तुमच्या इन्स्टाग्रामसाठी झक्कास कॅप्शन्स (Marathi Caption For Instagram)

Marathi Caption For Instagram

हल्लीचा काळ हा इन्स्टाग्रामचा आहे. आपल्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी आणि घटना इन्स्टाग्रामवर पोस्ट करायला अनेकांना आवडतात. फोटो पोस्ट करताना त्या खाली झक्कास अशी कॅप्शन टाकायला अनेकांना आवडते. इन्स्टाग्रामची कॅप्शनही ही थोडी हटके असावी असे तुम्हाला वाटत असेल तर आम्ही तुमच्या इनस्टाग्राम प्रोफाईलला अधिक आकर्षक आणि उठावदार बनवण्याचे काम करतात. काही जणांचे फोटो पाहिल्यानंतर त्या खाली असलेल्या कॅप्शनच आपले मन जिंकून घेतात. तुम्हालाही अशा झक्कास कॅप्शन इन्स्टाग्रामसाठी ठेवायच्या असतील तर आम्ही सगळा सोशल मीडिया धुंळाडून तुमच्यासाठी काही झक्कास कॅप्शन शोधून काढल्या आहेत. चला जाणून घेऊयात या कॅप्शन ज्या तुमच्या प्रोफाईलला करतील अधिक आकर्षक.

Table of Contents

  नाद करायचा नाय… मराठी अॅटिट्युट कॅप्शन (Marathi Attitude Caption For Instagram)

  या शिवाय तुमचा अटीट्युड स्टेटस पाठवून तुम्ही थोडा माज करू शकता.

  Marathi Attitude Caption For Instagram

  • भाऊ आपला दराराच असा की, कमी पडतात शब्द.. म्हणूनच ठेवत रोज ठेवत नाही असा कडक फोटो
  • Attitude नाही पण थोडासा Self Respect माझ्यात आह जास्त
  • आता तर मी खरी सुरुवात केली आहे.. कारण मला अजून जग गाजवायचं आहे
  • माझी ओळखचं आहे भारी, मनाने साफ आणि स्वभावाने निर्मळ… पण डोकं सटकलं तर आहे सगळ्यांचाच बाप
  • कामाशिवाय आठवण आली… तरच संपर्क साधा
  • मी कोणावरही जळत नाही… कारण तुमच्यावर जळायला तुम्ही आहात तरी कोण?
  • आयुष्यात प्रामाणिक राहून काही अर्थ नाही कारण इथे लोकं खोटेपणाला मोठेपणा समजून बसतात
  • घाबरत राहाल तर तुम्हाला लोकं घाबरवत राहतात, पण थोडी हिंमत दाखवली तर मोठे मोठे पण डोकं टेकवतात
  • कोणाच्या दबावाने आपला स्वभाव बदलू शकत नाही कारण आपल स्वभावच एकदम भारी आहे
  • माझी तारीफ करता येत नसेल तर फोटो बघून पुढे जाण्यापेक्षा लाईक करुन कहीतरी चांगलं काम करा
  • शून्यातून विश्व निर्माण करण्यावर आहे विश्वास माझा, म्हणूनच माझा माज आहे एकदम वेगळा
  • भिडायची लायकी नसेल तर नडायची घाईही करु नका
  • मोठं होण्यासाठी ओळख नाही, तर माणसांची मन जिंकावी लागतात
  • माझ्यासोबत हद्दीत राहायचं कारण मी माझी हद्द दाखवली की भल्याभल्यांची फाटते
  • मी बदललो नाही… पण माझा Attitude बदलला आहे

  विनोदी इन्स्टाग्राम कॅप्शन (Funny Marathi Captions For Instagram)

  काही स्टेटस हे थोडे फनी असायला हवे. जे तुम्हालाच नही तर इतरांनाही हसवू शकतील. जाणून घ्या विनोदी इन्स्टाग्राम स्टेटस

  Funny Marathi Captions For Instagram

  •  हो म्हणणाऱ्या खूप झाल्या आता अहो म्हणणारी हवी आहे
  •  वाट तुझी पाहीन पण  मी तुलाच घेऊन जाईन
  •  बोलायला गेलो तर लाईन मारतो म्हणतात आणि नाही बोललो तर शाईनिंग मारतो असे म्हणतात.
  • अरे खड्ड्यात गेला शाहरुख आणि खड्डयात गेला सल्लू.. मी दिसल्यावर सगळेच म्हणतात आलं आमचं पिल्लू 
  • अरे सोड बोलबच्चन मीच आहे खरा अमिताभ बच्चन
  •  काय समजतेस तू स्वत:ला राणी….तर तुझा दिलाचा राजा इथे आहे
  • बस झाली तुझी ही इन्स्टावर गडबड… बघून तरी आता माझ्याकडे तू जळ
  • ए जर तू मला A फॉर Attitude दाखवलास तर मी तुला B फॉर भाव देणार नाही
  • तुला हो म्हणायला आहे मी एकदम रेडी… पण सध्या माझ्या पायात आहे करिअरची बेडी
  • पाहून तुला दिलं माझा झाला वेडा… पण खिसा पाहून म्हटलं ही पोरगी नको रे बाबा मला
  • विचार करत होतो आज कोणता फोटो पोस्ट करु विचार केला सगळ्याच फोटोमध्ये मी एकदम कडक दिसत आहे
  • लुक तसा साधाच आहे पण तुम्हाला जळवण्यासाठी एकदम परफेक्ट आहे
  • अरे कशाला इतके जळायचे.. माझा स्वॅग कायम असाच भारी आहे
  • तुझी आठवण मला आता येत नाही… येईल तरी कशी … कारण मी तुला भावच देत नाही
  • अरे लाईक करत जा लाईक करायला पैसे जात नाहीत

  प्रवास करणाऱ्या मित्रांसाठी इन्स्टाग्राम कॅप्शन (Marathi Caption For Instagram Traveller)

  प्रवास करताना काही प्रेरणादायी हवे असेल तर तुम्ही प्रवासाचे प्रेरणादायी कोट्स नक्कीच शेअर करू शकता.

  Marathi Caption For Instagram Traveller

  • प्रवास हे असे सुख आहे जे आजन्म मला अनुभवायचे आहे
  • मला जर कोणी विचारले आज तुला काय करायचे आहे तर मी सांगीन फक्त ‘प्रवास’
  • ही वाट दूर जाते...
  • फिरण्याचा आनंद हा एखाद्या रिलेशनशीपपेक्षाही मोठा आहे.. आणि तो मला कायम अनुभवायचा आहे
  • रिलेशनशीप स्टेटसऐवजी जर कोणतं स्टेटस ठेवायचं असेल तर ते ‘प्रवासी’ असं ठेवायला मला आवडेल
  • आता आयुष्याचे एकच ध्येय आहे मला फक्त प्रवास करायचा आहे
  • माझा प्रवास आज खऱ्या अर्थाने सुरु झाला आहे
  • शेवटच्या श्वासापर्यंत मला करायचा आहे फक्त 'प्रवास'
  • या जगात मला फक्त एकच गोष्ट करायची आहे तो म्हणजे 'प्रवास'
  • सारे प्रवासी घडीचे… आणि प्रवास हाच माझा श्वास आहे

  फॅशनिस्टासाठी इन्स्टा कॅप्शन (Marathi Insta Caption For Fashionista)

  नेहमी असाल एकदम टिपटॉप तर नक्की फॉलो करा या फॅशन कॅप्शन. ज्या तुम्हाला देतील न्याय.

  Marathi Insta Caption For Fashionista

  • जरीच्या साडीत सजून धजून.. गुणाची दिसते गं
  • फॅशन ही एकमेव अशी गोष्ट आहे जी मला अप टू डेट ठेवते
  • या जगात फॅशन आहे म्हणूनच मी आहे
  • फॅशन करा आणि कायम फॅशनेबल राहा
  • साडी, कुडती, जीन्स काहीही दया.. पण यापासून मला दूर ठेवू नका
  • आज मी किराणा सामान आणायला गेले पण या ….. ने मला माझ्याकडे बोलावून घेतले
  • आज माझ्याकडे पैसा आहे… गाडी आहे आणि फॅशनेबल राहण्यासाठी खूप सारा वेळ
  • साडी हा नुसता कपडा नाही तर ती एक शान आहे
  • कपाट उघडल्यानंतर कपडे धडधड पडत नाही.. तर तुम्ही फॅशनिस्टा नाही
  • आज मला बाकी काही नको फक्त कपडे, ट्रेंडी शूज हवे आहेत

  यारी दोस्तीसाठी इन्स्टाग्राम कॅप्शन (Instagram Captions For Friends In Marathi)

  आयुष्यात दोस्ती यारी फार महत्वाची असते. त्यासाठीच इन्स्टाग्राम कॅप्शन.

  Instagram Captions For Friends In Marathi

  • यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी
  • जगात कुठे पण राहील पण दोस्ताशिवाय जगण्यात काहीच मजा नाही
  • गर्लफ्रेंड सोडून गेली तरी चालेल पण मित्र सोडून गेला तर चालणार नाही
  • दोस्ता तुचं आहेस म्हणून माझं सगळं सुरळीत आहे. तू सोडून गेलास तर दुनिया एकदम फिकी आहे
  • दोस्ता तुझी माझी यारी… बाकी खड्डयात गेली दुनियादारी
  • मैत्री आहे म्हणून मी आहे.. यारीतच सारी दुनिया सामावली आहे
  • देवाला एकच सांगणं आहे…. कोणी नाही दिला तरी एक मित्र दे
  • दुनियादारीची ऐशीतैशी दोस्त असेल तर … गेली दुनिया सारी 
  • दोस्त माझा भारी त्यामुळेच झाली आहे माझी भारी
  • आयुष्यात दोस्त असण्याची किंमत तेव्हाच कळते जेव्हा प्रत्येक अडचणीत तुम्हाला त्याची साथ मिळते

  प्रेमासाठी इन्स्टाग्राम कॅप्शन (Love Caption For Instagram In Marathi)

  तुमच्या प्रेमासाठी पाठवा आम्ही निवडलेले प्रेम कोट्स जे आणतील तुमच्या आवडीच्या व्यक्तीच्या ओठी हसू.

  Love Caption For Instagram In Marathi

  • आयुष्यात प्रेम करा त्या प्रेमाचे प्रदर्शन करु नका
  • प्रेमाची सुरुवात असावी झक्कास… कायम असावे तू माझ्यासोबत खास
  • प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असतं पण सगळ्यांसारखं आपलं काही सेम नसतं.
  • तुझ्या प्रेमात बुडून गेलो आहे मी इतका नाही लागत मला आता भूक आणि तहान
  • मला विचारले मित्राने काय रे तुझे रिलेशनशीप स्टेटस मी सांगतो...कमिडेट विथ ऑनली माय ट्रु लव्हर
  • प्रेमाने बोलशील तर सगळं देईन… आताच नाही तर आयुष्यभराची साथ देईन
  • प्रेम केलं तुझ्याशी इतकीच चूक झाली…पण आता या चुकीतून बाहेरही पडायचे नाही
  • जेव्हा पाहिलं तुझा… दिलं हिल्ला हिल्ला..
  • तुझ्या नावाने बांधलाय बंगला…त्यामध्ये राहायला तू ये ना
  • दिवसाची सुरुवात तू.. दिवसाचा शेवट तू… माझ्या नसांनसात तू

  आता हे झक्कास स्टेटस ठेवा आणि तुमचे इन्स्टाग्राम अकाऊंट एकदम झक्कास बनवा.