आहारात असतील हे पदार्थ तर हमखास होतील गॅसेसचे त्रास

आहारात असतील हे पदार्थ तर हमखास होतील गॅसेसचे त्रास

पोटाच्या विकारांनी तुम्ही सतत त्रस्त असाल तर आजचा विषय तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे. पोटात गॅस होणे, पोटात कळा येणे, डोकेदुखी या सगळ्या गोष्टी पोटात गॅसेस तयार झाल्यावर होतात. पोटात गॅसेस तयार होण्यामागे आहार हा कारणीभूत असतो. जर तुम्ही आहारात काही गोष्टींचा समावेश करत असाल तर तुम्हाला हा त्रास होणे अगदी स्वाभाविक आहे. आम्ही काही अशा काही पदार्थांची यादी केली आहे. हे पदार्थ तुमच्या आहारात असतील तर तुम्हाला गॅस होणे स्वाभाविकच आहे. चला जाणून घेऊया गॅसला कारणीभूत ठरणारे असे पदार्थ

गॅसचा होतो त्रास मग करा हे घरगुती उपाय आणि मिळवा झटपट आराम

बटाटा 

बटाटा खूप जणांना आवडतो. आहारात रोज बटाटा असावा असे खूप जणांना वाटते. बटाट्याची भाजी, बटाट्याचे चिप्स, बटाट्याचे इतर काही चटपटीत पदार्थ चवीला खूप चांगले लागतात. पण बटाटा जितका चटपटीत असतो. तसा तो पचताना फारच त्रासदायक असतो. बटाट्याचे पदार्थ हे बरेचदा तेलकट पद्धतीने खाल्ले जातात. त्यामुळे बटाटा खाणे थोडे कमी करा आणि तो खात असाल तर भरपूर पाणी प्या. तर त्याचा त्रास होणार नाही.

फरसाण
फरसाण हा असा चटपटीत स्नॅक्स आहे जो खाण्याची इच्छा अनेकांना असते. बेसनपासून तयार केला जाणारा हा पदार्थ बनवताना त्यामध्ये सोडा घातला जातो. त्यामुळे या पदार्थांमध्ये आधीच हवा, पोकळी असते. असे पदार्थ खाल्यानंतर ते खातच राहावेसे वाटतात. अगदी वाटीभर जरी फरसाण खाल्ला तरी तो पोट भरतो. मन भरत नाही. मग काय असे पदार्थ सतत खाल्ले जातात. ते योग्यपद्धतीने पचत नाही आणि त्यामुळे पोटात गॅस होतो.


वाटाणे
कडधान्य ही आरोग्यासाठी चांगली असली तरी देखील त्यामुळे गॅसेस होण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त असते. वाटाणे हा असा प्रकार आहे जो खाल्ल्यानंतर अनेकांना गॅस झाल्याचे सहज जाणवते. कडधान्य खायला तुम्हाला आवडत असतील तर ती चावून आणि योग्यवेळी खा. नीट शिजवलेले कडधान्य पचण्यास फारसा वेळ लागत नाही. पण जर तुम्ही कडधान्य खात असाल तर नीट शिजवून योग्य पद्धतीने खा म्हणजे तुम्हाला पोटात गॅसचा त्रास होणार नाही.

सतत होत असेल पोटाची समस्या तर प्या हे ज्युस, होईल पोट साफ

Instagram

 फुललेले चणे

चणे शेंगदाणे हा अनेकांचा आवडीचा स्नॅक आहे. चणे  खायला खूप जणांना आवडतात. चण्याला घोड्याचे खाणे असे म्हटले जाते. पण यामुळे तुम्हाला गॅसेसचा चांगलाच त्रास होऊ शकतो. फुललेले चणे हे प्रोटीन आणि पोषक घटकांनी जरी भरले असले तरी त्याचे अतिसेवन पोटासाठी चांगले नाही. चणे हे चावून खाल्ले नाही तर ते पचण्यास अडथळा निर्माण करतात. त्यामुळे चणे किंवा चण्यासारखेच इतर फुलवलेले पदार्थ शक्यतो टाळा. 

तूरडाळ 

खूप जणांना तूरडाळीचा खूपच त्रास होतो. तुम्हालाही तूरडाळीचा त्रास होत असेल तर त्याऐवजी मूगडाळ किंवा मसूरडाळीचा समावेश करावा. त्यामुळे पोटात गॅसेस तयार होत नाही.  तूरडाळीचे सेवन बंद करण्यापेक्षा तुम्ही मिक्स डाळींचा समावेश केला तरी चालेल. 


एकंदरच वातुळ अशा पदार्थांमुळे गॅस होण्याची शक्यता असते. या शिवाय वांग, गवार, रताळी, पावटा या पदार्थांमुळे हमखास गॅस होऊ शकतात. याकडे मुळीच दुर्लक्ष करु नका. 

पोट जड झाल्यासारखे वाटत असेल तर प्या हे पाचक ड्रिंक्स