वॉशिंग मशीनमध्ये शूज धुण्यासाठी फॉलो करा या टिप्स

वॉशिंग मशीनमध्ये शूज धुण्यासाठी फॉलो करा या टिप्स

धकाधकीच्या जीवनात वैयक्तिक कामे करण्यासाठी प्रत्येकाला पुरेसा वेळ मिळतोच असं नाही. मात्र आधुनिक काळातील विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही तुमचा बराचसा वेळ वाचवू शकता. कपड्यांप्रमाणेच शूजदेखील वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यामुळे तुमच्या बराचसा वेळ वाचू शकतो. जॉगिंगचे शूज अथवा स्नीकर्स हे कापडी असतात त्यामुळे ते मळले तरी ते धुतले की स्वच्छ होतात. घामाने भिजलेले शूज सतत वापरल्यामुळे तुमच्या पायाला इनफेक्शन होण्याचा धोका निर्माण होतो. यासाठीच शूज वॉशिंगमध्ये धुवा. मात्र शूज धुताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. नाहीतर तुमच्या शूजचा आकार बदलू शकतो अथवा ते खराब होऊ शकतात. यासाठीच फॉलो करा आम्ही दिलेल्या या सोप्या टिप्स आणि स्वच्छ करा तुमचे शूज घरच्या घरी. 

शूजवरचे डाग काढा -

जर तुमच्या शूजवर कठीण डाग असतील तर मशीनमध्ये धुवायला टाकण्याआधी ते धुवून घ्या. डाग काढण्यासाठी तुम्ही कापसावर व्हिनेगर घेऊन ते शूजवर लावू शकता. ज्यामुळे तुमच्या शूजवरचे हट्टी डाग निघून जातील. तुम्हाला जर तुमचे स्नीकर्स  मशीनमध्ये धुवायचे असतील तर ते थोडा वेळ बेकिंग सोड्यामध्ये भिजत ठेवा. ज्यामुळे ते मशीनमध्ये धुतल्यानंतर चांगले स्वच्छ होतील. 

शूजच्या लेस काढून मग ते मशीनमध्ये टाका -

मशीनमध्ये शूज धुण्यासाठी टाकण्यापूर्वी त्यावर असलेल्या लेस काढून टाका. कारण लेस सकट जर तुम्ही शूज वॉशिंग मशीनमध्ये टाकले तर ते स्वच्छ धुतले जात नाहीत. शिवाय मशीनमध्ये त्या लेस एकमेकांमध्ये गुंतून खराब होण्याची शक्यता असते. यासाठीच साबण्याच्या पाण्यात थोडावेळ या लेस बुडवून ठएवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका. मशीनमध्ये धुतलेल्या शूजसोबत त्या वाळण्यास ठेवा. 

मशीनमध्ये नेमके कसे धुवावे शूज -

वॉशिंग मशीनमध्ये शूज धुण्यास टाकण्यापूर्वी ते नेटच्या मॅश बॅगेमध्ये पॅक करा. तुम्ही वेगवेगळ्या बॅगमध्ये तुमचे वेगवेगळे शूज एकत्र धुण्यासाठी टाकू शकता. त्यानंतर मशीन सुरू करा आणि त्यात थंड पाणी सुरू करा. गरम पाण्याने तुमचे नाजूक शूज खराब होण्याची शक्यता असते. मशीनमध्ये शूज नेहमी जेंटल वॉश मोडवरच सेट करून धुवावे त्यामुळे त्यांचे नुकसान होत नाही. शूज धुण्यासाठी नेहमी लिक्विड डिटर्जंटचा वापर करा कारण पावडर डिटर्जंटमुळे तुमचे शूज खराब होऊ शकतात. एकदा विसरून झाल्यावर टबमध्ये क्लॉथ सॉफ्टनर टाका ज्यामुळे शूजचं कापड मऊ होईल.

शूज वाळवताना काय काळजी घ्याल -

वॉशिंग मशीनमध्ये शूज धुवून झाल्यावर ते मॅश बॅगेतून काढून घ्या आणि वाळत ठेवा. शूजचा आतला भाग लवकर सुकण्यासाठी तुम्ही शूजच्या आत न्यूजपेपरचे गोळे भरून ठेवू शकता. कारण त्यामुळे शूजमधील ओलावा शोषून घेतला जाईल. हवेशीर जागी, बाल्कनी अथवा मोकळ्या जागेत तुम्ही शूज सुकवू शकता. फार कडक उन्हात शूज वाळत घालू नका कारण त्यामुळे ते कडक होऊ शकतात. 

आम्ही शेअर केलेल्या या सोप्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि तुम्हाला त्याचा काय फायदा झाला हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा.