होळी साजरी करण्याची पद्धत, वेगवेगळ्या ठिकाणी होते अशी होळी (Different Holi Celebrations)

होळी साजरी करण्याची पद्धत

काही दिवसांवर होळी आली आहे. होळी म्हटली की डोळ्यासमोर सर्वात पहिले येते ती रंगाची उधळण. खरं तर होळी हा सण भारतात सगळीकडेच साजरा करण्यात येतो. वेगवेगळ्या ठिकाणी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने ही होळी साजरी केली जाते. आपल्याकडची पद्धत तर प्रत्येकालाच माहीत असते. पण वेगवेगळ्या प्रांतात होळी साजरी करण्याची पद्धत नक्की कशी आहे याची माहिती तुम्हाला आहे का? ‘आला होळीचा सण आला चल नाचूया’ असं म्हणत आपण सगळेच होळी आणि धुळवडीला रंगामध्ये न्हाऊन निघतो. पण परंपरागत असणारा हा होळीचा सण कसा साजरा करयचा असतो हे नव्या पिढीला अजूनही नीटसं माहीत नाही. होळीची पूजा, दुसऱ्या दिवशीची धुळवड आणि खरं तर अजूनही गावाकडे जपली जाणारी परंपरा म्हणजे अर्थातच पाच दिवसांनी म्हणजे पंचमीला साजरी होणारी रंगपंचमी. आपल्याकडे शहरांमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशीच रंगांची उधळण केली जाते. पण खरं तर ही उधळण पंचमीच्या दिवशी होणे अपेक्षित आहे. हीच सर्व माहिती आम्ही या लेखातून खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

Table of Contents

  महाराष्ट्रातील होळी आणि रंगपंचमी (Rang Panchami – Maharashtra)

  होळी हा प्रकर्षाने उत्तर भारतात अधिक प्रमाणात साजरा केला जाणारा सण आहे. या होळीच्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", फाग, फागुन "दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी ओळखले जाते. कोकणात शिमगो म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव",आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते. देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने या सणालाला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे.यातूनच ‘शिमगा’ असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते. महाराष्ट्रामध्ये होळीच्या दिवशी समिधा अर्थात काही लाकडे मंत्रोच्चारासह दहन करण्यात येतात आणि पेटलेल्या होळीभोवती आलेले संकट दूर होवो यासाठी बोंबा मारत फिरण्याची पद्धत आहे. आजही ही पद्धत आपल्याकडे तशीच अविरत आहे. अनेकजण होळीच्या शुभेच्छा यादिवशी देत असतात

  महाराष्ट्रात घराघरामध्ये पुरणपोळीचा नेवैद्य दाखवला जातो. तर यादिवशी होळीला नारळ अर्पण करून आपल्यावर कोणतेही संकट न येवो यासाठी प्रार्थनाही केली जाते. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला' धुळवड' असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. खरं तर सर्वांनी एकत्र जमून एकमेकांशी संवाद साधणे हेच कोणत्याही सणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रातही याच उद्देशाने ही होळी साजरी करण्यात येते. 

  कोकणात साजरा केला जाणारा शिमोगत्सव (Celebration In Kokan - Shimgotsav)

  Instagram

  लहान मुलांना त्रास देणाऱ्या होलिका आणि ढुंढा, पूतना यासारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमध्ये अनेक जण आजही गुंतलेले आहेत. एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे. 

  कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो. फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा उत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो. अर्थात यावेळात शेतीची कामे संपलेली असतात. शेतीची भाजणी करून ठेवलेली असते. आता पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे साधारण 6-7 जूनपर्यंत (सूर्य रोहिणी नक्षत्रात यायचा दिवस) विश्रांतीचा काळ असतो. त्यामुळे हा काळ कोकणात शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी वापरला जातो. कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. अगदी चाकरमानीही खास सुट्टी काढून शिमगोत्सवासाठी गावाला रवाना होतात. शिमगोत्सवाला कोकणात खूपच प्राधान्य दिले जाते. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला ‘भद्रेचा होम ‘ असे म्हणतात. शेतकऱ्यांसाठी कामातून वेळ काढून एकमेकांना वेळ देण्याचा हा उत्तम कालावधी असतो. तसंच होळीच्या दिवसात अनेक शेतकरी एकमेकांसह वेळ घालवू शकतात. 

  फाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात आणि नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात. काही ठिकाणी आधी पालख्या फिरतात आणि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी होते. याला ‘होम’ लागणे असा शब्दप्रयोग वापरतात. काही गावात होम झाल्यानंतरही गावात पालख्या फिरत राहतात अशी प्रथा दिसते. तर काही ठिकाणी आजही गावामध्ये खेळे येतात. पौर्णिमेला रात्री उशीरा होम लावला जातो. काही ठिकाणी त्यावर जिवंत कोंबडे लावतात. अशा वेळी तो होम रात्री बारापूर्वी लावतात. या कोंबड्याचा प्रसाद घरी नेऊन त्याचा प्रसाद घेतात, याला तिखटाचा सण म्हणतात. काही ठिकाणी रात्री बारा ते पहाते पाच या वेळात होम लावतात, यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, याला गोडाचा सण असे म्हटले जाते. ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावायचा मान असतो. हा होम झाल्यावर त्यातील निखारा किंवा राख घेऊन जातात आणि त्यावर गावातील ठिकठिकाणी होळी पेटवतात. 

  आदिवासी जमातीमध्ये साजरी करण्यात येणारी होळी (Celebration In Adivasi Jamat)

  Instagram

  भारतामध्ये अनेक जमाती आहेत आणि त्यापैकी एक महत्वाची जमात म्हणजे आदिवासी जमात. होळीचा हा सण आदिवासी जमातीतही वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. गुलाल उधळून, टिमक्या आणि ढोल वाजवून, तसंच आपला आनंद नृत्य करून उत्साहात होळीच्या दिवशी साजरा करण्यात येतो. होळी साजरी करताना आदिवासी लोकांच्या जेवणामध्ये गोड पुरी, मासे आणि गोड भात असा पदार्थांचा समावेश करण्यात येतो. दरम्यान सातपुडा पर्वत प्रदेशातील आदिवासी हे होळीमध्ये काठी उत्सवही साजरा करात. तर बाराव्या शकतापासून ही परंपरा चालत आली आहे असे मानले जाते. विविध नक्षीकामाचे दागिने घालून यामध्ये स्त्री आणि पुरूष सहभागी होतात आणि आपला आनंद दर्शवतात. विविध वाद्यांच्या तालावर इथे नृत्य साजरे करण्यात येते. होळी उत्सव हा सर्वांसाठी आनंद घेऊन येतो असे म्हटले तर नक्कीच वावगे ठरणार नाही. 

  होळी सणाची माहिती आणि होळी स्पेशल 'खाद्यपदार्थ' (Holi Information In Marathi)

  लठमार होळी - उत्तर प्रदेशातील होळी (Lathmar Holi – Uttar Pradesh)

  Instagram

  उत्तर प्रदेशात होळीला अनन्यसाधारण महत्व आहे. व्रज भागामध्ये तर अधिक महत्व आहे. इथले कृष्ण आणि होळी अशा धार्मिक गोष्टीही प्रसिद्ध आहोत. उत्तर भागातील अगदी लहान लहान खेडेगावांमध्येही होळीला विशेष महत्व आहे. लाकडे रचून होळी पेटवली जाते आणि मग सभोवती सर्व तरूणाई नृत्य करते. तर वाराणसीमध्ये होळीच्या अग्नीवरून चालत जाण्याचीही प्रथा आहे. उत्तर प्रदेशात लठमार हा होळीच्या दिवशी खेळला जाणारा महत्वाचा खेळ आहे. उत्तर प्रदेशातील व्रज, बरसाना आणि नंदगाव याठिकाणी लठमार होळी खेळण्यात येते आणि हा अनोखा उत्सव असतो. रंगपंचमीची माहिती आणि महत्त्व अनोखे असते.

  होळीच्या दिवशी बरसाना क्षेत्राचे नाव घेतले जाणार नाही असे अजिबात होऊ शकत नाही. मथुरेच्या बरसानाध्ये होणाऱ्या या होळीचा संबंध प्रेमाशी आहे. राधा कृष्णाचे प्रेम इथेच बहरले आणि कृष्ण आपल्या मित्रांसह राधेसह होळी खेळायला इथे यायचा असे समजण्यात येते. राधाकृष्णाच्या प्रेमाच्या रंगाची होळी आजही इथे लठमार होळीच्या प्रतिकासह साजरी करण्यात येते. कृष्ण राधेला खूपच त्रास द्यायचा आणि मग राधा काठीने त्याला मारायला यायची असा समज आहे. त्यामुळे आजही तशाच स्वरूपाची ही लठमार होळी खेळण्यात येते. 

  होला मोहल्ला - पंजाबमधील होळी (Hola Mohalla – Punjab)

  Instagram

  शीख धर्मातील पवित्र धर्मस्थान आनंदपूर साहिबमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी एक मेळा आयोजित केला जातो. ज्याला होला मोहल्ला असं म्हणतात. शीख धर्मातील व्यक्तींसाठी हे अतिशय महत्वपूर्ण मानले जाते. पौरूषाचे प्रतीक म्हणून या ठिकाणी होळी साजरी करण्यात येते. होला मोहल्ला उत्सव सहा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी घोड्यावरून अनेक व्यक्ती तलवार कसब, साहस आणि जोषाचे प्रदर्शन करतात. तर रंगाची उधळण केली जाते. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या जत्रा भरल्या जातात. आनंदपूर साहिब पूर्ण सजवण्यात येते. तर बोले सो निहालचे नारे लावण्यात येतात. इथला आनंद आणि उत्साह या दिवसात काही वेगळाच असतो. गुरू गोविंद सिंह (शिखांचे दहावे गुरू) यांनी स्वतः ही प्रथा सुरू केली असल्याचे सांगण्यात येते. हा उत्सव पंजाबमध्ये सुरू होतो तर याची समाप्त हिमाचल प्रदेशातील सीमेवरील वाहती नदी गंगेच्या ठिकाणी समाप्ती होते. ही खूप मोठी यात्रा असते आणि इथे अशा प्रकारे अनेक कार्यक्रमांसह होळी साजरी करण्यात येते. 

  कुमाऊनी - उत्तर प्रदेशातील वेगळी होळी (Kumaoni – Uttar Pradesh)

  Instagram

  कुमाऊनी होळीची आपली अशी एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख आहे. कुमाऊ मध्ये होळीचा हा उत्सव साधारण दोन महिने चालू असतो. कुमाऊमध्ये होळीचा हा सण अतिशय महत्वपूर्ण मानला जातो. इथे रंगाचा हा उत्सव एका वेगळ्याच रंगात न्हाऊन निघालेला दिसतो. आता लवकरच शेतीला सुरूवात होणार असल्याची सूचना हा उत्सव देतो. देशातील इतर भागांमध्ये ज्याप्रमाणे होळी साजरी होते त्यापेक्षा वेगळ्या स्वरूपात इथे होळी साजरी करण्यात येते. ‘बैठकी होळी’ आणि ‘खडी होळी’ असे दोन प्रकार इथे असतात. दोन्ही स्वरूपाच्या होळीमध्ये लोक वेगवेगळी गाणी ढोलकी, हार्मोनियम, ढोल यासह गातात. ही गाणी आपले महाकाव्य महाभारत, रामायण आणि पुराणांमधील अनेक गोष्टींवर आधारित असतात. तर काही गाणी ही रोजच्या आयुष्यावर आधारीत आणि हास्य रसातील असतात. या गाण्याचे बोल ही व्रज भाष, खडे बोल आणि कुमाऊनी या भाषेतील असून वेगळीच मजा यामध्ये असते. प्रत्येक वेळेनुसार ही गाणी रचलेली आहेत. या गाणाऱ्या लोकांना होल्यार असेही म्हटले जाते. ही एक वेगळीच होळीची मजा इथे अनुभवायला मिळते. 

  बिहारमधील फगुआ होळी (Phaguwa – Bihar)

  Instagram

  भोजपुरी भागामध्ये फगुआ होळी असते. फगुआ भाषेतील अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. भोजपुरीमध्ये वसंत ऋतुच्या आगमनाच्या आनंदात होळीचा उत्साह साजरा करण्यात येतो. चाळीस दिवस हा उत्सव साजरा करण्यात येतो. काही क्षेत्रात याला फाग असेही म्हणतात. होळीची रसभरी गाणी या दिवसात गाऊन गावागावत आनंद व्यक्त करण्यात येतो. तर रंगाची उधळणही केली जाते. उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे होळी साजरी करण्यात येते. त्यातील एक प्रकार म्हणजे बिहारमधील ही फगुआ होळी. बऱ्याचदा श्रृंगार रसामध्ये ही गाणी असतात. राधा - कृष्ण, राम सीता अथवा शिव पार्वती यांच्या वर्णानाची ही गीते होळीच्या दिवशी गायली जातात. साहित्यात देखील फगुआ साजरे करण्याचा उल्लेख दिलेला आहे. भोजपुरी भाषा बोलणाऱ्या व्यक्तींना फगुआ माहीत नाही असं होणार नाही. मात्र आता याचे महत्व कमी होत चालले असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे बिहारमधील काही लोकांनी याचे महत्व जपण्याचा प्रयत्न केला आहे. 

  केरळमधील मंजुल कुली (Manjul Kuli – Kerala)

  Instagram

  केरळमध्ये ओणम प्रसिद्ध आहे. पण इथे रंगाचा उत्सवही तितक्याच जल्लोषात साजरा करण्यात येतो हे फारच कमी लोकांना माहीत असेल. होळीचा हा सण इथे मंजुल कुली अथवा उक्कुली या नावाने ओळखला जातो. तुम्हाला जर अगदी शांत आणि शालीन पद्धतीने होळी साजरी करण्याची इच्छा असेल तर केरळमधील होळी तुमच्यासाठी नक्कीच योग्य ठरते. इथे कोणताही उथळपणा होळीच्या उत्सवाला दिसून येत नाही. रंगाची उधळण अगदी शांत आणि तितक्याच जल्लोषात इथे साजरी करण्यात येते. 

  डोल जत्रा (दोल जात्रा) - बंगालमधील होळी (Bangal Holi)

  Instagram

  दोल जात्रा अथवा दोल उत्सव बंगालमध्ये होळीच्या एक दिवस आधी साजरा करण्यात येतो. या दिवशी महिला लाल काठाची पारंपरिक पांढरी साडी नेसून शंख वाजवून राधा कृष्णाची पूजा करतात आणि प्रभात फेरीही आजोयित करतात. यामध्ये किर्तन आणि वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हटली जातात. दोल म्हणजे पाळणा. पाळण्यावर राधा - कृष्णाची मूर्ती ठेऊन महिला भक्ती गीत गातात. अबीर आणि गुलालाने या दिवशी रंग उधळण्यात येतात आणि होळी खेळली जाते. पुरातन काळात या दिवशी श्रीमंत लोक आपल्या हवेलीची दारं उघडत होते आणि यादिवशी गरिबांसाठी भोजन समारंभ आयोजित करण्यात येत होता. शांतिनिकेतनची होळी अतिशय प्रसिद्ध आहे. काव्यगुरू रविंद्रनाथ टागोर यांनी वसंत उत्सवाची परंपरा सुरू केली ती आजही तशीच आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने इथे होळी साजरी करण्यात येते. मुली लाल काठाची पिवळी साडी नेसतात तर मुलं धोतर आणि कुडता यादिवशी घालतात. रंगाची उधळण यादिवशी करण्यात येते. 

  राजस्थानी होळी (Rajasthan Holi)

  Instagram

  राजस्थानी लोक होळी अगदी धुमधडाक्यात साजरी करतात. राजस्थानचे संस्कार जसे रंगबेरंगी आहे तोच रंग होळीमध्येही दिसून येतो. लोकगीतांसह अनेक चविष्ट पक्वान्नाची मेजवानीही होळीला इथे असते. आपली कला आणि संस्कृती जपून इथे होळीचा उत्सव साजरा करण्यात येतो. महाशिवरात्रीनंतर होळीच्या उत्सवाला सुरूवात होते आणि साधारण 16 दिवस हा उत्सव चालू राहतो. राजस्थानी लोकांसाठी होळी आणि दिवाळी हे सर्वात महत्वाचे सण आहेत. होळीनंतर सर्व सण, पूजा आणि पर्व, व्रत संपतात. फाल्गुननंतर रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. त्यामुळे होळी हा अत्यंत महत्वाचा सण मानला जातो. होळीला इथे खाण्यापिण्याची रेलचेल असते. दुधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ इथे जास्त वापरले जातात. विशेषतः दही वडा आणि दही भल्ले हे पदार्थ. आपल्या घरातील पशुंचे दूध काढून या पदार्थांचा आनंद घेतला जातो. 

  You Might Like This:

  होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!