निरोगी राहण्यासाठी नियमित खा शेवग्याच्या शेंगा, जाणून घ्या फायदे

निरोगी राहण्यासाठी नियमित खा शेवग्याच्या शेंगा, जाणून घ्या फायदे

भारतीय खाद्यसंस्कृतीत शेवग्याच्या शेंगा आणि पानांचा चांगल्या पद्धतीने वापर केला जातो. भाजी अथवा सांबारात शेवग्याच्या शेंगा टाकल्याने त्या पदार्थांना एक छान चव येते. डाळ, सूप, लोणचं, सलाड अथवा अनेक पद्धतीने या शेंगा खाता येत असल्यामुळे त्या एक प्रकारे सूपरफूडच आहेत. ड्रमस्टिक्स (Drumsticks) म्हणजेच शेवग्याच्या शेंगाचे आरोग्यावरही चांगले फायदे (Benefits of Drumstiks) होतात. कारण या शेंगामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, प्रोटिन्स, कॉपर,सोडीअम, झिंक, सेलेनिअम, कार्बोहायड्रेट फायबर्स,व्हिटॅमिन ए,बी,सी, डी,  असे अनेक गुणधर्म असतात. ज्यामुळे या शेंगा आहारात असतील तर तुमच्या अनेक समस्या नक्कीच दूर होऊ शकतात.

शेवग्याच्या शेंगाचे फायदे (Benefits of Drumstiks)

शेवग्याच्या शेंगामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि आरोग्याला फायदा होतो. 

रक्तातील साखर नियंत्रणात राहते

मधुमेहींसाठी ही एक चांगली बातमी आहे की शेवग्याच्या शेंगा खाण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. जर तुमची रक्तातील साखर सतत वाढत असेल तर तुमच्या आहारात शेवग्याच्या शेंगा असायलाच हव्या. शेवग्याच्या शेंगामधुळे पित्ताशयाचे कार्य सुधारते आणि शरीरातील रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

रोग प्रतिकारशक्ती वाढते

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा  या वरदानच ठरू शकतात. कारण त्यामध्ये अनेक पोषक घटक आहेत त्यामुळे तुमचं आजारपणापासून रक्षण होतं. जर तुम्हाला सतत आजारी पडायचं नसेल तर आहारात शेवग्याच्या शेंगाचा समावेश करा. शेवग्याच्या शेंगामधील व्हिटॅमिन सी तुमचे सर्दी, खोकला, ताप अशा इनफेक्शनपासून बचाव करते. 

बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो

जर तुम्हाला सतत बद्धकोष्ठता, अपचन, गॅस असा त्रास होत असेल तर तुम्ही आहारात शेवग्यांच्या शेंगा आणि पानांच्या भाजीचा समावेश कराच. कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या पोटाला चांगला आराम मिळतो. आतड्याच्या समस्या आणि बद्धकोष्ठता  यामुळे नक्कीच कमी होऊ शकते.

रक्त शुद्ध होते -

शेवग्याच्या शेंगा खाण्यामुळे तुमचे रक्त शुद्ध होऊ शकते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटि बायोटिक घटक असतात. ज्या घटकांमुळे तुमचे रक्त शुद्ध करण्याचे कार्य केले जाते. या घटकांमुळे तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि रक्त शुद्ध होण्यास मदत होते. जर तुम्हाला रक्ता संबधीत समस्या असतील तर आहारात शेवग्याच्या शेंगा असणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. शिवाय यामुळे तुमच्या त्वचेवरही चांगला परिणाम होतो. रक्त शुद्ध झाल्यामुळे त्वचेवर चमक येते.

श्वासासंबधीत विकार बरे होतात

सध्याचा कोरोनाचा काळ हा असा आहे जेव्हा तुम्हाला श्वसनाच्या समस्या लवकर बऱ्या करणं गरजेचं आहे.  त्यामुळे जर तुम्हाला कोरोनाचं इनफेक्शन टाळायचं असेल तर आहातून शेवग्याच्या शेंगा खायलाच हव्या. कारण शेवग्याच्या शेंगामध्ये अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. ज्याचा परिणाम तुमच्या श्वसन मार्गातील दाह कमी होतो आणि श्वसनाच्या समस्या लवकर बऱ्या होऊ शकतात. 

शेवग्याच्या शेंगांचे दुष्परिणाम (Side Effects Drumsticks)

शेवग्याच्या शेंगा कोणी खाऊ नयेत अथवा किती प्रमाणात खाव्या हेही खूप महत्त्वाचे आहे. कारण अति प्रमाणात शेवग्याच्या  शेंगा खाल्ल्यास त्रास होऊ शकतो.

  • गरोदर महिलांनी शेवग्याच्या शेंगा खाऊ नयेत. जर खाण्याची खूप इच्छा होत असेल तर याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
  • ज्यांचा रक्तदाब कमी आहे त्या लोकांनी शेवग्याच्या शेंगा प्रमाणातच खाव्या
  • मधुमेहींनीही अति प्रमाणात शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास त्यांना त्रास होऊ शकतो.