दु:खात साथ देतील अशा शायरी (Marathi Sad Shayari)

Marathi Sad Shayari

सुखाचे क्षण आयुष्यात येण्याआधी दु:खाच्या क्षणांना आपण पार केले तर आयुष्य अधिक सुखकर होते. आयुष्यात दु: ख यावे असे कोणालाही वाटत नाही. पण तो काळ आल्यानंतर त्याला सामोरे जाणे आणि त्यातून योग्य मार्ग काढणे हे फार गरजेचे असते. दु:खात फार काळ रमणे हे आरोग्यासाठी आणि भावी आयुष्यासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे यातून बाहेर पडणे हे केव्हाही चांगले. या अशा काळात एकटेपणा सतावतो. आपल्यासोबत कोणीही नाही असे वाटू लागते. माणसं जवळ नसली तरी देखील शब्दांच्या माध्यमातून आपण आपले दु:ख व्यक्त करत त्या भावनांना वाट मोकळी करुन देऊ शकतो. अशा दु:खाच्या काळात तुम्हाला हवी असेल कोणाची साथ तर आम्ही शोधून काढलेल्या शायरी तुम्हाला नक्कीच देतील आधार आणि आयुष्य नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची एक नजर.

Table of Contents

  दु:खात साथ देतील अशा मराठी शायरी (Marathi Sad Shayari)

  Marathi Sad Shayari

  कायम रडणे हा प्रत्येक दु:खावरील इलाज नाही. काही चांगले वाचले की मन हलके होण्यास मदत मिळते. दु:खाला काढून टाकण्यासाठी अशा मराठी शायरी. कधी कधी माफी मागणंही गरजेचं असते. या भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही खास मेसेज पाठवू शकता.

  • तू दिलेल्या दु:खाने मला खूप काही शिकवले
   जग कसे असते हे शेवटी मला तूच दाखवले
  • माझ्या भिजलेल्या
   पापण्यांना,
   अजून कितीवेळा
   पुसू सांगा,
   अनं तुझ्यासाठी
   मन माझं झुरतं
  • एकदा तरी तू भावना जाण ना 
   आज तुला माझ्या असण्याची
   किंमत कळत नाहीए
   पण एक दिवस असा येईल
   तेव्हा तुला माझ्या नसण्याची किंमत 100 टक्के कळेल
  • असं ऐकलयं की,श्वास बंद झाल्यावर
   सोडून गेलेले पण भेटायला येतात
  • आजकाल लोकांना
   नात्यापेक्षा EGO जास्त महत्वाचा आहे
   म्हणूनच एखादं नातं
   जास्त काळ टिकत नाही
  • आयुष्य जगणं
   तेव्हा खूप अवघड वाटतं
   जेव्हा आवडणारी व्यक्ती नशिबात नसते
  •  कोणी कोणाचं नसतं हे जर आधी समजलं असतं
   तर हे तुटणारं नातं मी कधीच जोडलं नसतं
  • नाते हे मोत्याप्रमाणे असतात
   जर का एखादा मोती खाली पडला
   तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे
  • मैत्री माझी पुसू नकोस,
   कधी माझ्याशी रुसू नकोस,
   मला कधी विसरु नकोस,
   मी दूर असून सोबत आहोत तुझ्या फक्त
   माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस
  • जे लोक झुकतात
   ते कमजोर नसतात
   फक्त त्यांच्यामध्ये
   नातं टिकवण्याची क्षमता
   इतरांपेक्षा जास्त असते

  मुलींसाठी दु:खद शायरी (Marathi Sad Shayari For Girls)

  मुलींसाठी दु:खद शायरी

  प्रेम ही भावना मुलींसाठी फार महत्वाची असते. आयुष्यात असे दु:ख आले की, ते प्रेम व्यक्त करण्यासाठी अशा शायरी.

  • घेऊन मला मिठीत
   शांत कर या मनाला
   मी खूप समजावलयं
   आता तूच समजाव याला
  • आकाशाला टेकतील
   असे हात नाहीत माझे
   सगळं काही साठवून ठेवतील
   असे डोळे नाही माझे
   पण तुझं प्रेम साठवून ठेवीन
   इतके ह्रदय नक्कीच आहे माझे
  • तुझ्यासाठी पूर्ण जग सोडण्याची
   तयारी आहे माझी
   पण दुसऱ्या कोणासाठी
   तू मला सोडून जाऊ नकोस 
  • एकवेळ डोकं खाणारे चालतील
   पण भाव खाणाऱ्यांनी आयुष्यातून लांब राहावे
  • माझ्या निरागस चेहऱ्यावर जाऊ नकोस
   कारण हीच निरागसता
   जेव्हा नखऱ्यात उतरते
   तेव्हा भल्याभल्यांना रडवते
  • शब्दात नाही सांगता येणार
   डोळ्यातून समजून घेशील ना?
   अस्वस्थ होईन मी तेव्हा धीर मला देशील ना?
  • सवय लागलीय, तुझ्यावर प्रेम करायची
   सुटता सुटेना, शेवटी ठरवलं विसरुन जायचं तुला,
   पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना...
  • इतकंही प्रेम करु नये की,
   प्रेम हेच जीवन होईल..
   कारण प्रेमभंग झाल्यावर
   जीवंतपणी मरण येईल
  • का कळत नाही तुला
   माझंही मन आहे
   जे फक्त तुझी
   आनं तुझीच
   वाट पाहात आहे
  • प्रत्येकावर विश्वास ठेवू नका
   कारण साखर आणि मीठ दोघांचा रंग सारखा असतो
   पण दोघांचे काम आयुष्यात वेगवेगळे असते

  वाचा - Love Quotes In Marathi

  मनातील दु:खाला वाट मिळवून देणाऱे शायरी मेसेज (Marathi Sad Shayari SMS)

  Marathi Sad Shayari SMS

  मेसेजच्या माध्यमातूनही तुम्ही तुमच्या दु:खाला वाट मोकळी करुन देऊ शकता. यासाठीच आम्ही शोधले आहेत मनातील दु:खाला वाट मिळवून देणारे शायरी मेसेज.

  • रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात
   कारण शरीराला जखम झाली
   तर रक्त बाहेर येते
   आणि अश्रूंना बाहेर येण्यासाठी
   मनाला जखम व्हावी लागते
  • हरलो मी आयुष्याला
   नशिबात दु:खच राहिले
   तुझी आस होती प्रेमाची
   पण… माझी ओंजळ रिकामीच राहिली
  • माझ्याशी बोलायचं नाहीए
   ठिक आहे
   पण एक लक्षात ठेव
   तू अबोल राहिलेला
   प्रत्येक दिवस
   आपल्यातील अंतर अजून वाढवेल
  • मनातले सारे सांगण्यासाठी
   समोर मनासारखा माणूस नाही
   चालत नाही..
   त्या माणसाला मन असावं लागतं 
  • चुका तेव्हाच दिसायला लागतात
   जेव्हा समोरच्यावरील
   प्रेम कमी व्हायला लागतं 
  • खूप कठीण असतं
   आपल मन दुखावलेलं असताना
   समोच्याला मी बरा आहे असं सांगणं
  • भावना समजायला
   शब्दांची साथ लागते
   मन जुळून यायला ह्रदयाची हाक लागते
  • प्रेम हा मुळात आपला विषय नव्हता
   मग त्यात पास होण्याचा विषयच नव्हता 
  • असेल परवानगी तर मला होऊ दे व्यक्त
   तुझ्याशिवाय मला आता राहता येणं आहे अशक्य
   तू सोडलीस माझी साथ, पण कधी मागे वळून आलास तर
   तुला कायम मी दिसेन थांबलेली आज
  • आयुष्याच्या वाटेवर खूप दु:ख आली
   पण तुझ्यासारखे दु:ख कोणी दिले नाही
   आता या दु:खाचीही सवय झाली…
   पण साथ तुझी सोडवत नाही

  मराठी प्रेमाच्या शायरी (Marathi Love Sad Shayari)

  Marathi Love Sad Shayari

  प्रेम आणि शायरी यांचे अनोखे नाते आहे. पण प्रेमात असे अनेक चढ- उतार येतात. प्रेरणादायी कोट्स तुम्हाला मन:शांती देतील. या शिवा अशावेळी तुम्हाला साथ देतील या मराठी प्रेमाच्या शायरी.

  • प्रेम कधी अधुरे राहात नाही
   अधुरा राहतो विश्वास
   अधुरा राहतो तो श्वास
   अधुरे राहते कहाणी
  • राजापासून दुरावलेली 
    मी तुझ्यावर प्रेम करतो
   हे तुला सांगता येत नाही
   प्रेम हे असंच असतं गं
   ते शब्दात सांगता येत नाही 
  • विश्वासाने मी तुझ्या मनात जागा मिळवावी
   असा विश्वास तुझा माझ्यावर आहे
   आता तुझ्याकडून काहीच नको
   पण मागणे करतो देवा जवळ
   पुढील जन्मी मला प्रेम करायला 
  • माझ्या आयुष्यात प्रेमाची
   केली तू सुरुवात
   माझी इच्छा आहे की, शेवट पण तूच करावासा 
  • नाती असतात आपण निभावतो
   आठवण काढा
   आनंदी राहा हेच मागणे देवाला
  • खूप वाटतं केव्हातरी
   धावत तुझ्याजवळ यावं
   बाहुपाशात घेऊन तुला
   सारं जग विसरावं
   गतकाळच्या आठवणींना
   पुन्हा एकदा जगवावं
   दु:ख सार सारुन
   तुझ्या डोळ्यात साठवावं 
  • भावना माझ्या मनाच्या
   जाणून तू घेशील का?
   एकदा सांग ना प्रिये
   माझा तू होशील का?
  • प्रेमात पडलो तुझ्या
   तुला काही ते कळलंच नाही
   मी अजूनही तिथेच उभा आहे
   तू काही मागे वळून पाहिलं नाहीस
  • पाहते अशा नजरेनं,
   माझ्या ह्रदयाला ठार करते,
   धार-धार ओठांनी तिच्या
   माझ्या ओठांवर वार करते
  • माझ्या मनात ती असते
   पण ती माझी नसते,
   तिच्या मनात मी नसतो
   तरीही मात्र मी तिचाच असतो

  आता तुमच्या मनाला हवा असेल आधार तर शेअर करा मराठीतील या निवडक शायरी