ADVERTISEMENT
home / पालकत्व
गरोदपणाच्या तिसऱ्या महिन्यात काय घ्यावी काळजी (3rd Month Pregnancy In Marathi)

गरोदपणाच्या तिसऱ्या महिन्यात काय घ्यावी काळजी (3rd Month Pregnancy In Marathi)

गरोदर असल्याची लक्षणे हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक सुंदर आणि अविभाज्य भाग आहे. या काळात महिलांना आपली आणि आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळाची व्यवस्थित काळजी घेण्याची गरज असते. बाळ जन्माला येताना निरोगी आणि सुदृढ असावं असं प्रत्येक आईला वाटतं आणि त्यामुळेच आईने आपली स्वतःची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. गरोदरपणाचा तिसरा महिन्यात चोर ओटी भरणे कार्यक्रम (3rd month pregnancy in marathi) केले जाते व प्रेग्नंसीमध्ये काय काळजी घ्यायची याची माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. तिसऱ्या महिन्यात गर्भवती महिलेच्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. बाळाचा विकासही अगदी तिसऱ्या महिन्यापासून पटापट होऊ लागतो. मग अशावेळी नक्की काय काळजी घ्यायची हेदेखील माहीत असायला हवे. तिसरा महिना अर्थात 9 व्या आवड्यापासून ते 12 व्या आठवड्यापर्यंत नक्की काय काळजी घ्यायची, गरोदरपणात काय खावे आणि कसे बदल असतात ते जाणून घेऊया.

गरोदर तिसरा महिना लक्षणे (3rd Month Pregnancy Symptoms In Marathi)

तिसऱ्या महिन्यात जाणवणारी लक्षणे (3rd month pregnancy Symptoms)

3rd Month Pregnancy Symptoms In Marathi

 

काही महिलांना गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यातही विशिष्ट लक्षणे जाणवतात. ती लक्षणे नक्की काय आहेत ते आपण आधी पाहूया. पहिल्या महिन्यात कशी काळजी घ्यायची हे तर आपल्याला माहीत असतेच. पण महिने वाढतात तशी काळजी घेणंही व्यवस्थित करायला हवे. 

मॉर्निंग सिकनेस – गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्यात काही महिलांना उलटी आणि सतत मळमळ सकाळी उठल्यानंतर होत राहते. तिसऱ्या महिन्याच्या सुरूवातीला हा त्रास असतोच. काही महिलांच्या बाबतीत तिसऱ्या महिन्याच्या शेवटी हा त्रास कमी होऊ लागतो. अधिक महिलांच्या बाबतीत तिमाहीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा त्रास कमी होऊन उलटी अथवा मळमळ थांबते. 

ADVERTISEMENT

थकवा येणे – गर्भावस्थेदरम्यान हार्मोनल स्तरामध्येही बदल होत असतो. महिलांना अधिक प्रमाणात झोप येते आणि सतत थकवा जाणवतो. शरीराला बाळामुळे अधिक पोषक तत्वांची गरज असते. तसंच अतिरिक्त रक्ताचीही गरज भासते. त्यामुळे रक्तदाब (Blood Pressure) अथवा रक्तातील साखरेची (Blood Sugar) पातळीही यामुळे कमी जास्त होऊन थकवा येण्याची शक्यता असते. 

सतत लघ्वी होणे – शरीरामधील एचसीजी हार्मोन निर्माण झाल्यामुळे आधीच्या तुलनेत लघ्वीला जास्त प्रमाणात होते. तसंच रक्ताची पातळी वाढल्याने तुमच्या लघ्वी करण्याच्या जागेवर अधिक दबाव येतो. तसंचा वाढता गर्भ मूत्राशयावर अधिक दबाव टाकतो. त्यामुळे सतत लघ्वीला जावे लागते. 

बद्धकोष्ठता – गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्यात प्रोजस्टेरॉन हार्मोन स्तरामध्ये वाढ होऊन पचनक्रिया कमी होते आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. तसंच जेवण नीट जात नसल्यामुळे अथवा पचनक्रिया नीट होत नसल्यामुळे बरेचदा महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागतो. 

पाठ आणि पोटदुखी – हार्मोनल स्तरामध्ये बदल झाल्याने बऱ्याच महिलांना पाठिमध्ये आणि पोटामध्ये दुखते. वाढत्या गर्भाशयामुळे पोट अधिक खेचले जाते आणि त्यामुळेही त्रास होतो. पोटाचा खालचा भाग दुखतो. 

ADVERTISEMENT

छातीत जळजळ – बाळाचा विकास होतो त्याप्रमाणे जेवण पचविण्याची क्रिया हळूवार होऊ लागते. वाढत्या गर्भाशयामुळे पोटावर दबाव येतो आणि त्यामुळे जेवण सतत वर येऊन अॅसिडिटी आणि छातीत जळजळ होण्याची क्रिया वाढू लागते. तिसऱ्या महिन्यात ही समस्या अत्यंत कॉमन आहे. 

सतत भूक लागणे – गर्भवती महिलांना तिसऱ्या महिन्यात सतत भूक लागते. तसंच काही पदार्थांचे वास सहनही होत नाहीत. भूक लागते, पण काही वेळा पदार्थ समोर आल्यानंतर खावासा वाटत नाही. त्यामुळे नक्की काय करायचं हे न कळून सतत चिडचिडही होते. बाळाच्या वाढीमुळे स्वभावातही बदल होतात. नक्की काय हवंय आणि काय नकोय याचा अंदाज येत नाही.

गरोदरपणाच्या 5 व्या महिन्यात कशी घ्याल काळजी

शरीरात होणारा बदल (Change In Body In Marathi)

Change in body

 

गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्यात शरीरामध्ये अनेक बदल घडत असतात. यामध्ये तुम्हाला योग्य जीवनशैलीचा आधार घ्यायची गरज असते. आपल्या खाण्यापिण्याकडे आणि आपल्यामध्ये होणाऱ्या बदलानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची गरज असते. नक्की शरीरामध्ये काय बदल होतात ते जाणून घेऊया.तिसऱ्या महिन्याच्या शेवटपर्यंत तुमचे गर्भाशय हे साधारण द्राक्षाच्या आकाराइतके मोठे होते. केवळ पोटच नाही तर शरीरामध्येही अनेक बदल घडतात. 

ADVERTISEMENT

स्तन अधिक घट्ट आणि जड होतात – या काळात स्तनामध्ये दूध निर्माण होऊ लागते. त्यामुळे स्तन अधिक घट्ट आणि जड होऊ लागतात. तसंच निप्पलचा रंग बदलू लागतो आणि अधिक काळसर होऊ लागतो. त्यामुळे घाबरून जाऊ नका. हे अत्यंत नैसर्गिक आहे. याशिवाय शरीरातील रक्ताची पातळी वाढते आणि त्यामुळे तुमच्या हृदयाची धडधडही काही प्रमाणात वाढून नसांवर जोर येतो आणि स्तनांच्या नसा अधिक घट्ट आणि फुगलेल्या दिसू लागतात. 

वजन वाढणे – गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्यापासून गरोदर महिलेचे वजन वाढण्यास सुरूवात होते. तिसऱ्या महिन्यात साधारण एक ते दोन किलो वजन वाढणे साहजिक आहे. यापेक्षा अधिक वजन वाढणे चांगले नाही. पण काही महिलांच्या बाबतीत ज्यांना मॉर्निंग सिकनेस अधिक असतो त्यांचे वजन या महिन्यात कमी झालेलेही दिसून येते. पण घाबरून जाण्याची गरज नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही आहार घेत राहा. 

स्ट्रेचमार्क्स दिसणे – गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्यात पोट आणि स्तन वाढल्यामुळे स्ट्रेचमार्क्स वाढून पोटावर त्याचे निशाण दिसू लागतात. तुम्ही वेळीच याला बायो ऑईल लावायला सुरूवात केली तर पोट वाढेल त्यानुसार स्ट्रेचमार्क्स दिसणं कमी होते. तसंच हार्मोन्सच्या बदलामुळे त्वचा अधिक सुकते आणि त्यामुळे पोटावर खाज येऊ लागते. पण ग्लिसरीनचा साबण वापरून अथवा मॉईस्चराईजरचा उपयोग करून तुम्ही नक्की यातून सुटका मिळवू शकता. 

पोटावर काळी रेष दिसणे – तिसऱ्या महिन्यात बरेच हार्मोनल बदल होत असतात त्यामुळे पोटाच्या खालच्या भागात काही महिलांना काळी रेष येते. याला वैद्यकीय भाषेत लिनिया नायग्रा (Linea Nigra) असे म्हणतात. पण काळानुसार ते निघून जाते.

ADVERTISEMENT

वाचा – गरोदरपणानंतर काय घ्यावी काळजी, जाणून घ्या

तिसऱ्या महिन्यात बाळाचा विकास कसा होतो (Development Of Baby In Marathi)

Development of baby

 

तिसऱ्या महिन्यात महिला आपल्या शरीरातील होणारा बदल जाणवून घेऊ शकता. पण तिसऱ्या महिन्यात बाळाची हालचाल मात्र कळत नाही. तुम्हाला कदाचित यामुळे अनेक प्रश्न पडतील. पण त्याने भांबावून अथवा घाबरून जाऊ नका. तिसऱ्या महिन्यात बाळाचा नक्की किती विकास होतो ते आधी जाणून घ्या. नक्की बाळाची वाढ कशी होते?

  • तिसऱ्या महिन्यापर्यंत गर्भामध्ये भ्रूणाचा आकारा हा लिंबाइतका अथवा एखाद्या मोठ्या बोराइतका होतो 
  • तिसऱ्या महिन्याच्या शेवटपर्यंत अर्थात 12 व्या आठवड्यापर्यंत तुमचे बाळ हे साधारण 2.5 इंच लांब इतके असते. तसंच बाळाचे वजन 28 ग्रॅमच्या आसपास असते 
  • या दरम्यान बाळाचे हृदय चालू होते. तसंच किडनी, डोळे आणि गुप्तांगाचा विकासही याच महिन्यात होतो. अन्य कोणताही भाग तोपर्यंत विकसित होत नाही

वाचा – Symptoms Of Blood Cancer In Marathi

तिसऱ्या महिन्यामध्ये कसा असावा आहार (Diet For 3rd Month Pregnant In Marathi)

Diet for 3rd month

 

गर्भावस्थेआधी तुम्ही फक्त तुमच्यासाठी खात असता आणि केवळ तुमच्या आवडीनिवडीनुसार खाता. पण केवळ आता आपल्यासाठी नाही तर बाळाला मिळणाऱ्या पोषणासाठीही तुम्हाला खावे लागते. त्यामुळे तिसऱ्या महिन्यात नक्की काय खायला हवे आणि काय टाळायला हवे याची माहिती असणेही तितकेच गरजेचे आहे.

ADVERTISEMENT

काय खावे (What To Eat)

What To Eat

 

विटामिन 6 युक्त पदार्थ – या महिन्यात अनेकांना मळमळ्याचा त्रास होतो. त्यामुळे गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्यात विटामिन – 6 युक्त पदार्थ तुम्ही खायला हवेत. अंडी, हिरव्या भाज्या यांचा समावेश जेवणात करून घेणे आवश्यक आहे

ताज्या फळांचा रस – गर्भावस्थेदरम्यान ताजी फळे खाणे अत्यंत चांगले ठरते. यामधून तुम्हाला अधिक विटामिन मिळते. त्यामुळे संत्री, मोसंबी, कलिंगड याचा रस तुम्ही नक्की या दिवसात प्यावा

कार्बोहायड्रेट – गरोदर असताना पोटामध्ये कार्बोहायड्रेट जाणेही गरजेचे आहे. यासाठी तुम्ही वेगवेगळे धान्य,, गव्हाचा ब्रेड, तांदूळ, बटाटा याचा आपल्या जेवणामध्ये समावेश करून घ्यावा. 

मांसाहार – तुम्ही जर मांसाहारी असाल तर गर्भावस्थादरम्यान तुम्ही मांस नक्की सेवन करू शकता. केवळ या गोष्टीची काळजी घ्या की, तुम्ही खात असलेले मांस हे व्यवस्थित शिजलेले असेल. कच्चे मांस खाऊ नका. 

ADVERTISEMENT

लोह आणि फोलेट – तिसऱ्या महिन्यात गर्भाच्या विकासासाठी तुम्हा लोह आणि फोलेटची आवश्यकता असते. आपल्या खाण्यापिण्यामध्ये तुम्ही याचा समावेश करून घ्या. यासाठी बीट, चीकू, ओटमील, संत्रे, बटाटा, ब्रोकोली, अंडे आणि हिरव्या भाज्या तुम्ही स्वयंपाकात वापरा. 

दुग्धजन्य पदार्थ – या दरम्यान तुम्हाला कॅल्शियमची अधिक आवश्यकता असते. केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या पोटातील बाळालाही त्याची गरज भासते. त्यामुळे दूध, दही, पनीर, लोणी, तूप या सगळ्या दुग्धजन्य पदार्थांचा तुम्ही आपल्या खाण्यात समावेश करून घ्या. 

जाणून घ्या गरोदरपणी छातीत दुखण्याची कारणे आणि उपाय

काय खाऊ नये (What Not To Eat)

What Not To Eat

 

जंक फूड आणि दारू – गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्यामध्ये जंक फूड, दारू, तंबाखू इत्यादी पदार्थांचे सेवन करणे टाळा. तसंच याशिवाय चहा, कॉफी, चॉकलेट या पदार्थांचे सेवनही या महिन्यात कमी करा. गर्भावस्थेत दारू सोडणं मुख्यतः आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

सी फूड – तिसऱ्या महिन्यात तुम्ही सी फूड अर्थात समुद्री मासे खाणे शक्यतो टाळा. कारण यामध्ये जास्त प्रमाणात उष्णता असून भ्रूणासाठी ही उष्णता हानिकारक ठरते 

हवाबंद डब्यातील पदार्थ – गर्भावस्थेदरम्यान शक्यतो हवाबंद डब्याती पदार्थ खाणे टाळा. यामध्ये अगदी लोणचं असो अथवा ज्युस असो. कोणतेही पदार्थ खाऊ नका. यामध्ये जास्त काळ टिकण्यासाठी काही केमिकल्स मिसळण्यात आलेले असतात. त्यामुळे हे शरीराला हानिकारक ठरते. बाळाला आणि पोटाला त्रास होईल असं कोणतेही बाहेरचे खाणे खाऊ नका. 

कच्चे मांस वा कच्चे अंडे – तिसऱ्या महिन्यात तुम्ही कच्चे मांस अथवा कच्चे अंडे टाळा. यामध्ये साल्मोनेला आणि लिस्टेरिया नावाचा असणारा बॅक्टेरिया हानिकारक ठरतो आणि याचा भ्रूणावर अत्यंत वाईट परिणाम होतो. त्यामुळे हे खाऊ नका. 

गरोदर महिलांसाठी तिसऱ्या महिन्यात करण्याचा व्यायाम (Exercise For The Pregnant Women In Marathi)

Exercise For The Pregnant Women In Marathi

 

गरोदर आहात म्हणून केवळ आराम करून चालत नाही. तुमच्या शरीराला व्यायामाचीही गरज असते. शरीराची हालचाल होणे गरजेचे आहे. त्यामुळे गरोदरपणात करायचे व्यायाम नक्की कोणते? येतात ते पाहूया. 

ADVERTISEMENT

वेट ट्रेनिंग – गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्या तुम्ही वेट ट्रेनिंग करू शकता. यामुळे शरीर अधिक मजबूत होते आणि गर्भवस्थेचा भार सहन करण्याची शरीराची तयारी होते. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही वेट ट्रेनिंग करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या ट्रेनरची मदत घ्यावी. एकट्याने व्यायाम करू नये.

धावणे – तुम्ही पहिल्यापासून धावत असाल तर या दरम्यान तुम्ही रनिंग करू शकता. केवळ एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही या दरम्यान जोरात धाऊ शकत नाही. तसंच रस्त्यात अडखळायला होईल अथवा खराब रस्ता असेल तिथे धाऊ नका. तुम्हाला जिथे थकवा जाणवायला लागेल तिथे लगेच धावणं बंद करा. धावताना अत्यंत कमी वेगात धावा. 

पोहणे – गर्भावस्थेच्या सुरूवातीच्या काळात तैराकी करणे फायदेशीर ठरते असं म्हणतात. पाण्यामध्ये तुमचे वजन जमिनीपेक्षा अधिक हलके असते. त्यामुळे आराम मिळतो आणि तुमच्या शरीराला चांगला व्यायामही मिळतो. तुम्ही पोहताना नेहमी आपल्या प्रशिक्षकाची मदत घ्या. एकट्याने गरोदर असताना पोहायला जाऊ नका. 

चालायला जाणे – गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्यात तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ चालायला जायला हवे. यामुळे तुम्ही स्वतः ताजेतवाने होता आणि तुमच्या अंगातील रक्ताप्रवाह व्यवस्थित राखण्यास मदत मिळते. वजन जास्त वाढत नाही.

ADVERTISEMENT

पिलेट्स व्यायाम – आता अनेक सेलिब्रिटी पिलेट्स करताना दिसतात. गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्यातही तुम्ही हा व्यायाम करू शकता. यामुळे पाठ, पोट आणि शरीराला चांगली मजबूती मिळते. त्रास होत नाही. 

तिसऱ्या महिन्यातील स्कॅनिंग आणि परीक्षण (Scanning And Test For Pregnancy In Marathi)

Scanning And Test For Pregnancy In Marathi

 

तिसऱ्या महिन्यात आपण योग्य खातोय की नाही, व्यायामासह गर्भावस्था कशी आहे याची चाचणी करून घेणेही गरजेचे असते. यादरम्यान कशाची चाचणी करायची आणि कोणत्या स्कॅनिंग टेस्ट असताता याची माहिती – 

  • वजन आणि रक्तदाबाची तपासणी 
  • गर्भाशयाचा आकार जाणून घेण्यासाठी पोटाचे माप घेणे 
  • या महिन्यात तुम्ही बाळाच्या हृदयाचा आवाज ऐकू शकता 
  • साखर आणि प्रोटीन स्तराच्या तपासणीसाठी युरिन टेस्ट 
  • रक्तामधील आरएच फॅक्टर तपासण्यासाठी रक्ताची चाचणी. यामधून रक्तातील प्रोटीनच्या प्रमाणाबाबत कळते 
    हात आणि पायावर सूज असल्यास, फ्लुईड रिटेन्शन टेस्ट

तिसऱ्या महिन्यात करण्यात येणारे स्कॅनिंग

 

न्यूकल ट्रान्सलुसेन्सी (एटी) स्कॅन – यामध्ये बाळाच्या डोक्याच्या मागे असणाऱ्या तरल गोष्टींची तपासणी होते. साधारण 12 व्या आठवड्यात हे स्कॅनिंग होते. डाऊन सिंड्रोम असल्यास, या आठवड्यात कळून येते. बाळाची आनुवंशिक निरोगी स्थिती यातून कळते. बाळाच्या विकासामध्ये कोणतीही बाधा येत नाही ना याची यातून माहिती मिळते. 

मॅटरनल सिरम टेस्ट – यामध्ये गर्भवती महिलेच्या रक्ताची तपासणी करण्यात येते. हे स्कॅन साधारणतः 11-13 व्या आठवड्याच्या दरम्यान करण्यात येते. प्रेगनन्सी असोसिएटेड प्लाझ्मा प्रोटीन ए (पीएपीपी – ए) आणि ह्यूमन कोरियॉॉनिक गोनडोट्रोपिन (एचसीजी) चा स्तर तपासण्यासाठी ही चाचणी करण्यात येते. 

ADVERTISEMENT

अल्ट्रासाऊंड – अल्ट्रासाऊंडच्या मदतीने गर्भाशयामध्ये असणारी नाळ कोणत्या स्थितीमध्ये आहे आणि एमनियोटिक द्रव योग्य स्थितीत आहे की नाही याची माहिती मिळते. साधारण तिसऱ्या महिन्यात ही चाचणी करण्यात येते. 

तिसऱ्या महिन्यात कशी घ्यावी काळजी (How To Care In 3rd Month Of Pregnancy In Marathi)

 

गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्यात खाण्यापिण्यापासून ते व्यायामापर्यंत अनेक गोष्टीत काळजी घ्यावी लागते. नक्की कशी काळजी घ्यायची ते थोडक्यात जाणून घ्या. 

  • भरपूर आणि पौष्टिक जेवण घ्या 
  • जास्तीत जास्त आराम करा 
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या. हे बाळाच्या विकासासाठी आवश्यक आहे
  • फळ आणि भाज्या खाण्यापूर्वी व्यवस्थित धुवा आणि नेहमी स्वच्छ करूनच खा 
  • या दरम्यान हिरड्यांमधून रक्त येणे ही कॉमन समस्या आहे. त्यामुळे नियमित स्वरूपात दातांचीही काळजी घ्या.  तपासणी करून घ्या 
  • व्यायाम करा. सतत सकारात्मक विचार करा. ताण घेऊ नका. घरामध्ये लहान बाळांचे फोटो लावा. सतत चांगल्या माणसांमध्ये राहा 

वडिलांसाठी काही टिप्स (Tips For Father In Marathi)

 

गर्भावस्थेदरम्यान केवळ गर्भवती महिलाच नाही तर होणाऱ्या वडिलांचीही काही जबाबदारी असते. त्यामुळे वडिलांनाही काही गोष्टी लक्षात घ्या. 

  • गरोदर असणाऱ्या महिलेची शारीरिक स्थिती अत्यंत कमकुवत असते. त्यामुळे घरकामात तिला मदत करता येईल असे नक्की पाहा 
  • गरोदरपणात बऱ्याचदा महिलांना एकटेपणा वाटतो. अशावेळी सतत तिच्या बरोबर राहा. तिची चिडचिड झाली तरीही तिला समजून घेण्यात मदत करा
  • जितके जास्त जमेल सकारात्मक राहून पत्नीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तिला बाहेर फिरायला घेऊन जा

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1- तिसऱ्या महिन्यात रक्तस्राव होऊ शकतो का?

कोणत्याही महिलेच्या शरीरानुसार ही प्रक्रिया घडत असते. तुम्ही अधिक ताण घेतला तर तिसऱ्या महिन्यात रक्तस्राव होऊ शकतो. त्यामुळे गरोदर असल्याचे कळल्यापासूनच काळजी घ्यावी.

2- बाळाची वाढ नीट होते की नाही कसे कळणार?

तिसऱ्या महिन्यात डॉक्टर्स काही टेस्ट करून घेतात. यामधून बाळाचा विकास योग्य होतोय की नाही, त्याची वाढ होतेय की नाही याची इत्यंभूत माहिती कळते.

3- तिसऱ्या महिन्यात सगळ्याच महिलांना त्रास होतो का?

तिसऱ्या महिन्यापर्यंत पोटदुखी, पाठदुखी, मळमळणे, उलटीसारखे होणे हे त्रास अत्यंत कॉमन आहेत. पण सगळ्याच महिलांमध्ये हे त्रास असतात असं नाही. काही महिलांना यातील कोणताही त्रास होत नाही.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
18 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT