ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
घरातील जुने कपडे काढायचे असतील तर या ठिकाणी करा दान

घरातील जुने कपडे काढायचे असतील तर या ठिकाणी करा दान

प्रत्येकाच्या घरात जुन्या कपड्यांचा ढीग नक्कीच असेल. हे जुने कपडे कोणाला द्यायचे त्याचं काय करायचं हे बरेचदा कळत नाही. अशावेळी घरात कपडे तसेच पडून राहतात. तुमचे जुने कपडे दुसऱ्यांनी घालावेत इतक्या चांगल्या स्थितीत असतील तर ते दान करणे नेहमीच चांगले. मुंबईत आणि मुंबईबाहेर अशा काही संस्था आहेत जे तुमच्या जुन्या कपड्यांचा योग्य वापर करतात. तुम्हालाही तुमचे कपडे दुसऱ्यांना देऊन त्यांची अशी मदत करायची असेल तर आम्ही अशा काही संस्था शोधून काढल्या आहेत. जेथे तुम्ही तुमचे जुने कपडे दान करु शकता

किचनमधून आताच काढून टाका या जुन्या गोष्टी

माणुसकीची भिंत

मध्यंतरी महाराष्ट्रात सुुरु झालेला हा प्रोजेक्ट अनेकांना माहीत असेल. माणुसकीची भिंत असे लिहून एक जागा तयार केली जाते आणि त्या ठिकाणी तुमचे सगळे जुने कपडे आणि वापरात नसलेल्या वस्तू ठेवता येतात. ज्या व्यक्तीला त्याची गरज आहे ती व्यक्ती त्या जागेवरुन आपल्याला आवश्यक असलेली वस्तू तेथून घेऊन जातो. माणुसकीची भिंत आजही अनेक ठिकाणी उभारली जाते. गरिब आणि गरजू लोकं या ठिकाणाहून गरजेच्या वस्तू घेऊन जातात. तुम्ही याची अधिक माहिती घेऊन या ठिकाणी कपडे ठेवू शकता. 

जुन्या कपड्यांचा करा असा पुनर्वापर, व्हा स्टायलिश

ADVERTISEMENT

गुंज

सेवाभावी संस्था म्हणून कार्यरत असलेली ‘गुंज’ ही संस्था देखील जुने कपडे घेऊन ते गरजूंना पुरवण्याचे काम करते. गुंज या संस्थेशी संपर्क साधूनही तुम्ही हे कपडे देऊ शकता किंवा हल्ली मॉलमध्येही खूप ठिकाणी असे बॉक्स ठेवले जातात. ज्यामध्ये तुम्हाला कपडे देता येतात. तुम्ही तुमच्या नजीकच्या मॉलमध्येही या संदर्भात विचारणा करु शकता. त्यामुळेही ही संस्था देखील तुम्हाला या संदर्भात मदत करु शकते. याशिवाय तुमच्याकडे असलेली खेळणी, पुस्तकेही तुम्हाला येथे देता येतात

भेट द्या : https://goonj.org/

महागडा शालू टाकण्यापेक्षा असा करा त्याचा उपयोग, पैसै होतील वसूल

क्लोथबॉक्स फाऊंडेशन

गुंजप्रमाणेच  असलेली दुसरी संस्था म्हणजे क्लोथबॉक्स फाऊंडेशन. या संस्थेत देखील तुम्हाला तुमचे जुने कपडे देता येतात. या ठिकाणी देखील तुम्ही कोणत्याही वयाच्या मुलांचे किंवा मुलींचे कपडे देऊ शकता. काही खास नियमावलीचे पालन करत तुम्हाला या ठिकाणी कपडे दान करावे लागतात. त्यामुळे ते नियम वाचून तुम्ही तुमचे वापरात नसलेले कपडे दान करा. 

ADVERTISEMENT

भेट द्या : https://www.clothesboxfoundation.org/

शेअर अॅट डोअरस्टेप

तुमचे कपडे देऊन टाकायचे असतील आणि तुम्हाला बाहेर जाऊन या संस्थांना प्रत्यक्ष भेट देण्याचा वेळ नसेल तर तुम्ही या संस्थेची मदत घेऊ शकता. त्यांच्या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही घरबसल्या तुमचे पीकअप निवडू शकता. जर तुमच्या एरियामध्ये ही सोय असेल तर नक्कीच तुम्ही घरबसल्या हे कपडे दान करु शकता. त्यांच्या वेबसाईडवर तुम्हाला ही माहिती अधिक मिळू शकते. 

भेट द्या : https://sadsindia.org/

हेही असू द्या लक्षात

जर तुम्ही कपडे दान करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. 

ADVERTISEMENT
  • फाटलेले आणि जुने कपडे दान करु नका. जर ते कपडे घालण्या योग्य असतील तरच ते द्या. 
  • वयोमानानुसार कपड्यांची विभागणी करा. म्हणजे ते कोणाला देता येतील हे तुम्हाला लक्षात येईल. 
  • पुस्तक आणि खेळणी या गोष्टीही तुम्ही दान करु शकता. त्याचीही माहिती काढून घ्या 

आता जुन्या कपड्यांना दान करुन इतरांची मदत करा.

17 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT