न थापता, उकड काढल्याशिवाय बनवा लुसलुशीत तांदळाची भाकरी

न थापता, उकड काढल्याशिवाय बनवा लुसलुशीत तांदळाची भाकरी

तांदळाची लुसलुशीत भाकरी आणि पिठलं खाण्याची मजा सगळ्यांना आवडते. चविष्ट भाकरी कोणत्याही भाजीसह अप्रितमच लागते. पण तांदळाची भाकरी करायची म्हटलं की, आधी उकड काढा मग ती थापा आणि मग भाजा अशी मोठी प्रक्रिया बऱ्याचदा कंटाळवाणी वाटते. त्यामुळे भाकरी करण्यासाठी बराच वेळही लागतो. पण तुम्हाला वेळ वाचवून आणि न थापता आणि अगदी उकड न काढताही लुसलुशीत तांदळाची भाकरी (Rice Bhakri) बनवता येईल. याची फक्कड रेसिपी आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. आम्ही सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही तांदळाची भाकरी केली तर ती नक्कीच मऊ आणि चविष्ट होईल. तसंच थापा आणि उकड काढा असा पसाराही करावा लागणार नाहीत. 

सकाळच्या नाश्त्याला निवडा तांदळाच्या उकडीचा झटपट पर्याय

साहित्य आणि कृती

साहित्य

  • एक मोठी वाटी तांदळाचे पीठ 
  • चवीनुसार मीठ
  • भाकरीला लावण्यासाठी तांदळाचे पीठ 
  • पाणी 

कृती 

  • तांदळाच्या पिठात मीठ घालून घ्या. व्यवस्थित मिक्स करा
  • पाणी एका भांड्यात गरम करा. पाणी व्यवस्थित गरम करा. जेणेकरून पीठ व्यवस्थित मळले जाईल. पीठ व्यवस्थित मळल्यास भाकरीला तडे जात नाहीत
  • पाणी गरम झाल्यावर गरजेनुसार पिठात घालून भाकरीसाठी पीठ व्यवस्थित मळून घ्या. गरम पाणी घातल्याने तांदळाचे पीठ अगदी मऊ होते आणि भाकरी लुसलुशीत होण्यास मदत होते. त्यामुळेच पाणी थंड न वापरता गरम पाण्याचा उपयोग करा. यामुळे तुम्हाला वेगळी उकड काढून घ्यायची गरज भासणार नाही 
  • पिठाचा गोळा झाल्यावर जरासा घट्टसर ठेवा. गरज पडल्यास, भाकरी करताना हाताला पाणी लावा 
  • गोळा जास्त मोठा असेल तर त्याचे दोन भाग करून घ्या आणि हाताला पाणी लावा आणि व्यवस्थित मळून घ्या. जितके पीठ जास्त मळाल तितकी भाकरी अधिक लुसलुशीत होईल
  • भाकरीसाठी गोळा मळल्यानंतर अगदी प्लेन आणि मऊ दिसतो. असा गोळा दिसला की त्याचे लहान लहान गोळे करून घ्या. भाकरी किती मोठी करायची आहे त्यानुसार तुम्ही गोळा बनवून घ्या
  • पोळपाट लाटणं घेऊन त्यावर तांदळाचे पीठ पसरा आणि त्यावर गोळा ठेऊन लाटा. वरून गरज भासेल तसं लाटताना तांदळाचे पीठ तुम्ही लावा आणि भाकरी लाटा 
  • एका बाजूला तवा तापत ठेवा. त्यावर लाटलेली भाकरी टाका आणि वरून हाताने पाणी लावा. वरती लावलेले पाणी सुकल्यावर भाकरीची बाजू पलटा आणि मग पुन्हा भाजून घ्या. पुन्हा पहिल्या बाजूला परता. भाकरी मस्त टम्म फुगू लागते. तुम्हाला हवं तर न पलटता ती काढून गॅसच्या आचेवर चिमट्यात धरून भाजा. तुमची लुसलुशीत भाकरी तयार आहे. लोणी, भाजी, पिठलं आणि कांद्यासह ही गरमागरम भाकरी खायला द्या 

वजन कमी करायचं आहे मग नियमित खा ‘भाकरी’

टीप - पाण्याचा अति वापर करू नका. भाकरी न थापताही करता येऊ शकते. तुम्हाला चवीला ही भाकरी अगदी थापलेल्या भाकरीप्रमाणेच चालते. उकड काढताना पाणी तुम्ही गरम करून त्यात तांदळाचे पीठ घालता. तुम्हाला इथे फक्त गरम पाणी वापरून तांदळाचे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे. या महत्वाच्या बाबी लक्षात ठेवल्यास, तुम्हाला मस्त लुसलुशीत भाकऱ्या मिळतील आणि जास्त कष्टही करावे लागणार नाहीत. वाट कसली पाहताय मग...नक्की करून पाहा ही सोपी पद्धत!

भाकऱ्या नीट होत नसतील तर नक्की ट्राय करा या सोप्या ट्रिक्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक