सूर्योदय जसा मनाला प्रसन्न करतो तसाच सूर्यास्त तुमच्या मनाला निवांत करतो. सायंकाळी एखाद्या अथांग समुद्र किनारी अथवा माळरानावरून सूर्याचा असा निरोप घेणं रोमांचक असतं. यासाठी सूर्योदर्याप्रमाणेच सूर्यास्त पाहण्यासाठीही पर्यटक गर्दी करतात. सनराईझ प्रमाणेच सनसेट पॉईंटही खूप लोकप्रिय असतात. आजवर सूर्यास्तावर अनेक सुविचार, कविता, चारोळ्या लिहिल्या गेल्या आहेत. तुमच्यासोबत प्रिय व्यक्तीची संध्याकाळ अशीच सुंदर आणि रोमॅंटिक करण्यासाठी शेअर करा हे प्रेरणादायी सूर्यास्त कोट्स त्याचप्रमाणे वाचा सूर्योदय कोट्स आणि बनवा तुमची सकाळ प्रसन्न
मावळत्या सूर्याला निरोप देणारे हे कोट्स तुम्हाला नक्कीच आवडतील.
१. ढग माझ्या आयुष्यात तरंगत आहेत, वादळ अथवा पावसासाठी नाही तर, माझ्या आकाशात सूर्यास्ताचे रंग भरण्यासाठी - रविंद्रनाथ टागोर
२. जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा त्याला कोणत्याच मेणबत्ती बदलू शकत नाही - जॉर्ज आर आर मार्टिन
३. ट्वायलाइट फेल :आकाश प्रकाशमान झालंय, गडद जांभळ्या रंगानी आणि छोट्या छोट्या ताऱ्यांनी - जे. के, रोलिंग
४. दररोज होतो सूर्योदय आणि सुर्यास्त तेही अगदी विनामुल्य, त्यामुळे ते गमवू नका - जो वॉल्टन
५. प्रेमाची पहिली झलक म्हणजे सूर्यास्त, केशरी , मोतिया गुलाबी आणि गडद जांबळ्या रंगाचा झगमगाट - अन्ना गोडबर्सन
६. हे सूर्यप्रकाशा! तू पृथ्वीवरील खरे सोने आहेस
- रोमन पायने
७. बाहेर सूर्यास्त होत असताना घरात बसून कोणतेही महत्त्वाचे काम करण्यात वेळ वाया घालवू नका - सी जॉयबेल सी.
८. सूर्यास्त म्हणजे सुर्याने रात्रीचे घेतलेलं ज्वालाग्राही चुंबन - क्रिस्टल वुड्स
९. सूर्यास्ताच्या वेळी आकाश एखाद्या सुंदर फुलासारखं वाटतं - रोबर्टो बोलानो
१०. प्रत्येक सुर्यास्त हा नव्याने जगण्याची एक संधी असतो - रिची नॉर्टन
एखाद्या रम्य सनसेट पॉंईटवरचे फोटो शेअर करताना सोशल मीडियावर हे स्टेटस ठेवा
१. सूर्यास्तामध्ये एका क्षणासाठी सर्व काही थांबवण्याची क्षमता आहे.
२. जर तुम्हाला तुम्हाला माहीत असल्यापेक्षा जास्त ध्यान करायचे असेल तर मनातील विचार थांबेपर्यंत सूर्यास्त पाहा... कारण तेच ध्यान आहे
३. मला असं वाटतं क्षितिजावर होणारा सूर्यच जाता जाता ताऱ्यांमध्ये प्रकाश टाकून जातो.
४. सूर्यास्ताकडे दिवसाचा शेवट म्हणून नाही तर रम्य रात्रीची सुरूवात म्हणून पाहायला शिका
५. सूर्यास्ताच्या प्रकाशात मला अनंताची जाणीव झाली, माझी सावली मोठी झाली आणि मी तिच्यात विलीन झालो
६. दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलेला सूर्यास्त एकसारखा नसतो हे निसर्गाचे आश्चर्यच नाही का
७. सूर्य हा एक असा सोनेरी तारा आहे जो नवीन दिवसाची निर्मिती करतो
८. सूर्यास्त हा बोलताना जितकं छान वाटतं तितकाच मनमोहक आहे
९. सूर्यास्ताचा एक एक क्षण मौल्यवान आहे तो कधीच गमवू नका
१०. सूर्याची सुर्यास्तावेळी होणारी हालचाल आपल्याला आपल्या जीवनातील क्षणांची आठवण करून देते.
प्रिय व्यक्तीला गुडनाईट म्हणताना शेअर करा हे सनसेट कोट्स आणि त्यासोबतच झोपताना प्रियजनांसोबत रात्री चांगले विचार शेअर करण्यासाठी पाठवा हे शुभ रात्री संदेश
१. सूर्यास्त म्हणजे रात्रीची सुरूवात करणारे एक मंद संगीत आहे.
२. सूर्यास्त म्हणजे माणसाच्या मनाची स्थिती
३. तुम्ही न पाहिलेला सूर्यास्त हा तुम्ही पाहिलेल्या सुर्यास्तांपेक्षा नक्कीच सुंदर असू शकतो - कॅरेन जॉय फॉवलर
४. सूर्यास्त आवडतो कारण त्याचा अस्तही होतो - रे ब्रॅडबरी
५. शेवटही सुंदर असू शकतो याचा पुरावा म्हणजे सूर्यास्त - बीओ टॅपलीन
६. कृतज्ञता व्यक्त करत सूर्यास्त पाहणं म्हणजे मन:शांती
७. प्रत्येक सूर्यास्त मनापासून जगा
८. संध्याकाळी सूर्यास्त पाहणं म्हणजे निव्वळ मनोरंजन
९. स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये सूर्यास्त जन्माला येतो
१०. एक रमणीय संध्याकाळ हळू हळू सूर्यास्त निर्माण करते
सोशल मीडिया अथवा इन्साग्राम कॅप्शनसाठी परफेक्ट आहेत हे सूर्यास्त कोट्स
१. मावळत्या सुर्याकडून काहीतरी शिकावे, मावळत असतानाही नव्या सामर्थ्याने जगावे
२. सूर्यास्त म्हणजे कोणासाठी सांजवेळ, तर कोणासाठी परतीचा प्रवास, कोणासाठी असते प्रेमाची उधळण तर कोणासाठी मात्र सरत्या भेटीची आठवण
३. मावळत्या संध्येला सूर्यास्त होतो... सुर्य बघता बघता क्षितिजाला स्पर्शतो, पाखरांचा कल मायेकडे ओढावतो, चहूकडे फक्त आनंदाची उधळण करतो
४. मावळता सूर्य सुंदर असतो कारण त्यामुळे उद्याचा उगवता सूर्य उगवणार हा विश्वास वाढतो.
५. शुभ विचारांचा सूर्योदय जीवनाला नवीन उमेद देतो, तर शुभ विचारांचा सूर्यास्त जीवनाला जगण्याची आशा देतो.
६. मी जातोय पलीकडे.... उद्याचा सूर्योदय करण्यासाठी
७. सूर्यास्त फक्त एका संध्याकाळपुरताच असतो कारण सूर्य सूर्योदयासह नव्याने जन्माला येतो.
८. रोजचीच ती सांजवेळ, रोजचा तो निसर्गाचा खेळ, सुर्य अस्त होताना रंगछटा बदलतो, रोज नव्या उमेदीने उगवण्याची कला सर्वांना शिकवतो
९. सूर्यास्त झालाय नेहमीप्रमाणे, नवी सुरूवात करण्यासाठी, झालं गेलं विसरून, नव्या उमेदीने जगण्यासाठी
१०. दिवसभर जळत होता विरहाने, संध्येच्या सौंदर्याने त्याला पाघळवलं, थोडीशी झलक दाखवत त्याने चंद्र-ताऱ्यांना सुद्धा लाजवलं.
यासोबतच वाचा जीवन जगताना मानसिक समाधान देणारे हे आध्यात्मिक सुविचार आणि या प्रेरणादायी विचारांनी जीवन करा सुखी आणि समाधानी
रमणीय संध्याकाळी प्रिय व्यक्तीच्या हातात हात घालून फिरताना असे कोट्स मनात रूंजी घालतात.
१. सूर्यास्त प्रत्येक दिवस तुझ्या आठवणीत मावळतो, कधी शृगांरात सजून तर कधी आसवांनी भिजून
२. तुझ्या शहरातील संध्याकाळ खूपच मनमोहक आहे, तू रागवणार नसशील तर मला ती चोराविशी वाटते
३. भेट तुझी माझी निळ्या समुद्र किनारी, आपल्या प्रेमाची लाली तेव्हा मावळत्या सूर्याला घट्ट बिलगली होती
४. आवडतं मला मावळत्या सूर्याला पाहणं, नवीन उमेदीसह उद्याची स्वप्न पाहणं
५. पुर्वीसारखा वाटत नाही आता मला सूर्यास्त, तुझ्या नजरेत नाही झाला प्रेमाचाही अस्त
६. कधी मावळता सूर्य पाहिला आहेस का, असं वाटतं की कुणीतरी आकाशात आगीचा गोळा फेकला आहे, काही काळ त्याचं असणं आसमंतात रंगाची उधळण करतं आणि आकाश मात्र त्याला आपल्या कवेत घेत शांतपणे झोपी जातं.
७. सागरापल्याड आज मी तुझ्यासोबत मावळत्या सूर्याला पाहिलं, रम्य साजंवळेचं ते चित्र पाहताना हळूच तुझ्याकडे पाहिलं, आज मला जगण्याचा खरा आनंद मिळाला, इतका सुंदर सुर्यास्त मी कधीच नव्हता पाहिला.
८. सनसेटमध्ये नक्कीच काहीतरी जादू आहे कारण तो आनंद तर देतोच पण नव्याने जगण्याची प्रेरणापण देतो.
९. मावळतीचा सूर्य का असतो इतका गोड त्याच्या सौंदर्याला नाहीच कसली तोड
१०. मावळतीचा सूर्य रंगाळला क्षितिजावर, जसं निरोपाच्या वेळी आपलं होत असतं.
सुर्योदयाप्रमाणेच नव्या उमेदीची साक्ष देणारे हे सूर्यास्त कोट्स तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील.
१. कोणतेही वर्णन न करता मी फक्त सूर्यास्त पाहण्याचा आनंद घेतो - डब्लु समरसेट मौघम
२. आयुष्यात बऱ्याच गोष्टी थांबवता येऊ शकतात मात्र सूर्यास्त नाही.
३. जेव्हा मी सूर्यास्ताच्या चमत्काराचे अथवा चंद्राच्या सौंदर्याचे कौतुक करतो तेव्हा सृष्टीच्या उपासनेत माझं मन रमतं - महात्मा गांधी
४. परिपूर्ण आनंद म्हणजे एक सुंदर सूर्यास्त, नातवंडाचं हसणं, पहिला हिमवर्षाव. या छोट्या छोट्या गोष्टी आनंद निर्माण करतात, त्यासाठी मोठ्या घटनांची गरज नसते. आनंद छोट्या गोष्टीमध्ये आहे मोठ्यांत आहेच असं नाही - शरॉन ड्रॅपर
५. मी नेहमी सांगतो की, माझ्या आयुष्यात जेव्हा मी सर्वात आनंदी होतो तेव्हा मी सनसेट पाहिलेला आहे - ख्रिस इव्हान्स
६. फोटोग्राफीमधला सर्वात मोठा क्लिक म्हणजे सनराईझ आणि सनसेट - कॅथरीन ओपी
७. सूर्यास्त म्हणजे सूर्याने दिलेल्या महान गोष्टींचे कौतुक करण्याची छान संधी - मेहमत मुरात इल्दान
८. विसरू नका सुंदर सूर्यास्ताला नेहमी ढगाळ आकाशाची गरज असते - पाउलो कोयल्हो
९. सनसेट बालपणासारखा सुंदरच नाही तर त्याचा अनुभव क्षणभंगूर असल्यामुळे त्याबद्दल आश्चर्य वाटतं - रिचर्ड पॉल इव्हान्स
१०. पूर्ण सूर्यास्त म्हणजे आकाश एखाद्या फुटलेल्या अंड्याप्रमाणे आणि पाण्याला आग लागल्याप्रमाणे भासते - पामेला हॅन्सफोर्ड जॉन्सन