हाताच्या या रेषा सांगतात होणार प्रेमविवाह की अरेंज मॅरेज

हाताच्या या रेषा सांगतात होणार प्रेमविवाह की अरेंज मॅरेज

कधी कधी आपल्याला हात दाखवण्याचा हेतू हा असतो की, आपला प्रेमविवाह होईल की नाही हे जाणून घ्यायचं असतं. तुम्ही केलं आहे का कधी असं आपल्या आयुष्यात? हाताच्या रेषा आपला प्रेम विवाह होईल की नाही हे स्पष्ट करतात असं हस्तरेषा अभ्यासक सांगतात. हातावरील रेषांवरून तुमच्या आयुष्यात प्रेम असेल की नाही की तुमचा अरेंज पद्धतीने अर्थात विवाहनोंदणी करून विवाह होईल हे कळते. लग्नाची रेषा हातावर असतेच. पण तुमची लव्ह लाईफ कशी आहे हे तुमच्या हातावरली सर्वात लहान बोट अर्थात करंगळीखाली असणारी रेषा तुम्हाला सांगते. या रेषेचा लहान अथवा मोठा आकार तुमच्या आयुष्यातील प्रेमाबाबत गोष्टी तुम्हाला जाणवून देते. लव्ह लाईन ज्याला हृदय रेखा असंही म्हटलं जातं ती तुमच्या हातावर कशी स्पष्ट दिसते आणि तुम्हाला नक्की कसे प्रेमविवाह होईल हे कळते हे या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

हृदय रेषा असेल लहान

Shutterstock

जर तुमची हृदय रेषा अर्थात लव्ह लाईफ लाईन लहान असेल आणि केवळ मधल्या बोटापर्यंतच असेल तर तुम्ही खूपच आत्मकेंद्रीत, स्वतःचा विचार करणारे आणि स्वार्थी माणूस असल्याचे दर्शवते. त्यामुळे तुमचा प्रेमविवाह होण्याची शक्यता नाही. इतकंच नाही तर तुम्ही शेवटपर्यंत एकटेच राहणार असल्याची ही चिन्हं आहेत. 

लव्ह लाईन मोठी असल्यास

तुमची हृदयरेखा अथवा लव्ह लाईन मोठी असेल आणि हाताच्या दोन्ही बाजूपर्यंत पोहचत असेल तर तुम्ही अत्यंत साधी व्यक्ती आहात. तुम्हाला आयुष्यात शॉर्टकट मारणं अजिबात जमत नाही. तुमचा स्वभाव अत्यंत रोमँटिक असून तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सांगण्यानुसार आयुष्य जगू शकता. तुम्ही नात्यामध्ये अत्यंत प्रामाणिक असून दुसऱ्या बाजूला प्रेमात धोका मिळाल्यास, यातून सावरण्यास कठीण जाईल अशी व्यक्ती आहात. त्यामुळे तुमचा प्रेमविवाह होऊ शकतो. पण प्रेमात धोका मिळाल्यास, तुम्हाला यातून बाहेर येताना खूपच त्रास होण्याची शक्यता असते. 

हस्तरेषाच नाही तर बोटांमधील फटही सांगते तुमच्या आयुष्यातील घडामोडी

गुरू पर्वतावर संपत असेल लव्ह लाईन

Shutterstock

तुमच्या हातावरील लव्ह लाईन ही हातावर असणाऱ्या गुरू पर्वतावर संपत असेल तर तुम्हाला आयुष्यात खूप प्रेम मिळणार आहे याची खूणगाठ बांधून ठेवा. तुम्हाला तुमच्या प्रेमाकडून खूपच अपेक्षा असतात आणि या अपेक्षा तुमच्या प्रेमात पूर्णही होतात. 

गुरू आणि शनि पर्वताच्या मध्ये संपत असेल लव्ह लाईन

जर तुमची हृदय रेखा गुरू पर्वत आणि शनि पर्वताच्या मध्ये संपत असेल तर आयुष्यात खऱ्या आणि अगदी खूप प्रेम तुम्हाला मिळणार आहे हे जाणून घ्या. तुमचा प्रेमविवाहच होईल. तुम्ही तुमच्या नात्यात स्वतःला झोकून देता आणि दुसऱ्या कोणत्याही नात्यात प्रेम शोधत नाही. तसंच तुम्ही तुमच्या प्रेमाशी अत्यंत प्रामाणिक राहता हे यावरून सिद्ध होते. 

शेवटपर्यंत लव्ह लाईन जात असून नंतर वेगळी होत असल्यास

Shutterstock

जर तुमची लव्ह लाईन अगदी शेवटपर्यंत जाऊन दोन भागामध्ये वेगळी होत असेल अथवा हलकीशी कर्व्ह होऊन खालच्या बाजूने येत असेल तर तुम्ही नात्यात स्वतःला अगदी झोकून देता. कोणताही आजूबाजूचा विचार न करता तुम्ही नात्यामध्ये स्वतःला विसरून जाता. अशा व्यक्तींचाही प्रेमविवाह होतो. 

हाताच्या रेषांवरून जाणून घ्या तुमची श्रीमंती

तीन रेषा दिसत असतील तर

तुमच्या लव्ह लाईनमध्ये जर तीन रेषा निघत असतील तर या व्यक्ती अतिशय शांत आणि दयाळू असतात. पण यांच्या दुर्भाग्याने या व्यक्तींच्या आयुष्यात प्रेम टिकत नाही. प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती अत्यंत दुर्भाग्यवान ठरतात. सामान्य लव्ह लाईफ यांना मिळू  शकत नाही. 

हाताच्या रेषा दर्शवतात तुमचं करिअर

लव्ह रेषेच्या शेवटी सर्व फाटे फुटत असल्यास

तुमच्या लव्ह रेषेच्या बाबतीत जर सर्व फाटे फुटत असतील तर या व्यक्ती आपल्या प्रेमाच्या बाबतीत अत्यंत स्थित असतात आणि या व्यक्तींना अगदी उच्चतम दर्जाचे प्रेम मिळते. एकच प्रेम या व्यक्ती टिकवून ठेवतात. या व्यक्तींना प्रेमात कधीही धोका मिळत नाहीत. यांचा प्रेमविवाह तर होतोच, शिवाय हा प्रेमविवाह आयुष्यभरासाठी टिकून राहातो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक