मार्च महिना सुरु झाला असून इतके दिवस वातावरणात असलेला सुखद गारवा आता हळुहळू कमी होऊ लागला आहे. आता ऊनं चांगलीच जाणवायला लागली आहे. उन्हात त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. थोडी पूर्वतयारी केली की, तुम्हाला उन्हाचा तितकासा त्रास होत नाही. तुमची त्वचा कोणत्याही प्रकारची असली तरी देखील उन्हाळा सहन करण्यासाठी तयार करण्यासाठी काही विशेष गोष्टींची काळजी तुम्ही घ्यायला हवी. जर तुम्ही त्वचेची ही काळजी आधीच घेतली तर तुम्हाला उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंग किंवा अन्य समस्येचा त्रास होणार नाही.
केस ब्लीच करणं सुरक्षित आहे का
चांगले SPF
खूप जणांना SPF लावण्याची मुळीच सवय नसते. जर तुम्हाला ती सवय नसेल तर तुम्ही ती आताच सुरु करा. आता थोडा सौम्य उन्हाळा आहे. त्यामुळे आतापासूनच जर तुम्ही हे लावायला घेतले तर तुम्हाला उन्हाचा त्रास कमी होईल. त्वचा टॅन होण्याची शक्यता यामुळे कमी होते. तुमच्या त्वचेला सूट होईल असे SPF निवडा आणि ते रोज लावा. म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. घरी असताना, बाहेर जाताना सनस्क्रिन चेहरा आणि हातापायांना लावायला विसरु नका.
त्वचा ठेवा हायड्रेट
उन्हाळ्यात मेकअप केला तर तो काही केल्या टिकत नाही. पण मेकअप केल्यानंतर काहीच मिनिटात त्वचा डिहायड्रेट व्हायला लागते. अशावेळी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही सोबत व्हिटॅमिन C असलेले टोनर ठेवा. त्यामुळे तुमची त्वचा रिफ्रेश होण्यास मदत मिळते. बाहेर असताना त्वचा काळवंडलेली किंवा थकलेली दिसस असेल अशावेळी तुम्ही याचा वापर करा. तुमची त्वचा चांगली राहील.
चेहऱ्याचे तारुण्य टिकवणाऱ्या बोटॉक्स ट्रिटमेंटची तुम्हाला माहिती आहे का
केमिकल्सचा वापर टाळा
अनेक जण स्किनक्लिनिकमधून वेगवेगळ्या ऑईन्मेंट त्वचेसाठी वापरतात. पण वातावरण बदलानुसार या ऑईन्मेंट चेहऱ्यावर वेगवेगळे परिणाम दाखवतात. त्यामुळे त्वचा लालसर पडते किंवा नाजूक होऊ लागते. अशावेळी योग्य सल्ल्यानिशी या केमिकल्सचा वापर सुरु ठेवावा. कारण याचा सतत वापर तुमची त्वचा डॅमेज करु शकतो. त्वचेला खाज येणे, त्वचेवर खरपुड्या जमणे, पिंपल्स होणे असे त्रास होऊ शकतात. हा त्रास टाळण्यासाठी थोडी काळजी घ्या.
बाहेरुन आल्यावर चेहरा करा स्वच्छ
उन्हाळ्यात त्वचेला सतत उन लागल्यामुळे पोअर्स ओपन होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी घरी येऊन चेहरा स्वच्छ धुणे, मेकअप काढणे आणि थंड पाण्याचा उपयोग करुन त्वचा रिफ्रेश करणे फारच गरजेचे असते. बाहेरुन आल्यानंतर मेकअप काढून थंड पाण्याने चेहरा धुवा. शक्य असेल तर बर्फाचा प्रयोग करुन त्वचेवरील पोअर्स बंद करुन घ्या.
आयब्रोजना शेप द्या मायक्रोब्लेडिंग ट्रिटमेंटने, जाणून घ्या फायदे
स्कार्फ वापरा
उन्हाळ्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे स्कार्फ. घाम येऊ नये, केस विस्कटू नये म्हणून जर तुम्ही याचा वापर करणे टाळत असाल तर तुम्ही त्वचेसाठी खूप मोठी रिस्क घेत आहात. त्वचेसोब केस खराब होऊ द्यायचे नसतील तर योग्य लांबीचा स्कार्फ चेहऱ्यावर बांधा. कपाळाचा भाग झाकला जाईल याची काळजी घ्या.
आता उन्हाळा सुर होण्याआधी या काही गोष्टी तुमच्या बॅगमध्ये हमखास ठेवा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही.