ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
उन्हाळ्याची सुरूवात झाली असून त्वचेची काळजी घेण्याची पद्धत बदलण्याची गरज

उन्हाळ्याची सुरूवात झाली असून त्वचेची काळजी घेण्याची पद्धत बदलण्याची गरज

हिवाळा संपलाच आहे आणि आता गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळ्यातील लोकरीचे कपडे, गरम कपडे यांची जागा स्कार्फ, सुती कपडे, टोपी यांनी घेतली आहे. तर उन्हाळ्यासाठी केवळ पोशाख बदलून चालणार नाही तर त्वचा देखभालीकरिता दिनचर्या देखील बदलणे तितकेच गरजेचे आहे. हिवाळ्यातील त्वचेची देखभाल घेण्याची पद्धत आणि उन्हाळ्यातील त्वचेची देखभाल करण्याची पद्धत भिन्न आहे. निरोगी चमकदार त्वचा मिळविण्यासाठी तसेच चेह-यावर येणारे अकाली वृद्धत्व रोखण्याकरिता काय उपाययोजना करता येतील यासाठी हा लेख जरूर वाचा. यासंदर्भात आम्ही डॉ. रिंकी कपूर, सल्लागार त्वचाविकार तज्ज्ञ, कॉस्मेटिक सर्जन, द एस्थेटिक क्लिनिक यांच्याशी चर्चा केली. तुम्हीदेखील डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागू शकता.

स्किनकेअरचा दिनक्रम कसा बदलाल?

स्किनकेअरचा दिनक्रम कसा बदलाल?

Shutterstock

वाढत्या तापमानाचा परिणाम त्वचेवर होत असून तेलकट टी झोन, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता असते. त्वचेवरील मुरुमांची समस्या असलेल्या व्यक्तीनी उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. आपल्या त्वचेच्या देखभालीत लहानसे बदल करा. आपल्या त्वचेला हवामानाशी जुळवून घेण्याची संधी द्या.

ADVERTISEMENT
  • फोमिंग क्लीन्झर्सचा वापर करा. त्वचा कोरडी होऊ न देता त्वचेच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. कोरफड, काकडी, चारकोल क्लीन्झरचा वापर करा.
  • चांगल्या दर्जाच्या व्हिटॅमिन सी सेरमचा वापर करा जे आपल्या त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात किंवा त्वचेला संतुलित ठेवण्यात नक्की मदत करतील तसेच आपण कॉफी सीरमची निवड देखील करू शकता. जर तुमची त्वचा नाजूक असले आणि मुरुमांची समस्या असे तरे आपण मॉइश्चराईज करण्यापूर्वी कोजिक अॅसिडचा समावेश असलेले सीरम वापरु शकता.
  • तुमची त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चराईज करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यातील मॉइश्चरायझिंग ही त्वचेवरील चमक, आर्द्रता आणि मुरुमांपासून मुक्त करण्यास मदत करते. त्वचेमधईल ओलावा कायम राखण्यासाठी सौम्य मॉइश्चरायझर्सची निवड करा. हायल्यूरॉनिक एसिडचा समावेश असलेल्या मॉइश्चरायझर्सचा वापर करा.
  • सनस्क्रीनचा नियमित वापर करा. निरोगी त्वचेकरिता सनस्क्रीनचा वापर करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. उन्हाळ्याच्या वेळी एसपीएफ 50 पीए +++ सनस्क्रीनचा वापर करा. दर तीन तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. कधीही सनस्क्रीनशिवाय बाहेर पडण्याची चूक करू नका. सनस्क्रीनचा वापर हा अकाली वृद्धत्वापासून नक्कीच संरक्षण करेल.
  • रात्रीच्या वेळी देखील त्वचेची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या रात्रीच्या दिनचर्येत रेटिनॉइड्स समाविष्ट करा. ते आपल्या त्वचेची पोत सुधारण्यास मदत करेल तसेच मुरुमांपासून बचाव करेल. रेटिनॉल-आधारित मॉइश्चरायझर किंवा सीरम वापरू शकता.
  • त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एक्सफोलिएशन आणि स्टीम देऊ शकता. आठवड्यातून दोनदा सौम्य एक्फोलीएटर वापरा आणि आपल्या त्वचेला चमक कशी प्राप्त होते ते पहा. एक्सफोलिएशन छिद्रांना अनलॉक करेल आणि त्वचेच्या सर्व मृत पेशीपासून मुक्त होईल.

 

उन्हाळ्यात आपल्या पर्समध्ये हे नक्कीच असू द्या

उन्हाळ्यामध्ये तुम्ही तुमच्याजवळ काही गोष्टी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी तुम्ही या गोष्टी फॉलो करा. तसंच या खाली दिलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्याजवळ बॅगमध्य उन्हाळ्यामध्ये ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. 

  • फेशियल मिस्ट स्प्रे जवळ ठेवा. घाम आलेल्या त्वचेवर फवारा.
  • आपल्या बॅगमध्ये सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर ठेवा.
  • डोळ्यांभोवती त्वचा विशेषतः अधिक संवेदनशील असते. त्या त्वचेचे संरक्षण करा आणि उन्हात बाहेर पडताना नेहमी सनग्लासेस घाला.
  • ओठांनाही  एसपीएफ असलेले लिप बाम वापरा. काही तासांनी हे लिप बाम पुन्हा लावा. आणि ओठ कोरडे वाटल्यास कधीही चाटू नका.
  • हाताची आणि पायांची नियमित देखभाल करण्यासाठी घरच्याघरी करा मेनिक्युअर आणि पेडीक्युअर
  • जर आपल्या त्वचेला खाज सुटण्यास त्रास होत असेल त्वचाविकार तज्ञांचा सल्ला घ्या. हलके आणि सुती कपडे घाला.
  • अंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करा. उन्हाळ्यासाठी आपल्या त्वचेची देखभाल नियमित करण्यामध्ये मेसोथेरपी एक चांगला उपचार आहे. मेसोथेरपीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि पेप्टाइड्स यांचे मिश्रण वापरले जाते जे त्वचेला आतून संरक्षण करण्यास मदत करते. याकरिता आपल्या त्वचारोगतज्ज्ञ संवाद साधा.

उन्हाळ्यात डोक्याच्या त्वचेवरील खाज (Itchy Scalp) ठरतेय त्रासदायक, करा उपचार

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT