ADVERTISEMENT
home / केस
केस ब्लीच करणं सुरक्षित आहे का

केस ब्लीच करणं सुरक्षित आहे का

केस तुमच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर घालतात. त्यामुळे सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी केसांवर निरनिराळे प्रयोग केले जातात. हेअर कलर करण्यासाठी  काही जणी केस ब्लीच करतात. बऱ्याचदा हेअर कलर करण्यापूर्वी केस ब्लीच केले जातात. ब्लीचिंग करताना नकळत केसांवर केमिकल्सचा वापर केला जातो. ज्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. केसांमधील मॅलानिन आणि पिगमेंटेशनचे या प्रक्रियेत नुकसान होते आणि केसांचे आरोग्य बिघडते. केसांप्रमाणेच स्काल्पवरही ब्लीचचा परिणाम होत असतो. त्यामुळे तुम्ही देखील केस ब्लीच करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती अवश्य वाचा. 

स्काल्प ब्लीचिंग करणं म्हणजे काय

केसांना ब्लीच करण्याच्या प्रकाराला स्काल्प ब्लिचिंग असंबी म्हणतात. केसांना रंग देण्यासाठी याचा वापर केला जातो. यात एक प्रकारचे केमिकल असते. ज्यामुळे केसांना नैसर्गिक रंग जाऊन तिथे सोनेरी रंग येतो. ब्लीचिंगसाठी विशिष्ठ टेकनिकचा वापर केला जातो.  जर स्काल्प ब्लीचिंग चुकीच्या पद्धतीने केलं गेलं तर केसांचं अतोनात नुकसान होऊ शकतं. ज्यामुळे स्काल्पला खाज येणं, जळजळ होणं असे त्रास जाणवतात. यासाठी ते तज्ञ्जांच्या मदतीनेच केलं गेलं पाहिजे. हे वाचल्यावर तुमच्या मनात येईल की केसांना सुरक्षित पद्धतीने ब्लीच कसं करावं. यासाठीच काही  गोष्टी स्काल्प ब्लीचिंग पुर्वी तुम्हाला माहीत असायला हव्या.

पार्लर अथवा सलॉनमध्ये ब्लीच करताना काय लक्षात ठेवाल

पार्लर अथवा सलॉनमध्ये ब्लीच करण्यापूर्वी तिथल्या ब्युटी अथवाा हेअर एक्सपर्टचा सल्ला घ्या. चांगल्या प्रतिष्ठित पार्लर अथवा सलॉनमध्येच ही ट्रिटमेंट करा. ज्यांच्याकडे अशा ट्रिटमेंट करण्याचं प्रमाणपत्र आणि तज्ञ्ज स्टाफ असेल. शिवाय तुमच्या ओळखीच्या लोकांना ज्यांनी ही ट्रिटमेंट केली आहे त्यांचा अनुभव विचारा. मगच योग्य तो निर्णय घ्या.

घरी ब्लीच करायचं असेल तर

स्काल्प ब्लीचिंग कधीच घरी करू नये. मात्र तरिही जर तुम्हाला घरीच करायचं असेल तर जे ब्युटी प्रॉडक्ट वापरणार आहात त्याची योग्य ती खात्री करून घ्या. त्यावर लिहिलेल्या सूचना तंतोतंत पाळा. ट्रिटमेंट सुरू करण्यापूर्वी त्याची पॅच टेस्ट घ्या. डोळे, आयब्रोज आणि पापण्या यांना ब्लीच लागणार नाही याची काळजी घ्या. हातात ग्लोव्ह्ज घाला आणि केस धुताना चेहऱ्यावर पाणी येणार नाही याची विशेष काळजी घ्या.

ADVERTISEMENT

स्काल्प ब्लीचिंगचे दुष्परिणाम

स्काल्प ब्लीचिंग करणं हे पूर्णपणे सुरक्षित नक्कीच नाही. कारण त्यामध्ये केमिकल्स असतात. जर तुम्हाला त्याची अॅलर्जी असेल तर तुमच्या केसांमध्ये अचानक खाज येणे, स्काल्प लाल होणे, स्काल्पमधून वेदना येणे, डोकं दुखणे अशा समस्या जाणवू शकतात. ही लक्षणे काही वेळानंतर अथवा काही दिवसांनंतरही दिसू शकतात. जर अशी लक्षणे जाणवली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि पुन्हा केस ब्लीच करणं टाळा. त्वरीत आराम मिळण्यासाठी केसांना मध लावा अथवा गुलाबपाण्याने केस स्वच्छ करा. ज्यामुळे काही  काळासाठी तुम्हाला आराम मिळेल. 

ब्लीचबाबत आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

ब्लीच केल्याने येत असेल अलर्जी, तर करा घरगुती ब्लीच (Homemade Bleach)

चेहऱ्यावर वॅक्सिंग करताना लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा चेहरा होईल खराब

चेहऱ्यावर ब्लीच करत आहात, तर नक्की घ्या अशी काळजी

01 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT