री भांड्यात टाकून ठेवल्यास, जास्त चांगले. सकाळी उठल्यावर गरम पाणी घालून हे भांडे साबणाने घासल्यास, तुम्हाला भांडे पुन्हा पहिल्यासारखे दिसून येईल.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक