ADVERTISEMENT
home / फॅशन
उन्हाळ्यात ट्रेंडी आणि कूल दिसण्यासाठी ट्राय करा या फॅशन टिप्स

उन्हाळ्यात ट्रेंडी आणि कूल दिसण्यासाठी ट्राय करा या फॅशन टिप्स

उन्हाळा सुरू होण्याआधीच वातावरणातील काहिली वाढू लागली आहे. ज्याचा थेट परिणाम तुमच्या सौंदर्य आणि त्वचेवर होतो. कारण या काळात तुम्ही जीन्स, जॅकेट असे जाड कपडे घालू शकत नाही. या काळात तुम्ही असेच कपडे घालायला हवे जे तुमच्या त्वचेसाठी आरामदायक असतील. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत अशा काही फॅशन टिप्स शेअर करत आहोत. ज्यामुळे तुम्ही उन्हाळ्यातही स्टायलिश आणि कूल दिसू शकता. म्हणूनच लगेचच तुमचं वॉर्डरोब अपडे करा आणि हा उन्हाळा करा सुसह्य

उन्हाळ्यात कपडे निवडताना काय काळजी घ्यावी –

उन्हाळातील कपडे निवडताना ते स्टायलिश असण्यासोबत तुमच्या त्वचेसाठी आरामदायक असण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या.

रंगाची निवड –

उन्हाळ्यातील तुमच्या आऊटफिटचे रंग खूप महत्त्वाचे ठरतील. असे रंग निवडा ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व उठून दिसेल शिवाय तुमच्या त्वचेला थंडावा मिळेल. लक्षात ठेवा उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे कधीच घालू नका. कारण काळा रंग वातावरणातील सर्व उष्णता शोषून घेतो. ज्यामुळे तुम्हाला  काळ्या रंगाचे कपडे घातल्यावर जास्त गरम होऊ शकतं. या काळात पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं हा सर्वात उत्तम मार्ग ठरेल. कारण त्यामुळे तुम्हाला खूप आरामदायक वाटेल. तुम्ही उन्हाळ्यात सी ग्रीन, आकाशी, गुलाबी, पिवळा, गिरवा आणि हलक्या पेस्टल रंगाचे कपडे निवडू शकता. ज्यामुळे तुम्ही कूल दिसाल. 

ADVERTISEMENT

आऊटफिट मध्ये व्हरायटी ठेवा –

उन्हाळ्यात तुमच्या वॉर्डरोबमध्ये नेहमीपेक्षा जास्त कपड्यांची व्हरायटी असायला हवी. कारण उन्हाळ्यात घामामुळे तुम्हाला सतत कपडे बदलण्याची गरज लागू शकते. दिवसभर पुन्हा पुन्हा तेच कपडे घालणं तुमच्या त्वचेसाठी नक्कीच योग्य नाही. मात्र याचा अर्थ असा मुळीच नाही की यासाठी तुम्ही खूप महागडे कपडे घालायला हवे. तुम्ही अगदी स्वस्त आणि मस्त असलेले सुती कपडे या काळासाठी निवडू शकता. स्टायलिश दिसण्यासाठी निरनिराळ्या रंगाचे आणि स्टाईलचे कपडे निवडा. ज्यामुळे तुम्हाला सतत एकाच प्रकारचे कपडे घालण्याचा कंटाळा येणार नाही. 

उन्हाळ्यासाठी करा अगदी सिंपल लुक

बॉडी हगिंग, चमकणारे अथवा अंगावर रॅशेस येतील असे तंग कपडे या काळात मुळीच घालू नका. हे कपडे जरी दिसायला ग्लॅमरस असले तरी ते तुमच्या त्वचेसाठी मुळीच योग्य नाहीत. त्यामुळे घट्ट कपडे घालण्यापेक्षा स्टायलिश पण थोडे ढगळ कपडेच या काळासाठी निवडा. शॉर्ट सोबत पांढऱ्या रंगाचे टीशर्ट, कॉटनचे लखनवी कुर्ते, ट्यूनिक असे कपडे या काळात सिंपल असूनही स्टायलिश वाटतात.

उन्हाळ्यात करा असा मेकअप –

उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या त्वचेची विशेष काळजी घ्यायला हवी. कारण या काळात त्वचा हायड्रेट राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हेव्ही मेकअपपेक्षा नो मेकअप लुकच या काळात जास्त शोभून दिसतो. यासाठी तु्म्ही फक्त तुमच्या कपड्यांच्या रंगसंगतीनुसार लिपस्टिक निवडा, त्वचेच्या रंगसंगतीनुसार एखादं कॉम्पॅक्ट आणि फक्त काजळ, आयलायनर लावा. मात्र लक्षात ठेवा स्किन केअर साठी चांगलं मॉश्चराईझर आणि घराबाहेर पडण्यापूर्वी योग्य सनस्क्रिन लावण्यास मुळीच विसरू नका.

ADVERTISEMENT

फॅशनेबल दिसण्यासाठी वापरा या अॅक्सेसरिज –

उन्हाळ्यात अशा अॅक्सेसरिज तुमच्या बॅगेत असायलाच हव्या ज्यामुळे तुम्ही स्टायलिश तर दिसालच शिवाय तुमच्या त्वचेचं उन्हापासून रक्षणही होईल. यासाठी गॉगल, हॅट, स्टोल, स्कार्फ या गोष्टी तुमच्या वॉर्डरोबमध्ये अवश्य अपडेट करा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

उन्हाळ्यासाठी कूल आणि ट्रेंडी टॉप्स डिझाईन्स (Summer Tops For Women In Marathi)

ADVERTISEMENT

खादी – कायम टिकणारी फॅशन, नेहमीचा ट्रेंड

कॉटन पैठणी आहे ट्रेंडमध्ये, गोल्डन आणि सिल्व्हर दोन्ही काठ दिसतात छान

11 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT