यंदाच्या होळीत केस खराब होण्याची चिंता सतावतेय, तज्ञ्जांचा सल्ला करा फॉलो

यंदाच्या होळीत केस खराब होण्याची चिंता सतावतेय, तज्ञ्जांचा सल्ला करा फॉलो

होळी हा भारतात अगदी उत्साह आणि आनंदात साजरा केला जाणारा मोठा सण आहे. दरवर्षी विविध रंगाची उधळण करणाऱ्या, सर्वांना एकत्र आणणाऱ्या आणि वाईटावर चांगल्या गोष्टींनी मात करणाऱ्या  होळी आणि रंगपंचमीचा आनंदच काही वेगळाच असतो. यासाठीच प्रत्येकाला होळी सणाची माहिती आणि होळी स्पेशल 'खाद्यपदार्थ' (Holi Information In Marathi) याबाबत माहीत असायला हवं. यंदा मात्र कोरोना महामारीमुळे हा  सण नेहमीप्रमाणे साजरा करता येणार नाहीत. योग्य ती काळजी घेत, नियमांचे पालन करत आणि नियोजनबद्ध होळी आणि रंगपंचमी सर्वांना या वर्षी साजरी करावी लागणार आहे. यंदा रंगपंचमी खेळताना कोरोना संक्रमणाची भीती तर असेलच पण नेहमी प्रमाणे रंगामुळे केस खराब होण्याची भीतीदेखील तुम्हाला नक्कीच सतावत असेल. कारण रंगपंचमी खेळताना केसांची निगा राखणं हा एक खूप मोठा टास्कच असतो. रंगाची उधळण करताना सर्वजण नैसर्गिक रंग वापरतीलच असं नाही. यासाठी सुरक्षित रंगपंचमी खेळण्यासाठी घरीच बनवा नैसर्गिक रंग. नैसर्गिक रंगाचे  पर्याय उपलब्ध  असूनही आजही बरेच जण हानिकारक रसायने असलेल्या भडक रंगाने रंगपंचमी खेळतात ही पर्यावरणासाठी खरंच दुर्देवाची गोष्ट आहे. त्यामुळे रंग खेळताना कोण कोणता रंग कधी तुमच्यावर टाकेल हे सांगता येत नाही. अशा केमिकलयुक्त रंगामुळे रंगपंचमी खेळण्याची मजा दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र या आनंदी सणाचा उत्साह या छोट्याशा चिंतेमुळे कमी होऊ देऊ नका. कारण आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. होळी खेळताना केसांची निगा कशी राखायची. त्याचप्रमाणे जाणून घ्या रंगपंचमीची माहिती आणि महत्त्व (Rangpanchami Information In Marathi)

होळी खेळताना पाळा हा तज्ञ्जांचा खास सल्ला

पॅराशूट अॅडवान्स हॉट ऑईल मरिको इंडिया लिमिटेडच्या कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्टच्या डॉ. अपर्णा संथानम (एमडी, डीएनबी) यांच्या मते, "जरी तुम्ही होळी अथवा रंगपंचमीच्या कार्यक्रमाचे ग्रॅंड सेलिब्रेशन करणार असाल तरी ते घरातच करा शिवाय यासाठीच अगदी कमीत कमी रंग वापरा. ज्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होणार नाही. शिवाय रंग खेळण्याआधी तुमच्या केसांना रंगपंचमीच्या खेळासाठी प्रेमाने तयार करा. रंगपंचमीआधी केसांची निगा राखण्यासाठी मी तुम्हाला कोणताही महागडा उपाय सांगणार नसून हा उपाय तुम्हीदेखील नियमित घरच्या घरी करतच असाल. मात्र यामुळे तुमच्या केसांचे रंगापासून संरक्षण होईल हे मात्र मी पक्कं सांगू शकते. माझ्या मते यासाठी तुम्ही तुमचे डेली हेअर रूटिनमध्ये असलेले नारळाचे तेल असायलाच हवे. नारळाचा तुमच्या केस आणि त्वचेला खूप चांगला फायदा होतो. त्यामुळे नारळाचे तेल केसांना लावल्यामुळे तुम्हाला यंदाच्या होळीत आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात."

होळीत केसांचे संरक्षण करण्यासाठी का वापरावे नारळाचे तेल

जाणून घ्या हानिकारक रंगापासून नारळाच्या तेलाने कसे होते केसांचे संरक्षण

  • बाजारात उपलब्ध असलेल्या इतर तेलांच्या तुलनेत नारळाचे तेल केसांच्या मुळांमध्ये दहापट अधिक खोलवर मुरते. थेट केसांच्या मुळांमध्ये शोषले गेल्यामुळे केसांना त्यातील पोषकमुल्ये सहज मिळतात आणि केसांचे नुकसान टाळता येते. नियमित नारळाच्या तेलाचा वापर केल्यास तुमचे केस मऊ आणि चमकदार होतात.
  • नारळाच्या तेलात नैसर्गिक व्हिटॅमिन्स आणि फॅटी अॅसिड असतात. ज्यामुळे तुमच्या केसांवर त्यांचा आश्चर्यकारक परिणाम होतो. केसांची वाढ चांगली होण्यासाठी ही पोषकमुल्ये मुळांना प्रोत्साहन देतात. स्काल्प आणि केसांच्या फॉलिकल्समध्ये तेल पटकन मुरल्यामुळे त्यांना पोषण मिळते आणि केसांची वाढ चांगली होते.
  • रंगपंचमीत केसांची निगा राखण्यासाठी नारळाचे तेल वापरणे हा एक खात्रीदायक आणि परवडणारा उपाय आहे. जर तुम्ही नियमित नारळाचे तेल केसांना लावले तर तुम्हाला केस खराब झाल्यावर त्यासाठी सलॉनमध्ये महागडे उपचार करण्यासाठी लागणारा खर्च वाचवता येऊ शकतो. शेवटी असं म्हणतात ना... prevention is always better than cure!

होळीआधी नारळाच्या तेलाने कशी घ्याल केसांची काळजी

होळीत नारळाच्या तेलाने केसांची काळजी घेण्यासाठी या टिप्स आहेत उपयुक्त 

  • कोणताही उपाय परिणामकारक ठरण्यासाठी तो नियमित आणि सातत्याने करायला हवा. त्याचप्रमाणे जर नारळाचे  तेलही तुमच्या डेली हेअर केअर रूटिनमध्ये असेल तर तुमच्या केसांवर त्याचा दीर्घकाळ परिणाम दिसून येइल. यासाठी रंगपंचमी आधीच काही दिवस तुम्हाला नियमित केसांवर नारळाचे तेल वापरावे लागेल. 
  • नारळाचे तेल केसांना लावण्यासाठी परफेक्ट पद्धत फॉलो करा जसं की, नारळाचे तेल गरम करा अथवा पॅराशूट अॅडवान्स हॉट ऑईल वापरा आणि केसांना जवळजवळ पाच ते सात मिनिटे मसाज करा. केसांना तेल लावताना ते नेहमी मुळापासून टोकापर्यंत लावावे हे लक्षात असू द्या. त्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांनी केस कोमट पाण्याने आणि सौम्य शॅम्पूने धुवून टाका. 
  • रंगपंचमी खेळायला जाण्यापूर्वी केसांवर पुरेसे नारळाचे तेल लावा. कारण नारळाचे तेल तुमच्या केसांवर एखाद्या संरक्षक कवच प्रमाणे काम करेल. नारळाच्या तेलाच्या आवरणामुळे रंगपंचमी खेळताना रंग तुमच्या केसांच्या मुळांपर्यंत जाणार नाहीत. रंगपंचमी खेळून झाल्यावर लगेच केस स्वच्छ धुवा आणि सुकल्यावर पुन्हा केसांना पोषण मिळण्यासाठी केसांवर थोडं नारळाचे तेल लावा. 

या अगदी सोप्या आणि पटकन करण्यासारख्या टिप्स फॉलो करा आणि केसांचे रंगापासून होणारे नुकसान टाळा. या टिप्समुळे  तुम्हाला रंगपंचमीचा खरा आनंद न घाबरता घेता येईल. रंगाचा हा उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा ! यासोबतच तुमच्या आप्तेष्टांनाही द्या या होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि संदेश (Holi Wishes In Marathi) आणि रंगपंचमी शुभेच्छा संदेश (Rang Panchami Quotes In Marathi)

फोटोसौजन्य - शटरस्टॉक