रंगपंचमीसाठी घरीच तयार करा भांग

रंगपंचमीसाठी घरीच तयार करा भांग

होळीची तुमची तयारी झाली का? यंदाही घरीच राहून घरच्यांसोबत होळीचा सण साजरा करण्याचा विचार करत असाल तर घरी राहून मस्त या दिवशी केल्या जाणाऱ्या खास पदार्थांचा आस्वाद घ्यायला हवा. होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी तुमच्याकडे नेमकं काय बनवलं जाते. भांग हा प्रकार तुम्ही कधी ट्राय केला आहे का? जर तुम्हाला थंडाई न पिता भांग प्यायची असेल तर आम्ही सोपी भांग रेसिपी तुमच्यासाठी निवडली आहे. महाराष्ट्रात भांग हा प्रकार केला जात नाही. उत्तर प्रदेशात भांग ही अगदी घराघरात केली जाते. जर तुम्ही घरीच भांग करण्याचा विचार करत असाल तर या सोप्या पद्धतीने भांग बनवूया.

रंगपंचमी माहिती आणि महत्त्व (Rangpanchami Information in Marathi)

अशी तयार करा भांग

Instagram

भंग का रंग जमा हो… असे म्हणत तुम्हालाही अगदी तशीच भांग प्यायची इच्छा असेल तर यंदा ती देखील ट्राय करा. 

साहित्य: भांगेची गोळी, दूध, साखर, आवडीचा सुका मेवा, संत्र्याचा रस , द्राक्षाचा अर्क 

कृती :

  • तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट बारीक वाटून घ्या. एका भांड्यात दूध गरम करुन त्यामध्ये साखर घालून उकळून घ्यायचे आहे. त्यामध्ये ड्रायफ्रुट घालून चांगले उकळून घ्या. 
  • दूध उकळून झाल्यानंतर त्यामध्ये भांगेची गोळी घाला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याला थोड अजून जड आणि हटके बनवण्यासाठी त्यामध्ये द्राक्षाचा किंवा संत्र्याचा अर्क घालू  शकता. त्यामुळे थोडासा आणखी एक पंच मिळतो.
  • तुम्हाला थोडा प्रयोग करायला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घालू शकता.

रंगपंचमी खेळण्याआधी आणि नंतर अशी घ्या नखांची काळजी

भांगेची चटणी

भांगेपासून वेगळं काहीतरी बनवायचा विचार करत असाल तर भांगेची चटणीही तुम्ही बनवू शकता. ही भांगेची चटणी या दिवशी बनवल्या जाणाऱ्या चटपटीत पदार्थांसोबत सर्व्ह केली जाते. भांगेची चटणी ही तितकीच चटपटीत आणि किक देणारी असते. जर तुम्हाला अशी चटणी करायची असेल तर  नक्की ट्राय करा ही रेसिपी 

साहित्य:  भांगेचे दाणे, हिरव्या मिरच्या,  लिंबाचा रस, पुदीना,  मीठ आणि पाणी 

कृती : 

  • भांगेचे दाणे घेऊन ते तव्यावर चांगले भाजून घ्या. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले भांगेचे दाणे आणि उरलेले सगळे साहित्य एकत्र करुन  त्याची चटणी वाटून घ्या.
  • आता ही चटणी तुम्ही मस्त पकोडे किंवा भजीसोबत सर्व्ह करा. तुम्हाला ही चटणी नक्कीच आवडेल.

 
आता या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला होळीचा आनंद अधिक चांगला घेता येईल. तोही थोड्या हटक्या पद्धतीने  याशिवाय तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीही ट्राय करु शकता जे या आनंदात आाणखी चार चाँद लावतील.

आप्तेष्टांना द्या रंगपंचमी शुभेच्छा संदेश (Rang Panchami Quotes In Marathi)