दिवसाची सुरुवात करा सूर्योदय कोट्सपासून (Sunrise Quotes In Marathi)

Sunrise Quotes In Marathi

‘सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर…. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार!’ प्रत्येक दिवसाची सुरुवात ही सूर्याचे दर्शन करुन केले जाते. आलेला प्रत्येक नवा दिवस आशेचा किरण घेऊन येत असतो. अशा या नव्या दिवसाचे स्वागत आनंदाने, उत्साहाने आणि नव्या उमेदीने करायला हवे.  दिवसाची सुरुवात चांगली व्हावी यासाठी तुम्ही एकमेकांना शुभेच्छा संदेश देत असाल तर त्यात थोडी आणखी भर घालत दिवसाची सुरुवात सूर्याच्या प्रकाशाने भरण्यासाठी आम्ही काही सूर्योदय कोट्स शोधून काढले आहेत. याशिवाय दिवसाची सुरुवात अधिक शुभ करण्यासाठी तुम्ही शुभ सकाळ संदेश मेसेजही पाठवू शकता. दरम्यान, सध्या आपण जाणून घेऊया सूर्योदय कोट्स.

Table of Contents

  सूर्योदय कोट्स (Morning Sunrise Quotes In Marathi)

  लवकर उठा आणि दिवसाची सुरुवात शुभ करण्यासाठी तुमच्या जवळच्या व्यक्तिंना पाठवा सुर्योदय कोट्स.

  सूर्योदय कोट्स - Morning Sunrise Quotes In Marathi

  • उगवलेला प्रत्येक सूर्य तुमच्या आयुष्यात आणू दे आनंद… सूर्य प्रकाशाने उजळून निघू दे तुमचं आयुष्य
  • सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर… आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार
  • सूर्य उगवला प्रभात झाली… उठा उठा सकाळ झाली
  • सूर्याच्या तेजाने उजळून निघू दे तुमचं आयुष्य… तुमच्या आयुष्यात येऊ दे फक्त आनंदी आनंद
  • चांगल्या दिवसाची आस आहे… सूर्य तुझ्या उगवण्याची मी वाट पाहात आहे
  • सूर्याचे दर्शन घेण्यासाठी रोज पहाटे उठतो… तुझ्या उगवण्याने आयुष्यात एक वेगळाच प्रकाश येतो.
  • सूर्यप्रकाशाने उजळून निघाला निसर्ग आयुष्यात तुमच्याही येऊ दे अगदी तसाच आनंद
  • सूर्याचे तेज आणू दे तुमच्यामध्ये एक उर्जा… नव्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
  • सूर्याचे किरण आले माझ्या अंगणी..चला दिवसाची सुरुवात करु आनंद भऱ्या भावनांनी
  • उठा उठा सकाळ झाली… सूर्याला पाहून दिवसाची सुरुवात करण्याची वेळ झाली
  • सोन्याहून अधिक पिवळे आणि मौल्यवान म्हणजे ‘सूर्योदय’
  • सूर्योदय तुम्हाला देतो एक शिकवण…. पुन्हा नव्याने आयुष्य सुरु करण्याची
  • आजचा दिवस उमेदीने आणि हिमतीने जगा, आलेल्या दिवसाचे सोने करा
  • दिवसाची सुरुवात करा अशी की,आजचा दिवस तुमच्या कायम लक्षात राहील
  • दिवस उगवतो नव्या आशा घेऊन… हसतमुखाने करा दिवसाची सुरुवात

  वाचा - सूर्यास्त कोट्स (Sunset Quotes In Marathi)

  सूर्योदय मेसेज (Sunrise Message In Marathi)

  दिवसाची सुरुवात शुभ करण्यासाठी आणि एक सकारात्मक उर्जा देण्यासाठी पाठवा सूर्योदय मेसेज. या शिवाय हा आनंंद असाच  टिकवायचा असेल आणि तुमचा वाईट मूड चांगला करायचा असेल तर आनंदी कोट्स पाठवा.

  सूर्योदय मेसेज - Sunrise Message In Marathi

  • तेजस्वी सूर्याची किरणं आणू देत तुमच्यामध्ये एक उर्जा… नव्या दिवसाच्या गोड शुभेच्छा
  • कालचा दिवस मागे टाकून उगवला नवा दिवस.. सूर्याचे तेज तुमच्या आयुष्यात घडवून आणो नवा बदल
  • सूर्याची तेजस्वी किरणं तुम्हाला देवोत.. तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येवोत 
  • सूर्योदयाची चाहुल देई मनात नवी उर्जा… हात जोडूनी नव्या दिनाची सुरुवात करा
  • उर्जेचा अखंड स्रोत तो देतो प्रकाश.. तुमच्याही आयुष्यात दररोज येवो आनंदाची पहाट
  • सूर्य म्हणजे एक तेजस्वी आगीचा गोळा..जो दईल तुमच्या आयुष्या नवी दिशा
  • सकाळी उठून सूर्योदय पाहणे भाग्याचे… कारण जो तो वंदन करी उगवत्या
  • सूर्याचे तेज, सूर्याची उर्जा कायम देवा तुम्हाला नव उमेदीची आशा
  • उगवता प्रत्येक सूर्य तुमच्या आयुष्यात नवी उमेद आणो..सूर्याची किरणं तुम्हाला नवी आशा देवो 
  • सूर्य आहे साक्षीला…आयुष्याच्या प्रगतीला
  • आयुष्यात खचून जाऊ नका, कारण सूर्य मावळतो तसा तो रोजही उगवतो
  • सूर्याचे तेज, सूर्याची कांती, सूर्याेदय आणो तुमच्या जीवनात आनंद
  • सूर्य उगवतो नवा दिवस घेऊनी नव्या आशा घेऊनी 
  • नव्या आशा घेऊनी आला नवा दिवस… असाच राहू दे तळपत सूर्य आयुष्यभर
  • आशेचा नवा सूर्य नेहमी तळपत राहू दे आणि तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येऊ दे

  वाचा हे गुड आफ्टरनून मेसेज मराठीतून

  सूर्योदय व्हॉटसअप स्टेटस (Sunrise Whatsapp Status In Marathi)

  काही मेसेज प्रत्यक्ष न पाठवता तुम्हाला तुमच्या व्हॉटसअॅपच्या स्टेटसवरुनही  हा आनंद वाटता येऊ शकतो.

  सूर्योदय व्हॉटसअप स्टेटस - Sunrise Whatsapp Status In Marathi

  • सूर्य उगवला. नवा दिवस आला… नवा सूर्योदय नवी आशा घेऊन आला
  • सूर्याचे तेजस्वी रुप पाहून आयुष्य रोज नव्याने जगण्याची प्रेरणा देवो
  • सूर्याप्रमाणे तेजस्वी होऊन तळपत राहा कारण आजचा दिवस हा फक्त तुमचा आहे
  • सूर्य आहे म्हणून सुरु आहे जीवनचक्र, या सूर्याचे दर्शन घेण्यासाठी आता तरी व्हा सज्ज
  • हसत करा दिवसाची सुरुवात प्रत्येक दिवस नेहमीच जातील आनंदात
  • चला सूर्योदय झाला नव्या आशेची पहाट घेऊनी आला
  • प्रयत्न केल्यावर यश मिळण्यावाचून राहात नाही...कारण सूर्यही रोज न थकता रोज उगवण्याचे काम विसरत नाही
  • नका करु जास्त विचार.. आली आहे नवी पहाट… सूर्य दर्शन करुन करा दिवसाची सुरुवात… आजचा दिवस जाऊ दे एकदम खास 
  • असं म्हणतात, प्रत्येक दिवशी आपण नव्याने जन्माला येतो… त्यामुळे उठा आणि दिवसाची सुरुवात करा
  • एक आस, एक विसावा… उगवता सूर्य रोज दिसावा
  • जीवन प्रत्येकाला समान संधी देते, त्या संधीचे सोनं करण्यासाठी आनंदी राहा
  • जो रोज सकाळी लवकर उठतो आणि उगवत्या सूर्याचे दर्शन घेतो. त्याला आयुष्यात नेहमीच यशं मिळते
  • आली ही सोनेरी पहाट.. चला सूर्याचे दर्शन घेऊन करुया आयुष्याची नवी सुरुवात
  • हवा असेल नवा आत्मविश्वास तर करा आनंदाने दिवसाची सुरुवात
  • पहाटेचा मंद वारा, सूर्याची कोवळी किरणं खूप काही सांगून गेली...आयुष्याची एक पहाट नव्याने आणून दिली

  सूर्योदय चारोळ्या (Sunrise Charolya In Marathi)

  आपल्या सर्वांनाच सूर्यनमस्काराचे फायदे माहित आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, सूर्यावर अनेक मराठी चारोळ्या ही करण्यात आल्या आहेत. जाणून घेऊया अशा काही सूर्योदय कविता.

  सूर्योदय चारोळ्या - Sunrise Charolya In Marathi

  • कोकिळेच्या मंजुळ स्वरांनी
   फुलांच्या हळुवार सुगंधानी
   आणि सूर्याच्या कोमल किरणांनी
   तुमच्या आयुष्यात एक आनंद येऊ पाहात आहे
   शुभ सूर्योदय
  • उर्जेचा तो स्रोत सूर्य मी,
   अगदी जवळून पाहावा,
   काळोखाला चिरत चिरत मी,
   सूर्यकिरण व्हावा
  • उगवता सूर्य देवो तुम्हाला प्रखर तेज,
   उगवणारी फुलं तुमच्या आयुष्यात आणो गंध
   ईश्वर तुम्हाला देवो सर्व सुख समृद्धी
   तुमच्या आयुष्याला मिळू दे नव क्रांती
  • कोकिळेच्या मंजुळ स्वरांनी
   फुलांच्या हळुवार सुगंधानी
   आणि सूर्याच्या कोमल किरणांनी
   तुमच्या आयुष्यात एक आनंद येऊ पाहात आहे
   शुभ सूर्योदय
  • उर्जेचा तो स्रोत सूर्य मी,
   अगदी जवळून पाहावा,
   काळोखाला चिरत चिरत मी,
   सूर्यकिरण व्हावा
  • उगवता सूर्य देवो तुम्हाला प्रखर तेज,
   उगवणारी फुलं तुमच्या आयुष्यात आणो गंध
   ईश्वर तुम्हाला देवो सर्व सुख समृद्धी
   तुमच्या आयुष्याला मिळू दे नव क्रांती 
  • उगवत्या नव्या सूर्याने इशारा केला
   नवीन दिवस आनंदाने जगण्याचा क्षण आला
   सूर्याची प्रत्येक किरणं आणो तुमच्या जीवनात आनंद
   असा सूर्योदय रोज आयुष्यात येवो
  • सुंदर दिवसाची सुरुवात,
   नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
   मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
   रोज तुमच्या आयुष्यात येवो
   एक आनंदी सकाळ
  • प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा
   असेल असे नाही,
   पण प्रत्येक दिवस तुम्ही चांगला करु शकता हे नक्की!
  • उगवत्या सूर्याकडून
   आपणही काही शिकावे,
   रोज उगवत- मावळत असताना
   नव्या सामर्थ्याने उगवावे
  • सूर्योदयामध्ये नक्कीच काहीतरी जादू आहे
   तो डोळ्याला शांती तर देतोच
   पण जगण्याची नवीन प्रेरणाही देतो
  • सोनेरी किरणांची सोनेरी किरणं
   सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
   सोनेरी दिवसांच्या सोनेरी शुभेच्छा
  • सूर्याच्या तेजाने उजळून निघू दे तुमचे आयुष्य
   सोनेरी किरणं देऊ दे नव्या अपेक्षा आणि आशा
   नवीन दिवसाच्या सूर्य किरणभर शुभेच्छा
  • एक नवा आनंद घेऊन सूर्य रोज उगवतो
   पहाटेचा सूर्य जणू नव्या आशा घेऊन उगवतो,
   तुमच्या जीवनात यावा हा आनंद रोज
   सूर्योदयाचे दर्शन तुम्हाला घडावे रोज
  • कितीही कंटाळा आला तरी
   सूर्य उगवण्याचे थांबत नाही
   आयुष्यात खचून गेला असार तर सूर्याचे उदाहरण
   कायम असू दे समोर… कारण त्यामुळेच येईल तुमच्या
   आयुष्याला बहर
  • तेजस्वी रुप हे सूर्याचे
   दिसे किती देखणे
   आयुष्याला नव दिशा देऊन
   करी तो आपलेसे
  • वंदूनी तुला दिवसाची सुरुवात करु
   नकारात्मकेचा करुन नाश
   नव्या दिवसाची नवी सुरुवात करु
  • फिटे अंधाराचे जाळे
   झाले मोकळे आकाश
   दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश
   -श्रीधर फडके

  आता एखाद्याच्या दिवसाची सुरुवात करा सूर्योदयाच्या शुभेच्छा पाठवून. अशा शुभेच्छा देतील तुम्हाला आनंद. या शिवाय तुमच्या एकटेपणामध्ये तुमचा आधार ठरतील आधार कोट्स.