नव्या वास्तूमध्ये अजिबात नेऊ नका वस्तू

नव्या वास्तूमध्ये अजिबात नेऊ नका वस्तू

एखादी नवी वास्तू घेतली की, ती आपल्या पद्धतीने सजवण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. पण असे करताना जुन्या वास्तूमधील काही वस्तू फेकणेही आपल्याला पटत नाही. कारण त्या आपण आपल्या कष्टाच्या पैशाने घेतलेले असतात. खराब न झालेल्या आणि चांगल्या वस्तू या नव्या वास्तूमध्ये नेण्यात काहीच हरकत नाही. पण काही वस्तू या नव्या वास्तूत तुम्ही न नेलेल्या बऱ्याच असतात. या जुन्या वस्तूंमध्ये कित्येकाचे मन अडकलेले असते. पण निर्जीव वस्तूंमध्ये मन गुंतवण्यात काहीच अर्थ नाही. अशाच काही वस्तूंची आम्ही यादी केली आहे. जाणून घेऊया नव्या वास्तूमध्ये कोणत्या वस्तू जाणीवपूर्वक नेऊ नये.

धनप्राप्ती, वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते का ‘हिलिंग’ स्टोन

तुटकी भांडी
प्रत्येकाच्या घरात जुनी भांडी असतात. आठवण म्हणून आपण ही भांडी ठेवून देतो. फार प्रेमाने घेतलेली ही भांडी मोडली तरी ती टाकून द्यायची इच्छा होत नाही. नव्या घरात किंवा नव्या वास्तूत जाताना ही तुटकी भांडी अजिबात घेऊन जाऊ नका. कारण अशा वास्तू घरात नेल्यामुळे घरात एकप्रकारे नकारात्मक उर्जा राहते. तुटकी भांडी कोणत्याही वास्तूत ठेवणे चांगले नाही. शक्य असेल तर ही भांडी काढून टाकलेली बरी. 


फुटकी घड्याळ
बरेचदा घरात भेटवस्तू म्हणून घड्याळ दिलेली असतात. सगळीच घड्याळ आपण भिंतीवर लावू शकत नाही किंवा त्यांचा वापर करु शकत नाही. अशावेळी काही घड्याळ ही  आपल्याला तशीच ठेवून द्यावी लागतात. ही घड्याळ राहून राहून बंद पडतात काही घड्याळ फुटतात देखील. अशी घड्याळ दुरुस्त करुन वापरु असे आपल्याला वाटते. म्हणून ही घड्याळ न फेकता आपण ती घड्याळ तशीच ठेवून देतो. नव्या वास्तूत जाताना अशी बंद पडलेली आणि तुटकी घड्याळ मुळीच नेऊ नका. प्रगतीला अडथळा ठरणारी अशी ही जुनी तुटकी घड्याळ असतात.


बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू
घड्याळ्यांप्रमाणेच आपल्याकडे बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही असतीलच. बंद पडलेले टेपरेकॉर्डर, सीडी प्लेअर, गेम्स, मोबाईल फोन्स हे कधीतरी दुरुस्त होतील अशा अपेक्षेने आपण तसेच ठेवून देतो. ते दुरुस्त करण्याचा योग हा फारच कमी असतो. त्यामुळे साहजिकच घराच्या अडगळीच्या ठिकाणी या वस्तू जाऊन पडतात.ती टाकण्याची इच्छा होत नाही. यामुळे या वस्तू घरात तशाच पडून राहतात. या वस्तू नव्या वास्तूत जाताना घेऊन जाऊ नका.

 

शिवाला प्रिय अशा ‘रुद्राक्ष’ घालण्याचे फायदे

Instagram

चामड्याच्या खराब झालेल्या वस्तू
कमरेचा बेल्ट, चपला अशा चामड्याच्या वस्तूही सहसा फेकल्या जात नाही. प्युअर लेदर हे फार महाग असते. ते खराब झाल्यानंतर टाकण्याची इच्छा होत नाही. खूप जण अगदी त्या फाटेपर्यंत वापरतात आणि टाकून देतात. जर तुम्ही या गोष्टी तशाच ठेवून दिल्या असतील. तर अशा वस्तू नव्या घरात दारिद्र्य आणतात. त्यामुळे चामड्याच्या जुन्या वस्तू तुम्ही नव्या घरात अजिबात नेऊ नका. 


गंज लागलेली भांडी
भांड्यावरील प्रत्येक स्त्रीचे प्रेम पाहता जुनी काही भांडी फेकून द्यायची इच्छा होत नाही. काही जुनी लोखंडाची भांडी ही चांगली चांगली म्हणून आपण तशीच ठेवून देतो. तांब्याची भांडी असेल तर ती कल्हई  न काढता ठेवून देतो. जर तुम्हाला अशी भांडी नव्या वास्तूमध्ये न्यायची असेल तर त्याची योग्य ती काळजी घ्या. त्याला वापरात आणा आणि मगच ती नव्या वास्तूमध्ये न्या. 


नव्या वास्तूमध्ये कोणत्याही अशा वस्तू नेऊ नका. ज्यामुळे नकारात्मकता पसरेल. इतकी काळजी घेतली तर नव्या वास्तूमध्ये आनंदी आनंद पसरेल.

कितीही प्रयत्न करुन लग्न जुळत नाही, ही असू शकतात कारणं