ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
ओपन पोर्सपासून सुटका मिळविण्यासाठी सोपे उपाय

ओपन पोर्सपासून सुटका मिळविण्यासाठी सोपे उपाय

तुमच्या चेहऱ्यावरही लहान लहान डाग दिसत आहेत का? यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सौंदर्यात बाधा येत असेल तर ही ओपन पोर्सची समस्या आहे. यासाठी तुम्ही जास्त त्रास अथवा त्रागा करून घेऊ नका. कारण आम्ही तुम्हाला यातून सुटका मिळविण्यासाठी एक सोपा आणि जबरदस्त फेसपॅकचा घरगुती उपाय सांगणार आहोत. ओपन पोर्सपासून सुटका मिळविण्यासाठी हा अत्यंत सोपा आणि गुणकारी उपाय आहे. या फेसपॅकची सर्वात चांगली गोष्ट अशी की, पोर्स बंद होण्यासह चेहऱ्यावर अधिक चमक आणण्याचे काम हे करते आणि याचा कोणताही साईड इफेक्ट अर्थात नुकसानही नाही. चेहऱ्याची बऱ्याचदा नीट स्वच्छता न केल्याने ओपन पोर्सची समस्या निर्माण होते. बऱ्याचदा स्वच्छतेकडे लक्ष न देता महिला कन्सीलर आणि फाऊंडेशनचा वापर करून हे पोर्स लपविण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही सांगितलेल्या उपायामुळे तुम्ही अत्यंत सहजरित्या यावर मात करू शकता. घरातील तीन वापरातील वस्तूंमधूनच तुम्ही फेसपॅक तयार करू शकता. हा फेसपॅक कसा तयार करायचा आणि याचा कसा परिणाम होतो ते आपण पाहूया. 

साहित्य आणि फेसपॅक लावण्याची पद्धत

साहित्य आणि फेसपॅक लावण्याची पद्धत

Shutterstock

साहित्य 

ADVERTISEMENT
  • ½ चमचा लिंबाचा रस
  • ½ चमचा साखर 
  • 1 चमचा गुलाबपाणी 

फेसपॅक बनविण्याची पद्धत 

  • लिंबाचा रस एका बाऊलमध्ये काढून घ्या 
  • त्यामध्ये साखर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि वरून गुलाबपाणी घालून पुन्हा एकदा नीट मिक्स करा. साखर पूर्ण विरघळेपर्यंत हे मिक्स करून घ्या 
  • साखर विरघळल्यावर तुमचा घरगुती फेसपॅक तयार आहे 

फेसपॅक लावण्याची पद्धत 

  • आपली त्वचा आणि चेहरा स्वच्छ करून घ्या. ज्या ठिकाणी पोर्स आहेत अर्थात नाक, कपाळ या ठिकाणी व्यवस्थित कापसाच्या मदतीने हे मिश्रण लावा 
  • साधारण अर्धा तास हा पॅक व्यवस्थित चेहऱ्यावर सुकू द्या
  • अर्ध्या तासानंतर तुम्ही चेहरा कोमट पाण्याने धुवा आणि स्वच्छ टॉवेलने हलक्या हाताने व्यवस्थित पुसून घ्या
  • पहिल्यांदाच याचा वापर केल्यानंतर तुम्हाला त्वरीत याचा परिणाम दिसू लागेल
  • तुम्हाला अजून चांगला परिणाम हवा असेल तर तुम्ही हे रोज वापरू शकता. हा एक उत्तम उपाय असून पोर्स बंद ठेवण्यास याचा चांगला उपयोग होतो 

ओपन पोर्स (खुल्या पोर्स) साठी लिंबू, साखर आणि गुलाबपाणीचा वापर का?

ओपन पोर्ससाठी आपण वापरात आणणारे तीन पदार्थ म्हणजे लिंबू, साखर आणि गुलाबपाणी. पण इतर कोणत्याही वस्तूचा वापर न करता केवळ याच तीन गोष्टी का वापरायच्या असाही प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. तर त्याचा नक्की का वापर करायचा याचे स्पष्टीकरणही आम्ही तुम्हाला देत आहोत. 

Adult Acne बद्दल तुम्हाला माहीत असायलाच हवेत ‘हे’ 6 Facts!

ADVERTISEMENT

लिंबू

लिंबू

Shutterstock

  • मुरुमं, चेहऱ्यावर येणारे डाग यासारख्या समस्यांवर लिंबू अत्यंत उपयुक्त आहे
  • लिंबामध्ये असणारे अॅसिडिक गुण हे पोर्स अगदी आतपर्यंत स्वच्छ करण्यास मदत करते
  • विटामिन सी ने युक्त असणारे लिंबू त्वचेवर चमक, गोरेपणा आणण्यास मदत करते आणि त्वचा अधिक चांगली राखण्यास मदत करते

साखर

साखर

Shutterstock

ADVERTISEMENT
  • त्वचेसाठी सर्वात चांगला घटक आहे 
  • त्वचेला पॉलिश करून चमक आणून देते 
  • डेड स्किन सेल्स आणि लेअर हटविण्यास मदत करते 
  • ग्लायकोलिक अॅसिड असते जे त्वचेला तरूण दिसण्यासाठी उपयुक्त ठरते 
  • पोर्स लहान ठेवण्यास मदत करते

इन्फेक्शनमुक्त त्वचेसाठी वाफ घेणं आहे आवश्यक, मिळवा चमकदार त्वचा

गुलाबपाणी

गुलाबपाणी

Shutterstock

  • पोर्स स्वच्छ करते 
  • त्वचेचा पीएच बॅलेन्स व्यवस्थित राखते 
  • त्वचेला अधिक शांत ठेवते आणि त्वचा अधिक चांगली दिसते 
  • त्वचेवरील व्रण कमी करण्यास मदत करते 

तुम्ही या घरगुती फेसपॅकचा वापर करून ओपन पोर्सच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. हा फेसपॅक अत्यंत नैसर्गिक पद्धतीने बनला असून याचा कोणताही साईड इफेक्ट अथवा त्वचेवर नुकसान नाही. पण याचा वापर करण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट नक्की करून घ्या. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे याचा आधी एकदा वापर करून पाहा. 

ADVERTISEMENT

कसदार चेहऱ्यावर ओपन पोअर्स असतील तर करा हे घरगुती उपाय

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

23 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT