कपड्यांवरील हळदीचे डाग काढणं आता अधिक सोपे, वापरा सोप्या टिप्स

कपड्यांवरील हळदीचे डाग काढणं आता अधिक सोपे, वापरा सोप्या टिप्स

स्वयंपाकघरात काम करताना नेहमीच काळजीपूर्वक करावं लागतं. कधी कधी घाईत आवडत्या कपड्यांवर हळदीचे डाग लागले की, मग डोक्याला हात लावून बसायची वेळ येते. कपड्यांवरील हळदीचे डाग पटकन निघत नाही. मग अशावेळी नक्की काय करायचं? कपडा फेकून द्यायचा का असा प्रश्न पडतो. पण असे कपडे फेकून देणेही जीवावर येते. डाग नव्या कपड्यांवर लागो अथवा जुन्या कपड्यांवर तो काढण्यासाठी खूपच मेहनत करावी लागते. कधी कधी तर हळदीचे डाग इतकी मेहनत करूनही जात नाहीत. पण आता तुम्हाला अधिक त्रास सहन करायची गरज नाही. हळदीचे डाग अगदी सोप्या पद्धतीने कपड्यांवरून कसे काढायचे याच्या काही सोप्या टिप्स तुम्हाला आम्ही या लेखातून देत आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही अगदी कितीही जिद्दी डाग असेल तरीही आरामात दूर करू शकता. दोन ते तीन वेळा तुम्ही या टिप्स वापरून कपडे धुतले तर हळदीचे डाग निघून जाण्यास मदत मिळते. जाणून घेऊया कोणत्या आहेत या सोप्या पद्धती. 

Beauty

WIPEOUT Sanitizing Spray

INR 199 AT MyGlamm

करा रबिंग अल्कोहोलचा वापर

रबिंग अल्कोहोल केवळ दिसायला साधारण दिसते. पण तुम्ही रबिंग अल्कोहोलच्या मदतीने कितीही जिद्दी आणि न जाणारा डाग वाटत असेल तर तो काढू शकता. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत लागत नाही. याचा वापर करताना डागही निघून जातात आणि कपड्यांना नुकसानही होत नाही. यासाठी तुम्ही कपड्यांना जिथे हळदीचा डाग लागला आहे तिथे 4-5 थेंब रबिंग अल्कोहोल टाकायचे आहे आणि मग काही वेळ कापड तसेच ठेवा. काही वेळानंतर कोमट पाण्याने हे स्वच्छ करून घ्या. तुम्हाला हळदीचे डाग निघून गेलेले दिसतील. तुम्ही याचा एक ते दोन वेळा वापर करावा. घरात जर रबिंग अल्कोहोल नसेल तर तुम्हाला बाजारात आरामात हे विकत घेता येते. 

टूथपेस्टने काढा डाग

Shutterstock

दात स्वच्छ करायला आपण नेहमीच टूथपेस्टचा वापर करतो. पण हीच टूथपेस्ट हळदीचे कपड्यांवरील डाग काढण्यासाठीही उपयुक्त ठरते. हो हे खरं आहे. कपड्यांवर जिथे हळदीचे डाग पडले आहेत तिथे तुम्ही टूथपेस्ट लावा आणि साधारण 5-10 मिनिट्स ते कपडे तसेच ठेवा. दहा मिनिट्स झाल्यावर स्वच्छ पाण्याने कपडा रगडून नीट घासून घ्या. यामुळे हळदीचे डाग पटकन निघून जातील. टूथपेस्ट केवळ हळदीचेच नाही तर कपड्यांवर लागलेले अन्य डागही काढण्यास फायदेशीर ठरते. 

सोप्या घरगुती उपायांनी घालवा कपड्यांवरील जिद्दी डाग

हायड्रोजन पॅरॉक्साईड आणि लिंबू

Freepik.com

कोणताही न जाणारा डाग अगदी सहजपणे घालविण्यासाठी सोपा घरगुती उपाय म्हणजे हायड्रोजन पॅरॉक्साईड आणि लिंबाचे मिश्रण. या मिश्रणामुळे कपड्यांवरील कोणताही डाग हा मुळापासून नष्ट होण्यास मदत मिळते. एका भांड्यात तुम्ही हायड्रोजन पॅरॉक्साईड आणि लिंबाचा रस घालून नीट मिक्स करून घ्या. यानंतर हे मिश्रण डाग पडलेल्या ठिकाणी तुम्ही लावा आणि मग कपडा काही वेळ बाजूला ठेवा. काही वेळानंतर ब्रशच्या मदतीने हे डाग आरामात स्वच्छ करून घ्या. यामुळे डाग घालविण्यास मदत मिळते आणि डाग पटकन निघून जातात. 

शर्टावर लिपस्टिकचा डाग लागल्यास, काढा सोप्या उपायांनी

अमोनिया अथवा ब्लीच

अमोनिया अथवा ब्लीच या दोन्हीमुळे हळदीचे डाग निघून जाण्यास मदत मिळते. हादेखील एक घरगुती उपाय आहे. यासाठी अमोनिया तुम्ही पाण्यात मिसळा आणि मग हळदीचे डाग असलेल्या कपड्यांना लावा. थोड्याच वेळात हे कपडे रगडून स्वच्छ करा. याप्रमाणेच तुम्ही ब्लीचचाही वापर करू शकता. लक्षात ठेवा या दोन्ही गोष्टी हाताळायला खूपच कठीण असतात. त्यामुळे कपड्यांवर याचा डायरेक्ट उपयोग करू नका. पाण्यात घालून मगच याचा उपयोग करा. अन्यथा कपडे खराब होण्याची शक्यता असते. तसंच हातावरही डायरेक्ट घेऊन याचा उपयोग करू नका. 

होळीच्या रंगाचे डाग कसे काढायचे, सोपी पद्धत

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक