महात्मा ज्योतिबा फुले विचार मराठीमध्ये (Mahatma Jyotiba Phule Quotes In Marathi)

Mahatma Jyotiba Phule Jayanti Quotes In Marathi

आज महिला अभिमानाने प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत आणि शिक्षणाचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. त्याची सुरूवात ज्या आधुनिक महापुरूषाने करून दिली ती व्यक्ती म्हणजे भारतातील आधुनिक समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले. पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू करून आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देत समाजामध्ये शिकविण्यासाठी त्यांनी सुशिक्षित केले. देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान मिळाला सावित्रीबाई फुले यांना. अशा थोर समाजसेवक आणि समाजसुधारकाचे नाव आणि त्यांचे विचार हे नेहमीच आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. ज्योतिबा फुले यांची माहिती आपल्याला आहेच. कोणत्याही परिस्थितीला सामोरं जात आपली दिशा योग्य आहे हे माहीत असेल तर अगदी समाजाचे टक्के टोणपे खातही तितक्याच कणखरपणे पुढे जायला शिकलं पाहिजे आणि हेच आपल्या कृतीतून महात्मा ज्योतिबा फुले यांनी दाखवून दिले. महात्मा ज्योतिबा फुले हे अत्यंत महान होते. त्यांचे विचारही तितकेच कणखर आणि महान (mahatma jyotiba phule quotes in marathi) होते. महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त त्यांचे काही सुविचार आणि कोट्स (mahatma phule jayanti quotes in marathi) आपण या लेखातून पाहणार आहोत. ज्योतिबा फुले यांचे विचार (jyotiba phule quotes in marathi) आपल्याला नेहमीच प्रेरणा देतात. अनेक ग्रंथाचे लिखाण करत त्यांनी आपले विचार (mahatma phule quotes in marathi) मांडले. अशाच थोर महात्मा ज्योतिबा फुले यांचे थोर विचार आपण या लेखातून जाणून घेऊया.

Table of Contents

  महात्मा फुले जयंती कोट्स मराठीत (Mahatma Phule Jayanti Quotes In Marathi)

  महात्मा फुले जयंती कोट्स मराठीत (Mahatma Phule Jayanti Quotes In Marathi)

  महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजासाठी केलेली कामगिरी ही कधीही न विसरता येण्याजोगी आहे.  त्यांचे सुविचार, त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांची वागणूक या सर्वांचाच प्रभाव त्याकाळी समाजावर होता. शिक्षण महिलांसाठी  किती महत्वाचे आहे आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल हे त्यांनी समजून त्यानुसार पावलं उचलली आणि आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांनाही शिकवले.

  1. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते - महात्मा ज्योतिबा फुले 

  2. नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.

  3. केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही धंदा आहे, चामाड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही धंदा आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून धंदाच आहे

  4. भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसंच आहे

  5. समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.

  6. ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात  - महात्मा ज्योतिबा फुले 

  7. जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका.

  8. विद्वेविना मती गेली,मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका महाविद्वेने केले.

  9. जाती आणि लिंग यांच्यावर कोणासोबत भेदभाव करणे एक प्रकारे पाप आहे.

  10. मानवाचा एकच धर्म असावा सत्याने वर्तवा, ज्योती म्हणे

  शिवाजी महाराजांचे शेर, गर्जा महाराष्ट्र माझा (Shivaji Maharaj Shayari Marathi)

  महात्मा फुले कोट्स मराठीत (Mahatma Phule Quotes In Marathi)

  11. जर विद्या ग्रहण केली तर आपल्याला असलेल्या सर्व कष्टांचे निवारण करण्याचे मार्ग आपल्याला लाभतील 

  12. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात.ज्यांना कुठलेतरी उद्दिष्ट गाठायचे असते 

  13.आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे - महात्मा ज्योतिबा फुले

  14. “कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.”

  15. "देव एक आहे आणि सर्व माणसे ही त्याची मुले आहेत."

  16. "देव लग्नाच्या जोड्या स्वर्गात बांधतो मग तर मग त्या जोड्या एकाच जातीत का असतात ,देव जातीवादी आहे का?

  17. "जोपर्यंत अन्न आणि वैवाहिक संबंधांवर जातीय संबंध कायम राहतील तोपर्यंत राष्ट्रवादाची भावना विकसित होणार नाही." - महात्मा ज्योतिराव फुले

  18. “दुसऱ्या व्यक्तीचे हक्क हिरावून घेवू नये - महात्मा ज्योतिराव फुले

  19. देव आणि भक्त यामध्ये मध्यस्थाची गरज नाही 

  20. सत्य पालन हाच एक धर्म बाकीचे सर्व अधर्म आहेत - महात्मा ज्योतिबा फुले 

  वाचा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोट्स

  महात्मा ज्योतिबा फुले जयंती संदेश मराठीमध्ये (Mahatma Jyotiba Phule Jayanti Messages In Marathi)

  महात्मा ज्योतिबा फुले जयंती संदेश मराठीमध्ये (Mahatma Jyotiba Phule Jayanti Messages In Marathi)

  महात्मा ज्योतिबा फुले अर्थात ज्योतिराव गोविंदरवे फुले यांनी एकोणिव्या शतकात खूपच संघर्ष केला. एकोणिसाव्या शतकातील थोर समाजसेवक म्हणून ज्योतिबांची ख्याती आहे. आजही आपण या थोर समाजसेवकाची नेहमीच आठवण काढतो. भारतीय समाजामध्ये पसरलेल्या अनेक वाईट गोष्टी दूर सारण्यासाठी त्यांना अविरत प्रयत्न केला. अस्पृश्यता, महिला शिक्षण, विधवांचे विवाह आणि शेतकऱ्यांचे हित यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली कामगिरी ही वर्णताच येणार नाही. इतिहासात त्यांचे नाव कायम अजरामर राहणार आहे. अशाच महात्मा फुले यांचे काही कोट्स (Mahatma Phule quotes in Marathi) मराठीत. 

  1. मांत्रिकाच्या नादी लागू नका, औषधोपचार करा.”

  2. “स्व:ताच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड रचले.”

  3. “सत्कर्म करण्याने वैभव मिळणार नाही परंतु शांती‚सुख मिळेल, तर दुष्कर्म करण्याने वैभव मिळेल पण शांती‚सुख मिळणार नाही, हे निश्चित.”

  4. “मानवासाठी अनेक धर्म अस्तित्वात आले पण धर्म सगळ्या मानवांसाठी का निर्माण झाला नाही.”

  5. मनुष्य सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि सर्व मानवांमध्ये स्त्री श्रेष्ठ आहे. महिला आणि पुरुष जन्मापासून मुक्त आहेत. म्हणूनच, दोन्ही अधिकारांना समान हक्क उपभोगण्याची संधी मिळाली पाहिजे."

  6. मासा पाण्यात खेळतो त्याला गुरूची आवश्यकता नसते.

  7. स्वार्थाला वेगवेगळी रूपं मिळतात.हे कधी जातीचे तर कधी धर्माचे रूप धारण करते.  - महात्मा ज्योतिबा फुले 

  8. एखादे चांगले काम पूर्ण करण्यासाठी, वाईट उपायांचा वापर करू नये."

  9. स्व कष्टाने पोट भरा. - ज्योतिबा फुले

  10. स्त्रियांना एक तऱ्हेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय

  11. कोणताही धर्म हा ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण्य आणि जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे - महात्मा फुले 

  12. नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे. 

  13. कष्टाने जगण्याची धमक नसणारे लोक संन्याशी, भिक्षुक होतात. प्रपंच खरा नाही, व्यर्थ आहे, असा भ्रम ते प्रपंचातील व्यक्तिंमध्ये निर्माण करतात. - महात्मा फुले

  14. सर्वसाक्षी जगत्पती, त्याला नकोच मध्यस्ती - महात्मा फुले

  15. निर्मात्याने एकंदर सर्वच प्राणीमात्रांना निर्मिताना मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्मिले आहे. त्यास आपापसातील सर्व कक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ बनवले आहे. - महात्मा फुले

  16. निर्मात्याने सर्व स्त्री - पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे. एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे. - महात्मा फुले

  17. जे कोणी आपले कुटुंब, भाऊबंद, सगेसोयरे, इष्टमित्र आणि साथीदारांना आपल्यासह श्रेष्ट मानून इतर कोणाही स्त्री-पुरुषांस किंवा एकंदर मानव प्राण्यास पिढीजातपणे अथवा कपटाने अपवित्र किंवा नीच मानत नाहीत त्यास 'सत्यवर्तनी' म्हणावे. - महात्मा फुले

  18. स्त्री अथवा पुरुष एकंदर सर्व गावाचे , प्रांताचे , देशाचे , खंडाचे संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वताच्या संबंधात , स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी अथवा एकमेकात एकमेकांनी कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे. - महात्मा फुले

  19. निर्मात्याने सर्व स्त्री आणि पुरूषांना  धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे - महात्मा फुले

  20. स्वकष्टाने जगण्याची धमक हवी 

  आयुष्याला प्रेरणा देणारे लेखक व. पु. काळे यांचे कोट्स

  महात्मा ज्योतिबा फुले जयंती सुविचार (Mahatma Jyotiba Phule Jayanti Thoughts In Marathi)

  महात्मा ज्योतिबा फुले जयंती सुविचार (Mahatma Jyotiba Phule Jayanti Thoughts In Marathi)

  सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावात जन्म झालेल्या ज्योतिबा फुले यांचा पेशव्यांच्या काळात फुले पुरविण्याचा धंदा होता. त्यावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. पण त्यांचे मूळ आडनाव हे गोरे होते असं सांगितलं जातं. त्यांचे कुटुंब पुढे पुरंदर तालुक्यात खानवडी येथे गेले. आजही तिथे त्यांच्या नावाचा सातबाराचा उतारा  आहे. तसंच खानवडीमध्ये अनेक फुले आडनावाची कुटुंबे आहेत. 28 नोव्हेंबर, 1890 रोजी ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला. तर 11 एप्रिल रोजी त्यांची जयंती साजरी करण्यात येते. महात्मा ज्योतिबा फुले जयंती सुविचार आपण काही जाणून घेऊया.  

  1. आर्थिक विषमता ही शेतकऱ्यांची दैन्यास कारणीभूत आहे - महात्मा फुले 

  2. कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये 

  3. मासा पाण्यात खेळतो त्याला गुरूची आवश्यकता नसते 

  4. मानवासाठी  अनेक धर्म अस्तित्वात आले पण धर्म सगळ्या मानवांसाठी का निर्माण झाला नाही

  5. स्वतःच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड रचले - महात्मा ज्योतिबा फुले

  6. सत्कर्म करण्याने वैभव मिळणार नाही. पण शांती, सुख मिळेल. तर दुष्कर्म करण्याने वैभव मिळेल. पण शांती, सुख मिळणार नाही हे निश्चित - महात्मा फुले 

  7. स्वार्थ वेगवेगळी रूपं धारण करतो, कधी जातीचा तर कधी धर्माचा धर्म महत्वाचा नाही माणुसकी असली पाहिजे

  8. जोपर्यंत अन्न राहणीमान संबंधांवर जातीय भेदवाद राहतील तोपर्यंत राष्ट्रवादाची भावना विकसित होणार नाही. – महात्मा ज्योतिबा फुले

  9. एखादे चांगले काम पूर्ण कराच पण त्याच्यावर वाईट उपायांचा वापर करू नका - महात्मा ज्योतिबा फुले

  10. स्त्री आणि पुरूष या दोघांनाही समानतेचे शिक्षण आवश्यक आहे - महात्मा फुले 

  11. आर्थिक असमानतेमुळेच शेतकऱ्यांचे जीवन विस्कळीत होत आहे

  12. देव एकच आहे आणि आपण सर्व त्याची मुले आहोत - महात्मा ज्योतिबा फुले 

  13. क्रांती साठी प्रत्येकाला लढायला लागते, ते आपले वडील असो, भाऊ असो, शेजारील कोणी असो, किंवा शत्रू असो, संघर्षाशिवाय कोणी जिंकले नाही आणि जिंकणार सुद्धा नाही. – महात्मा जोतीराव फुले

  14. भारताच्या राष्ट्रीयताची भावनाचा विकास तेव्हाच होईल जेव्हा देशामध्ये जात पात सोडून सर्वांना समान हक्क मिळेल.

  15. जेव्हा लोक तुमच्या संघर्षामध्ये भाग घेतील तेव्हा कधीच जात बघू नका आणि विचारूसुद्धा नका - महात्मा फुले 

  16. जर कोणी कोणाला मदत करत असेल तर त्याची मदत घ्या. तोंड लपवून जाऊ नका 

  17. जीवनाची गाडी दोन चाकावर कधीच चालत नाही,  त्याला गती तेव्हाच मिळते,  जेव्हा मजबूत बंधन तयार होते - महात्मा ज्योतिराव फुले

  18. दोन तुकडे करायला एक वार फार झाला, पण काही वेळा त्याची भारी किंमत मोजावी लागते - महात्मा फुले 

  19. नवीन नवीन विचार तर दिवसात येतच राहतात त्याला तुम्ही किती अमलात आणता ते महत्त्वाचे ठरते.

  20. शिक्षणा शिवाय शहाणपण हरवले; शहाणपणा शिवाय नैतिकता गमावली; नैतिकतेशिवाय विकास हरवला; विकासाशिवाय संपत्ती हरवली; संपत्ती नसताना शुद्रांचा नाश झाला; शिक्षणाच्या अभावामुळे बरेच काही घडले – महात्मा ज्योतिबा फुले

  अधिक वाचा -

  प्रेरणात्मक कोट्स करतील आयुष्यात अधिक प्रेरित (Motivational Quotes In Marathi)

  तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक