पब्लिक टॉयलेट वापरण्यापूर्वी या गोष्टींची घ्या दक्षता, नाही तर पडाल आजारी

पब्लिक टॉयलेट वापरण्यापूर्वी या गोष्टींची घ्या दक्षता, नाही तर पडाल आजारी

प्रवास करताना रेल्वेस्थानक अथवा बसस्थानकाजवळ प्रवाशांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे असतात. आजकाल मॉल आणि हॉटेलमध्ये तर अतिशय स्वच्छ पब्लिक टॉयलेट असतात. त्यामुळे गरजेच्या वेळी सहज सार्वजनिक टॉयलेट वापरले जाते. मात्र असं सार्वजनिक टॉयलेट वापरण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहीत असायलाच हव्या. नाहीतर त्यामुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता वाढते. कोरोना महामारीमुळे भीतीचं वातावरण  अजूनही निवळण्याचं नाव घेत नाही आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत काही खास बदल करणं गरजेचं आहे. त्यापैकीच एक म्हणजे इनफेक्शन टाळण्यासाठी सार्वजनिक टॉयलेट वापरताना काळजी घेणं. मॉल अथवा रेस्टॉरंटमधील टॉयलेट वापरताना फार भीती वाटत नाही कारण त्या ठिकणी योग्य ती स्वच्छता बाळगली जाते. मात्र रेल्वेस्थानक, बसस्थानक अथवा ठिकाणी असलेले स्वच्छतागृह स्वच्छ आणि सुरक्षित असतीलच याची खात्री देता येत नाही. मात्र अडचणीच्या वेळी असे टॉयलेट वापरण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. असं असलं तरी कोणतंही सार्वजनिक टॉयलेट वापरताना काही गोष्टी काळजीपूर्वक पाळ्याव्या लागतात. 

सार्वजनिक टॉयलेट वापरण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी -

सार्वजनिक टॉयलेट वापरताना या गोष्टी पाळणं आहे गरजेचं. 

  • टॉयलेटमध्ये बिना मास्कचे जाऊ नका
  • वापर झाल्यावर हात स्वच्छ साबणाने धुवा
  • जास्त वेळ सार्वजनिक टॉयलेटमध्ये थांबू नका
  • सार्वजनिक टॉयलेटमधील कमीत कमी गोष्टींना स्पर्श करा
  • सार्वजनिक टॉयलेटमधील इतर लोकांपासून सुरक्षित अंतर पाळा
  • जास्त गर्दीच्या अथवा अस्वच्छ पब्लिक टॉयलेटचा वापर करणे टाळा

सार्वजनिक टॉयलेटचा फ्लश वापरताना -

सार्वजनिक टॉयलेटचा वापर झाल्यावर तुम्ही सहज फ्लशचा वापर करता. मात्र तो करताना थोडं सावध राहायला हवं. कारण तुमच्यापुर्वी अनेकांनी त्या फ्लशच्या टॅबला हात लावला असेल. त्यामुळे प्लश करताना हातात ग्लोव्ज अथवा टॉयलेट नॅपकीन ठेवा. नंतर या गोष्टींची योग्य पद्धतीने व्हिलेवाट लावा. शिवाय हात धुवेपर्यंत फ्लश केलेल्या हाताने शरीराच्या कोणत्याही भागाला हात लावू नका. फ्लश करण्यापूर्वी  कमोडचे झाकण बंद करा ज्यामुळे तुम्हाला इनफेक्शन होणार नाही.

instagram

तुमच्या जवळील वस्तू नीट सांभाळा -

पब्लिक टॉयलेट वापरताना तुम्ही घराबाहेर असता. त्यामुळे तुमच्याकडे तुमची पर्स अथवा इतर साहित्य असू शकतं. यासाठीच सार्वजनिक टॉयलेट वापरण्यापुर्वी हे साहित्य तुमच्यासोबत असलेल्या एखाद्या व्यक्तीला टॉयलेटबाहेर सांभाळण्यास सांगा. कारण जर तुम्ही या  वस्तू टॉयलेटमध्ये घेऊन गेला तर त्यांच्या माध्यमातून जीवजंतू तुमच्या घरी आणि तुम्ही जिथे जाल तिथे पसरू शकतात. तुमच्यासोबत कुणीच नसेल तर या वस्तू जमिन अथवा वॉश बेसिनजवळ ठेवण्यापेक्षा दरवाज्यामागे असलेल्या हुक्सवर अडकवा. वापर झाल्यावर तुमच्या वस्तू सॅनिटायझर सरफेस स्प्रेने निर्जंतूक करून घ्या. 

सार्वजनिक टॉयलेट वापरल्यानंतर हात धुताना -

कोणतेही सार्वजनिक टॉयलेट वापरल्यानंतर हात स्वच्छ साबणाने धुणे गरजेचे आहे. वीस सेकंद हात स्वच्छ पाण्याने धुवा शिवाय हात योग्य पद्धतीने चोळून धुवा. आजकाल सार्वजनिक टॉयलेटमध्ये पाणी आणि साबणाची सोय केलेली असते. मात्र तसं नसेल तर हात सॅनिटायझरने स्वच्छ करा. बाहेर जाताना तुमच्या बॅगेत एक छोटी सॅनिटायझरची बाटली असायलाच हवी. तुमचे हात, बोटे, नखं स्वच्छ झाली आहेत याची खात्री करून घ्या.

instagram

Beauty

WIPEOUT Sanitizing Spray

INR 199 AT MyGlamm