ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
कडक उन्हाळ्यातही ठेवा तुमचं घर थंड आणि प्रसन्न

कडक उन्हाळ्यातही ठेवा तुमचं घर थंड आणि प्रसन्न

उन्हाळा सुरू होताच सूर्याची किरणे जास्तच प्रखर होतात. ज्यामुळे बाहेर प्रमाणेच घरातही उकाडा वाढू लागतो. अशा वातावरणात बाहेर जाणं तर कठीण असतंच पण बऱ्याचदा घरातही उकाड्यामुळे दुपार घालवणं कठीण होऊन बसतं. दिवसभर उन्हाचा त्रास होतोच शिवाय उन्हात तापलेल्या भिंतीमुळे रात्रीही घरात गरम वाफा जाणवतात. यासाठीच उन्हाळ्यात घर थंड आणि प्रसन्न ठेवण्यासाठी काही छोटे छोटे उपाय करायला हवेत. ज्यामुळे यंदाचा उन्हाळा तुमच्यासाठी नक्कीच सुसह्य असेल.

उन्हाळ्यात असं ठेवा घर थंड

उन्हाळ्यात घरातील वातावरण थंड आणि प्रसन्न ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय

पडदे, बेडशीटचे रंग बदला –

घरात पुरेसा उजेड यावा यासाठी आपण नेहमीच हलक्या रंगाचे आणि पातळ पडदे खिडक्यांना लावतो.  उन्हाळात पडदे थोडे जाड आणि थंडावा देणाऱ्या रंगाचे असतील याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे घरातील बेडशीट, सोफा कव्हर, टेबल क्लॉथ, उशांचे कव्हर नेहमी फ्रेश कलरचे असू द्या. कारण हलके रंग ऊन शोषून घेत नाहीत या उलट गडद रंग ऊन सोशून घेतात ज्यामुळे घरात जास्त उकडू लागतं. पांढऱ्या रंगाचे पडदे आणि तुमच्या घरात प्रसन्न आणि थंड वातावरण निर्माण करतात. 

ADVERTISEMENT

pexels

घरात झाडं लावा –

घरात झाडं लावलेली असतील तर त्यांच्यामुळे तुम्हाला घरात नक्कीच थंड आणि प्रसन्न वाटेल. ऊन सुरू होण्यापूर्वी झाडांमध्ये पाणी घाला ज्यामुळे झाडांची मुळं सुकणार नाहीत आणि झाडे टवटवीत राहतील. झाडांमुळे घरातील उष्णता कमी होईल आणि घरात थंडावा निर्माण होईल. डोळ्यांना सतत हिरवीगार आणि टवटवीत झाडं दिसल्यामुळे घरात प्रसन्न वाटू लागेल. आजकाल बाजारात खास उन्हाळ्यात लावण्यासारखी कमी पाण्यात टवटवीत दिसणारी आणि सूर्यप्रकाश शोषून घेणारी झाडे मिळतात. अशी झाडं लावण्यामुळे तुम्हाला  नक्कीच फायदा होऊ शकतो. 

कूलरमध्ये आईस क्यूब टाका –

घरात एसी लावल्यानंतर नक्कीच थंडावा मिळू शकतो. मात्र एसी घेणं अथवा दिवसभर एसी लावणं तुम्हाला जमणार नसेल तर एखादा छान कूलर वापरा. कूलर मधून थंड हवा यावी यासाठी त्यामध्ये त्यात बर्फाचे खडे टाका. जस जसा बर्फ विरघळू लागेल तस तशी तुम्हाला थंड हवा मिळू लागेल. असं केल्यामुळे तुम्हाला एसीप्रमाणे थंड हवा मिळू शकते. अनेक कूलरमध्ये वाळ्याच्या वापर केलेले असतो. त्यामुळे वाळा हे पाणी शोषून घेतो आणि कूलरच्या हवेमामार्फत तुम्हाला सतत थंडावा मिळतो.

सिलिंगला नेहमी सौम्य कलर लावा –

आजकाल कलर कॉम्बिनेशनचा जमाना आहे. त्यामुळे घराची सटावट करताना भिंतीना साजेरा रंग सिलिंगला लावला जातो. मात्र जर तुम्ही तुमच्या सिलिंगला गडद रंग लावला असेल. तर तुम्हाला उन्हाळ्यात घरात थंडावा मिळणार नाही. यासाठी सारासार विचार करूनच घराच्या सिलिंगचा कलर ठरवा. जर तुम्ही बिल्डिंगमध्ये टॉप फ्लोअर अथवा टेसेस असलेल्या स्वतंत्र घरात राहत असाल तर तुम्हाला सिलिंगला सफेद रंग लावण्याची गरज आहे हे वेळीच ओळखा. 

ADVERTISEMENT

instagram

वाळ्याचे पडदे लावा –

पाण्यात वाळा घालून पाणी पिण्याची प्रथा फारच प्राचीन आहे. वाळ्याला आयुर्वेदातही खूप महत्त आहे. यासाठीच उन्हाळा सुसह्य करण्यासाठी वाळ्याचं पाणी अवश्य प्या. कारण वाळ्याच्या पाण्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसा थंडावा मिळतो. अंगातील उष्णता बाहेर टाकली जाते. ज्यामुळे उन्हाळ्यात होणारे शारीरिक त्रास कमी होतात. यासाठी मातीच्या माठात अथवा पाणी पिण्याच्या भांडयामध्ये वाळा गुंडाळून ठेवून द्या. वाळ्याचा अर्क त्या पाण्यात उतरतो आणि तुमच्या पिण्याच्या पाण्यातून शरीरात जातो. वाळ्याच्या पाण्याची चव नेहमीच्या पिण्याच्या पाण्यापेक्षा वेगळी लागते. ज्यामुळे घशाला लागलेली कोरडही कमी होते. एवढंच नाही तर या वाळ्याचे पडदेही तुम्ही घराला लावू शकता. ज्यामुळे तुमच्या घरातील वातावरण थंड आणि प्रसन्न राहू शकेल. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि पिक्सेल्स

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

नैसर्गिक पद्धतीने घर निर्जंतूक करण्याच्या सोप्या टिप्स

उन्हाळ्यात रात्रीचा उकाडा कमी करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

उष्णता वाढतेय.. त्वचेच्या या समस्यांपासून दूर राहण्यासाठी अशी घ्या काळजी

22 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT