या राशींच्या मुली असतात स्टायलिश आणि फॅशनेबल

या राशींच्या मुली असतात स्टायलिश आणि फॅशनेबल

स्टायलिश आणि फॅशनेबल दिसायला कोणाला नाही आवडणार. आजकाल फॅशनेबल आणि स्टायलिश दिसणं ही काळाची गरजच झाली आहे. त्यामुळे काही महिन्यांच्याच नाही तर दिवसांच्या फरकाने सतत फॅशनचे नविन ट्रेंड येत असतात. या फॅशन ट्रेंडनुसार राहणं आणि स्टायलिश दिसणं ही प्रत्येकीची वैयक्तिक आवड असू शकते. मात्र काही लोकांचा मूळ स्वभावच स्टायलिश आणि फॅशनेबल असतो. जन्मापासूनच त्यांना नीटनेटकं राहण्यासाठी स्वतःची हटके स्टाईल करायची सवय असते. राशीच्या प्रभावामुळे अशा मुली अथवा मुलं नेहमीच त्यांच्या जीवनात फॅशन आणि स्टाईलबाबत जागरूक असतात. यासाठी जाणून घ्या बारा राशीपैंकी अशा पाच राशींचे लोक जे सर्वात जास्त स्टायलिश आणि फॅशनेबल असतात. 

वृषभ (15 एप्रिल ते 20 मे)

वृषभ राशीचे लोकांची स्वतःची एक वैयक्तिक स्टाईल असते. त्यांना गबाळ्यासारखं राहणं मुळीच आवडत नाही. असं म्हणतात की या राशीचे लोक भाजी आणायला जातानाही लग्नाला गेल्याप्रमाणे नटून थटून जातात. वृषभ राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व मुळातच इतके आकर्षक असते की लोक त्यांच्या नुसत्या जवळ असण्यानेही प्रभावित होतात. साधे कपडे अथवा कमी मेकअप करूनही या राशीचे लोक सुंदर आणि आकर्षक दिसतात.

सिंह (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

सिंह राशीच्या लोकांची स्टाईल आणि फॅशन नेहमीच इतरांपेक्षा हटके असते. स्टाईलिश आणि फॅशनेबल दिसण्यासाठी या राशीचे लोक भरपूर पैसे खर्च करायला मागे पुढे पाहत नाहीत. मुळातच या राशीच्या लोकांना स्वतःवर खर्च करायला खूप आवडतं. हाय फाय फॅशन, ब्रॅंडेड वस्तू आणि स्टायलिश दिसण्याची त्यांना आवड असते. त्यामुळे सिंह राशीच्या मुली अथवा मुलं स्वतःच्या स्टाईलवर सतत लक्ष देतात.

तूळ (24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर)

तूळ राशीच्या लोकांनाही फॅशन करणं खूपच आवडत असतं. मात्र या राशीचे लोक डोळे बंद करून कोणतीही फॅशन फॉलो करत नाहीत. कारण त्यांना बटबटीत आणि भडक फॅशन केलेली आवडत नाही. साधीच पण एलिगंट लुक देणारी फॅशन त्यांना खूप आवडते. त्यामुळे तूळ राशीच्या मुली ट्रेंडी फॅशनपेक्षा क्लासिक फॅशनकडे जास्त झुकतात. त्यांना जुन्या आणि नवीन फॅशनचं कॉम्बिनेशन करणंही खूप आवडतं. मिक्स मॅच करूनही अशा राशीच्या मुली सुंदर आणि आकर्षक दिसतात. 

मेष (21 मार्च - 20 एप्रिल)

मेष राशीच्या मुलींना फॅशनमध्ये नेहमी वेगवेगळे प्रयोग करायला आवडतं. फॅशनेबल दिसण्यासाठी त्यांची ही आवड त्यांच्या पथ्यावरच पडते. कारण त्यांना  त्यांच्या जुन्या कपडे अथवा वस्तूंचा कंटाळा येत नाही. नवीन गोष्टी खरेदी करण्यासोबतच जुन्या गोष्टींपासून काहीतरी नवीन स्टाईल करून फॅशनेबल दिसणं ही त्यांची खासियत आहे. त्यामुळे जुन्या आणि नवीन गोष्टींचा उत्तम मेळ साधत अशा राशीची माणसं सतत स्टायलिश दिसण्याचा प्रयत्न करत राहतात. 

कुंभ (21 जानेवारी - 19 फेब्रुवारी)

कुंभ राशीच्या लोकांना फॅशनवेडे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण बाजारात नवीन फॅशन आली की लगेच ती त्यांना फॉलो करायची असते. त्यांना नेहमी स्वतःकडे ब्रॅंडेड आणि चांगल्या गोष्टी असाव्या असं वाटत असतं. निरनिराळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे आणि शूज जमा करणं हा त्यांचा छंदच असतो. ज्यामुळे त्यांना दररोज वेगवेगळा लुक करावा असं वाटत असतं.