त्वचा आणि आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते ड्रॅगन फ्रुट

त्वचा आणि आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते ड्रॅगन फ्रुट

 त्वचेसाठी आहारात अनेक चांगल्या गोष्टींचा समावेश करणे गरजेचे असते. व्हिटॅमिन आणि प्रोटीनने भरलेले घटक हे चांगल्या त्वचेसाठी फारच गरजेच्या असतात. त्वचेसाठी आहारात फळांचा समावेश करणे हे नेहमीच उत्तम असते.  फळांमधून फायबर, व्हिटॅमिन हे घटक मिळतात. जे त्वचा आणि आरोग्यासाठी फारच फायद्याचे असतात. बाजारात मिळणारे ड्रॅगन फ्रुट तुम्ही कधी पाहिले आहे का? गुलाबी रंगाचे हे फळ दिसायला इतके आकर्षक असते की ते खाण्याची इच्छा नक्कीच होते. हे फळ परदेशातील असल्यामुळे भारतात त्याची किंमत आजही जास्त आहे.  किवी गटातील हे फळ तुम्ही अजूनही चाखून पाहिले नसतील तर त्वचा आणि आरोग्यासंदर्भातील अनेक फायद्ये जाणून तुम्ही ते खाऊन पाहायला हवे. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत ड्रॅगन फ्रुटविषयी अत्यंत महत्वाची माहिती

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी घरीच बनवा स्क्रब, मिनिटांमध्ये दिसाल सुंदर

 

ड्रॅगन फ्रुट म्हणजे काय?

Instagram

ड्रॅगन फ्रुट पाहिल्यानंतर ते किवी वर्गातील वाटते. पण हे फळ कॅक्टस गटातील आहे. या फळाला पिटाया किंवा पिठाया असे या फळाला म्हणतात. अमेरिकेत ही फळ वाळवंटात हे फळ मिळते. हे फळ बाहेरुन गुलाबी रंगाचे असते आणि त्याचा गर पांढऱ्या रंगाचा असतो. हा गर  चवीला फार वेगळा लागत नाही. यामध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात. त्या काळ्या तिळाप्रमाणे दिसतात. त्याची चव चुरचुरीत लागते. पण य फळाची चव अजिबात गोड किंवा कडू नसते. हे फळ भारतात प्रकर्षाने आता मिळू लागले आहे. हे फळ बाजारात बाराही महिने मिळते.  त्यामुळे तुम्ही आहारात एकदा तरी घ्यायला हवे. 

चेहऱ्यावर पटकन ग्लो येण्यासाठी ट्राय करा हे फेसमास्क

ड्रॅगन फ्रुटचे त्वचा आणि आरोग्यासाठीचे फायदे

Instagram

ड्रॅगन फ्रुटचे अनेक फायदे आहेत जाणून घेऊया नेमकं ड्रॅगन फ्रुटमध्ये नेमकं आहे तरी काय

  • ड्रॅगन फ्रुट हे फॅट फ्री असते. त्यामुळे वजन वाढीचा प्रश्न येत नाही. या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे पोटभरीचे असे हे फळ आहे. 
  • ड्रॅगन फ्रुट हे व्हिटॅमिन C ने युक्त असे फळ आहे.  यामध्ये अँटीऑक्सिडंट असलेले घटक असल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. याशिवाय अनेक आजारांमध्ये ड्रॅगन फ्रुट खाण्याचा सल्ला दिला जातो. 
  • ड्रॅगन फ्रुटमध्ये मोठ्या प्रमाणात आर्यनचा साठा असतो.हे फळ खाल्ल्यामुळे ऑक्सिजनमधील आर्यनचा साठा वाढतो. त्यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत मिळते.  ड्रॅगन फ्रुटमध्ये असलेले व्हिटॅमिन शरीराला ती उर्जा वापरु देण्यास मदत करते. 
  • ड्रॅगन फ्रुट हा फायबरचा भंडार असल्यामुळे त्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते. पोट स्वच्छ असेल तर त्वचेच्या इतर समस्या होत नाहीत. 
  • व्हिटॅमिन C शरीराला पुरेसे मिळाल्यामुळेही त्वचा अधिक सुंदर आणि चांगली होण्यास मदत मिळते.

भारतात साधारणपणे पांढरा गर असलेले ड्रॅगन फ्रुट मिळते. ते तुमच्या आहारात नक्कीच असायला हवे. पण जर तुम्हाला ड्रॅगन फ्रुटच्या सेवनानंतर काही त्रास होत असतील तर तुम्ही हे फळ मिळूच खाऊ नका.  

अंघोळ करताना तुम्ही शॉवरखाली धुता का चेहरा, जाणून घ्या दुष्परिणाम

Beauty

POSE HD Foundation Stick - Walnut

INR 599 AT MyGlamm