शॉपिंग करताना करू नका 'या' चुका आयुष्यभर भोगावे लागतील परिणाम

शॉपिंग करताना करू नका 'या' चुका आयुष्यभर भोगावे लागतील परिणाम

फॅशनेबल अथवा स्टाईलिश दिसण्यासाठी तुम्ही डोळे झाकून शॉपिंग करता का, असं असेल तर तुम्हाला वेळीच सावध व्हायला हवं. कारण अशा फॅशन अथवा स्टाईलच्या नावावर विकत घेतलेल्या गोष्टींमध्ये तुम्ही खरंच आरामदायक आहात हा हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला त्यात आरामदायक वाटत नसेल तर अशा गोष्टी वापरण्यामुळे तुमचं नुकसानच होऊ शकतं. यासाठीच शॉपिंग करताना या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात असायला हव्या.

तंग कपडे-

सुडौल अथवा बारीक दिसण्यासाठी स्लिम वेअर अथवा तंग कपडे घालणं तुमच्या अंगाशी येऊ शकतं. कारण सतत असे कपडे घातल्यामुळे तुमच्या शरीराचे रक्ताभिसरण बिघडते, अंग ताणलं जातं, अंगावर रॅशेस येतात, घट्ट कपड्यांचे व्रण अंगावर उठतात, अंगातून घाम कमी येतो, घाम बाहेर न पडू शकल्याने पुरळ येतं. या सर्व समस्या फक्त चुकीच्या साईजचे कपडे घातल्यामुळे होऊ शकतात. यासाठीच कपडे फॅशनेबल तर असायलाच हवेत मात्र ते आरामदायकही हवेत याची काळजी  विकत घेताना घ्या. 

हाय हिल्स-

स्टायलिश दिसण्यासाठी कधीतरी हाय हिल्स, पेन्सिल हिल्स घालणं यात काहीच वावगं नाही. मात्र जर तुम्ही दररोज हाय हिल्स घातले तर तुमच्या कंबर आण पाठीच्या समस्या नक्कीच वाढू शकतात. जर तुम्हाला उंच दिसण्यासाठी हिल्सचे फूटवेअर घालायचे असतील तर पॉईंटेड हिल्सपेक्षा प्लॅटफॉर्म हिल्स निवडा. ज्यामुळे तुमच्या पायांना काहीसा आराम मिळू शकेल. 

हेव्ही ज्वैलरी -

हेव्ही नेकलेस अथवा जड कानातले दिसायला कितीही सुंदर असले तरी ते घातल्यामुळे तुमच्या मान आणि कानाला जखमा होऊ शकतात. अशा जड कानातल्यांमुळे तुमच्या कानाच्या पाळ्या खाली येतात आणि कानातले घालण्याचे भोकही मोठं होतं. मानेवर घट्ट आणि जड दागिने घातल्यामुळे अंगावर पुरळ आणि अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे ट्रेंडमध्ये आहेत म्हणून जड दागिने निवडण्यापेक्षा तुमच्या सोयीचे दागिने खरेदी करा. 

स्किन केअर आणि मेकअप प्रॉडक्ट्स -

लिपस्टिक, आयलायनर, स्किन केअर प्रॉडक्ट नेहमी चांगल्या गुणवत्तेचे आणि एक्पायरी डेट पाहूनच खरेदी करावे. कारण या सर्व उत्पादनांचा वापर तुम्ही थेट तुमच्या चेहरा आणि शरीरावर करत असता. त्यामुळे जर असे प्रॉडक्ट कमी दर्जाचे अथवा जुने असतील तर त्यामुळे तुमच्या त्वचेचं अतोनात नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शॉपिंग करण्यापूर्वीच या गोष्टी लक्षात ठेवा आणि प्रॉडक्टवरील माहिती वाचून मगच ते खरेदी करा. शिवाय ते तुमच्या त्वचेसाठी उपयुक्त आहेत का याचीही माहिती आधीच वाचून घ्या. 

मोठ्या आकाराच्या बॅग्ज -

आजकाल मोठ्या साईझच्या बॅग ट्रेंडमध्ये आहेत. अशा बॅग कुल दिसत असल्यामुळे आपण सहज खरेदी करतो.  अशा बॅगेत खूप सामान राहतं हा तुमच्यासाठी एक प्लस पॉईंट असतो. मात्र प्रवासात अशा बॅगमध्ये नको असलेल्या वस्तूंपासून सगळं कॅरी केल्याचा परिणाम तुमच्या शरीराच्या पोश्चरवर पडतो. अशा जड झालेल्या बॅगमुळे हळू हळू तुमच्या मान, खांदा आणि  कंबरेवर ताण येतो. 

Beauty

POWDER MAGIC EYESHADOW PENCIL - GOLDMINE

INR 950 AT MyGlamm