झोपेतून खडबडून येते जाग, ही आहेत कारणं

झोपेतून खडबडून येते जाग, ही आहेत कारणं

आरोग्य खणखणीत राहावे असे वाटत असेल तर चांगली झोप ही फार महत्वाची असते. पण सगळ्यांनाच सुखाची झोप मिळतेच असे नाही. काही जणांना झोपेच्या अनेक तक्रारी असतात. शांत झोप न लागणे, झोप येण्यास अडथळा येणे, झोपेतून खडबडून जाग येणे असे काही त्रास होतात. तुम्हालाही असा त्रास होत असेल. झोप लागली लागली म्हणता खडबडून जाग येत असेल तर त्या मागे काही कारणं असू शकतात. कधी कधी झोपेत आपण कुठेतरी खोल दरीत पडतोय, पाय घसरतोय असे जाणवू लागते.हे असे दिसण्यामागेही काही कारणं असू शकतात. झोपेतून खडबडून जाग येण्याची काही कारणं आज आपण जाणून घेऊया.

इंटरमिटेंट फास्टिंग करूनही वजन झालं नाही कमी, असू शकतात ही कारणं

मानसिक ताण

झोप नीट न लागण्याचे पहिले कारण म्हणजे मानसिक ताण. जर तुम्ही मानसिक ताण तणावाखाली असाल तर तुम्हाला असा त्रास होणे स्वाभाविक असते. एखाद्या विषयावर ज्यावेळी आपण खूप विचार करत राहतो.  त्याचा ताण आपल्या मनावर सतत येतो. जर अशा मानसिक त्रासामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला अशी खडबडून जाग येणे स्वाभाविक आहे. जर तुम्ही अशा ताणावात असाल तर झोपण्यापूर्वी प्राणायम करा. चांगल्या गोष्टी वाचा. त्यामुळेही तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत मिळते. 

अंथरूणात पडल्या-पडल्या लागेल गाढ झोप, फॉलो करा या टिप्स

स्मृतींचे एकत्रीकरण

झोप ही माणसासाठी फारच महत्वाची असते. झोपेमध्ये शरीर दुरुस्तीचे काम सुरु असते. झोपल्यानंतर मेंदूतून बऱ्याच गोष्टी वजा होत असतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या कामांसाठी मेंदू आणि शरीर नीट होते. पण हे कार्य ज्यावेळी चुकीच्या पद्धतीने होऊ लागते. म्हणजेच तुमच्या झोपेत मेंदूचे हे कार्य सुरळीत सुरु नसेल तर खडबडून जाग येण्याची शक्यता जास्त असते. झोपेचे हे कार्य सुरळीत चालावे असे वाटत असेल तर तुम्ही योग्य वेळी झोपा. कारण कमी झोप हे देखील मेंदूच्या कार्यामध्ये अडथळा आणू शकते.

झोपण्याची पद्धत

झोपण्याची पद्धत ही बरेचदा अपुऱ्या झोपेसाठी आणि शरीरासाठी हानीकारक असते. जर तुमची झोपण्याची पद्धत चुकत असेल तर बरेचदा रक्तपुरवठा खंडीत होतो. रक्तपुरवठा खंडीत झाला तरी देखील खडबडून जाग येऊ शकते. बरेचदा झोपेत गुदमरल्यासारखे वाटते. पालथं झोपल्यामुळे किंवा डोक्याखाली हात ठेवून झोपण्याच्या सवयीमुळे अशा पदधतीने त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही झोपताना नेमकं कसं झोपत आहात ते देखील बघा. जर तुम्ही योग्य पद्धतीने झोपत असाल तर तअसा त्रास तुम्हाला होणार नाही. पण गुदमरल्यासारखे झाले की, अंग दुखू लागले की, झोपेतून जाग येणे साहजिक आहे.

दिवसभर झोप येत असेल तर नक्की ट्राय करा ‘या’ टिप्स

मद्यसेवन किंवा धूम्रपान

मद्यसेवन आणि धूम्रपान तुमच्या मेंदूवर आणि आरोग्यावर खोलवर परिणाम करते. सतत याचे सेवन करत असाल तर तुमच्या शरीराचे काही कार्य हे सुरळीत चालत नाही. तुमच्या शरीराच्या सगळ्या क्रियांवर त्याचा परिणाम होऊ लागतो. त्यामुळे झोपही विचलित होते. शांत झोप लागत नाही. परिणामी त्याचा खोल परिणाम शरीरावर होऊ लागतो. अचानक जाग येणे असे काही त्रास होऊ लागतात.

 जर तुम्हालाही अशी खडबडून जाग येत असेल तर ही आहेत काही कारणं. तुम्हाला आमचा लेख कसा वाटला जरुर कळवा.